Home » अरे देवा! सोनं चांदी नव्हे, तर ‘या’ ठिकाणी हुंड्यात दिले जातात विषारी साप

अरे देवा! सोनं चांदी नव्हे, तर ‘या’ ठिकाणी हुंड्यात दिले जातात विषारी साप

0 comment
Share

भारतात हुंडा पद्धतीबाबत कडक कायदे असूनही, देशात दरवर्षी हजारो मुलींचा हुंडा प्रथेला बळी पडून मृत्यू होत असल्याच्या बातम्या येत असतात. हुंडा प्रथेच्या विरोधात कायदा झाल्यानंतरही आजही अनेक ठिकाणी हुंडा प्रथा प्रचलित आहे. आजही वधूचे वडील आपल्या मुलीला हुंडा म्हणून महागड्या भेटवस्तू देतात. तुम्ही तुमच्या घरात किंवा आजूबाजूच्या घरात पाहिलं असेल की, लोक त्यांच्या मुलींच्या लग्नात कर्ज घेतात आणि मौल्यवान वस्तू, सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम वधूच्या बाजूने हुंडा म्हणून देतात. (Snakes as Dowry)

मुलीच्या लग्नासाठी अनेक वडील कर्जाच्या ओझ्याखाली दबले जातात. पण तुम्ही कधी असे ऐकले आहे का, की लग्नात बाप आपल्या मुलीला दागिने आणि भेटवस्तू न देता, विषारी साप देतो. हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल, पण हे सत्य आहे. (Snakes as Dowry)

हे देखील वाचा: ‘या’ शहरात तब्बल ६६ दिवस उगवत नाही सूर्य, पण कसं काय?

ही प्रथा इतरत्र कुठे नाही, तर आपल्याच देशातील मध्य प्रदेशातील एका विशिष्ट समाजात पाळली जाते. ही परंपरा मध्य प्रदेशातील गौरिया समाजाचे लोक पाळतात. या समाजातील लोक आपल्या मुलींच्या लग्नात वराला २१ विषारी साप हुंडा म्हणून देतात. मुलीला हुंड्यात २१ धोकादायक साप दिले नाहीत, तर मुलीचे लग्न मोडेल किंवा काही अशुभ घडेल, असा त्यांचा विश्वास आहे. ही परंपरा या समाजात शतकानुशतके चालत आलेली आहे. (Snakes as Dowry)

खरं तर, गौरिया समाजातील लोक विषारी साप पकडण्याचे काम करतात आणि हेच त्यांचे उत्पन्नाचे एकमेव साधन आहे. येथील लोक विषारी साप दाखवून लोकांकडे पैसे मागतात. तसेच ते सापाचे विष विकूनही पैसे कमावतात. यामुळेच वडील आपल्या मुलीला हुंड्यात साप देतात, जेणेकरून या सापांच्या माध्यमातून कमाई करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालेल. आणि त्यांच्या मुलीला कधीही खाण्यापिण्याची कमतरता भासणार नाही. (Snakes as Dowry)

या समाजातील लोकांच्या म्हणण्यानुसार, मुलीचे लग्न ठरल्यानंतर वडील हुंडा देण्यासाठी साप पकडायला सुरुवात करतात. यात गहुआ आणि डोमी जातीच्या विषारी सापांचाही समावेश असतो. असे म्हटले जाते की, हे साप इतके विषारी असतात की त्यांनी एखाद्याला चावा घेतला की लगेचच त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. तसेच, मुलीच्या वडिलांना वेळीच साप पकडता आला नाही, तर ठरलेले लग्न तुटते. लग्नात दिलेले साप लोक आपल्या घरातील सदस्यांप्रमाणे पाळतात. (Snakes as Dowry)

या समाजात सापांना सुरक्षित ठेवण्यासाठी कडक नियमही करण्यात आले आहेत. एखाद्याच्या पेटीतून साप मेला, तर पश्चात्ताप म्हणून त्या कुटुंबातील सर्व सदस्यांना मुंडण करावे लागते. यासोबतच सापाच्या नावाने शोकसभेचे आयोजनही करावे लागते. त्यामुळे हे लोक सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करतात, जेणेकरून सापांना कोणतीही इजा होणार नाही. त्याचबरोबर येथील लहान मुलेही त्या विषारी सापांना घाबरत नसून, त्यांच्यासोबत अगदी बिनधास्तपणे खेळताना दिसतात. (Snakes as Dowry)


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.