भारतीय उपखंडात एक काळ असा होता, जेव्हा खरंतर भारत हा जगातील इतर देशांपेक्षा विज्ञानात आणि राहणीमानात खूप प्रगत होता. भारतात अनेक अशा गोष्टींचा, सिद्धांताचा शोध त्याकाळात लागला, जेव्हा इतर उपखंडात त्याचा विचार सुद्धा कोणी केला नव्हता, आणि त्याचं अस्तित्व आहे की नाही हे सुद्धा त्यांना माहिती नव्हतं. भारतात लागलेल्या अशाच वेगवेगळ्या शोधांबद्दल आणि सिद्धांताबद्दल जाणून घेऊ. (Gravitational Force)
तर जॉन डाल्टन (John Dalton) या शास्त्रज्ञांनी १८०८ साली एक सिद्धांत प्रकाशित केला. त्याच्या सिद्धांतानुसार all matter is made up of atoms, म्हणजे सर्व पदार्थ हे अणूंनी बनलेले असतात, पण जॉन डाल्टन याने त्याचा सिद्धांत प्रकाशित करण्याच्या २४०० वर्ष आधी भारतात. महर्षि कणाद या भारतीय तत्वज्ञांनी अणूविषयी असेच काहीसे तर्क केले होते. महर्षि कणाद यांनी लिहिलेल्या वैशेषिक सूत्र या ग्रंथात त्यांनी ‘सर्व पदार्थ हे अणूंनी बनलेले असतात,’ हा तर्क मांडला होता. आता डाल्टन याने काय महर्षि कणाद यांचा सिद्धांत चोरला नाहीये. त्यांनी तो त्याच्या अभ्यासानेच मांडला आणि त्यात त्याने वेगवेगळ्या थेओरीस मांडल्या, ज्यातील काही बरोबर निघाल्या तर काही चुकीच्या ठरल्या. पण महत्त्वाचा मुद्दा हा की भौतिकशास्त्राच्या या विषयाचं इतक्या बारकाईने निरीक्षण भारतात आज पासून सुमारे २६०० वर्षांआधीच झालं होतं. (History)
एवढंच नाही, तर न्यूटनच्या डोक्यात सफरचंद पडून गुरुत्वाकर्षणाचा शोध लागण्याच्या जवळ जवळ १००० वर्षां अगोदर, इ.स. ४९० ते ५८५ या काळात गणिततज्ञ वराहमिहिर यांनी गुरुत्वाकर्षणाची कल्पना मांडली होती. त्यांचा विश्वास होता की, या विश्वातील ग्रहांमध्ये काहीतरी आकर्षणशक्ती आहे, आणि त्या शक्तींच्या गोळाबेरजेमुळे पृथ्वी अशी तरंगू शकते. गुरुत्वाकर्षणाच्या शोधाच्या आधीची ही एक महत्त्वपूर्ण सुरुवात होती, असं आपण म्हणू शकतो. पण न्यूटनच्या गुरुत्वाकर्षण सिद्धांतामुळे मानवाला खूप मदत झाली, कारण त्याने सूर्याभोवती ग्रह कसे फिरतात, पृथ्वीवर वस्तू कशा पडतात याचं सोपं स्पष्टीकरण दिलं. त्याने सांगितलं की, सर्व वस्तूंवर एकच ताकद काम करते, त्यांचा आकार किंवा ते कुठे आहेत याचं काहीच महत्व नाही. यामुळे शास्त्रज्ञांना ग्रहांच्या गतींचा अचूक अंदाज घेता येऊ लागला. पण जर वराहमिहिर यांच्यानंतर भारतातच त्यांनी मांडलेल्या तर्कांचा विचार आणि अभ्यास केला गेला असता, तर कदाचित भौतिकशास्त्राच्या पुस्तकात गुरुत्वाकर्षणाच्या धड्यांमध्ये भारतीय शास्त्रज्ञांचं नाव असतं. (Gravitational Force)
भारतातील आणखी एक गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ, ज्यांनी जगाला शून्य भेट दिला, ते म्हणजे आर्यभट. आर्यभट यांनी १४०० वर्षांआधी फक्त गणिताच्या जोरावर काही असे अचूक अंदाज मांडले होते, जे ऐकून तुम्ही चकित व्हाल. पृथ्वीचा परीघ हा ३९,७३६ कि. मी. आहे. हे त्यांनी फक्त गणिताने शोधलं होतं. आज पृथ्वीचा परीघ हा ३९,८४३ कि. मी. असं मानलं जातं. कुठल्याही उपकरणाशिवाय त्यांनी हे जवळपास अचूक उत्तर १४०० वर्षांआधी शोधणं हे अविश्वसनीय आहे. त्याशिवाय, त्यांनी एका वर्षात ३६५ दिवस, ६ तास, १२ मिनिटं आणि ३० सेकंद असतात हेही शोधलं होतं. (Information)
भारतात एका अशा गोष्टीचा शोध ५००० वर्षांपूर्वीच लागला होता, ज्याचा जगभरात रोज वापर होत आहे. ते म्हणजे शर्टाला लावण्याचं बटन. २८०० ते २६०० इ.स.पूर्व काळात हडप्पा संस्कृतीत बटन वापरले जायचे, याचे पुरावे मिळतात. ही बटन्स शर्ट बांधण्यासाठी वापरली जात नव्हती, तर ती फॅशन स्टाईलसाठी वापरली जात होती. शर्टवर बटन लावण्याचा वापर १३ व्या शतकापासून सुरू झाला आणि त्यानंतर विविध प्रकारचे बटन तयार होऊ लागले. (Gravitational Force)
================
हे देखील वाचा : Maha Kumbh : उत्तर प्रदेशमधील अर्थव्यवस्थेला प्रयागराजमुळे सोनेरी दिवस !
=================
आपली संस्कृती आपणच विसरतो, याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे फ्लश टॉयलेट. २१ व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत आणि आज देखील अनेक गावखेड्यात लोक शौचासाठी उघड्यावर जातात. पण बऱ्याच जणांना माहिती नसेल की, फ्लश टॉयलेटचा सर्वात जुना पुरावा भारतातच सापडला आणि तोही हडप्पा संस्कृतीतच, त्यामुळे हडप्पा संस्कृतीतील लोक कीती प्रगत आणि प्रगल्भ होते, हे कळतं. हडप्पा संस्कृतीत त्यांनी तयार केलेले टॉयलेट्स आजच्या काळातील फ्लश टॉयलेट प्रमाणे नव्हते. ते आपल्या भारतीय पद्धतीचे होते. (Gravitational Force)
जगाच्या आधी भारतात लागलेल्या या शोधांचा आणि सिद्धांताची माहिती ऐकताना सांगताना अभिमानास्पद वाटत असलं, तरी एक गोष्ट खरी आहे हे शोध फार पूर्वी लागले, मग आताच काय? आता असे शोध आणि असे शास्त्रज्ञ भारतात का तयार होत नाहीत? आपला इतिहास माहिती असणं आणि त्याबद्दल अभिमान असणं महत्त्वाच आहे. इतिहासात रमत बसण्यापेक्षा आज ते का होत नाहीये आणि आज काय करता येईल याचा विचार आपण करायला हवा..