Weird laws for women- महिलांसाठी नेहमीच काही ना काही नियम बनवले जातात. प्रत्येक देशाचे आपले स्वत: चे नियम आणि कायदे आहेत. बहुतांशकरुन महिलांच्या अधिकारासंबंधित सोशल मीडियात बोलले जाते. परंतु तुम्हाला माहिती आहे का की, जगातील असे काही देश आहेत जेथे महिलांचे मुलभूत हक्क सुद्धा हिरावून घेतले जातात. असाच एक देश तुर्कमेनिस्तान आहे. जेथे विचित्र पद्धतीचे शासन चालते.
तुर्कमेनिस्तानता एक लँन्ड-लॉक्ट शहर आहे, म्हणजेच त्याची सीमा कोणत्याही समुद्राला मिळालेली नाही. हा देश १९९१ मध्ये बनला पण त्याआधी तो सोवित संघाच्या ताब्यात होता. १९९१ मध्ये त्याची निर्मिती झाल्यानंतर २००६ पर्यंत तो एकाच राष्ट्रपतींकडून चालवण्यात आला. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर यावर डिक्टेटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रपती गुरबांगुली यांनी आपले अधिकार सुरु केले आहेत.
या देशात बहुतांश नियम हे विचित्र आहेत. नुकत्याच तुर्कमेनिस्तानातील एक स्टोरी खुप व्हायरल झाली होती. जेथे एक महिला ब्युटी पार्लरमध्ये गेली असता तिच्या नवऱ्याने तिला भरलोकांमध्ये मारहाण केली होती आणि तिच्यावर कायदेशीर कारवाई केली.
खरंतर येथे ब्युटीपार्लरमध्ये ‘ही’ गोष्ट केल्यास तुरुंगवास होतो
नुकत्याच येथे महिलांसंबंधितच्या नियमात बदल करण्यात आला आहे. नव्या नियमानुसार ब्युटी पार्लरमध्ये जाणाऱ्या महिला चुकीच्या आहेत. तेथे आयब्रो करणे, नेल एक्सटेंन्शन करणे, टॅटू काढणे, ब्युटी इंजेक्शन घेणे, केसांना कलर करणे ही कामे बेकायदेशीर आहेत. मात्र ब्युटी पार्लरमधील काही गोष्टींसाठी सूट दिली असली तरीही बहुतांश सुविधांवर बंदीच आहे. अशातच महिलेचा पती किंवा पुरुष पालक तिला शिक्षा देऊ शकतो. तिच्यावर कायद्याअंतर्गत कारवाई सुद्धा होऊ शकते.
कपडे घालण्यावर ‘या’ प्रकारची बंदी
तुर्कमेनिस्तानात सांस्कृतिक वस्रांशिवाय जर महिलांनी कोणतेही कपडे घातल्यास तर ते सेक्सी नसावेत. येथे सेक्सीचा अर्थ जीन्स, पॅनट अशाप्रकारे केला जातो. असे कोणतेही आउटफिट जे महिलांचे अंगप्रदर्शन करेल ते येथे मान्य केले जात नाही.(Weird laws for women)
कारच्या पहिल्या सीटवर बसू शकत नाहीत महिला
-महिला कारच्या समोरील पहिल्याच सीटवर बसू शकत नाहीत. त्याचसोबत पुरुष ड्रायव्हर्स अशा महिलांना आपल्या गाडीत बसवू शकत नाही जिच्या परिवारातील पुरुष मंडळी सोबत नसतील.
-तीन-चार महिलांना जरी एकत्रितपणे टॅक्सीमधून प्रवास करायचा असेल तरीही तो करु दिला जात नाही. अशातच त्यांना पाई चालत जाण्याची शिक्षा दिली जाईल.
-ऐवढेच नव्हे तर एखादी महिला कारमध्ये एकटीच असेल तर तिला कागदपत्र दाखवावे लागतात की, ती महिला ड्रायव्हरची नातेवाईक आहे.
हे देखील वाचा- अफगाणिस्तान मधील ‘या’ महिलांमुळे देशातील स्रियांचे बदलले आयुष्य
महिलांना दिले जात नाही ड्रायव्हिंग लायसन्स
या देशामध्ये २०१८ पासून महिलांना वाहनाचा परवाना देणे किंवा ज्यांच्याजवळ आधीपासूनच ड्रायव्हिंग लायसन्स आहे त्यांना रिन्यू करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. असे अशासाठी केले की, सरकारचे असे मानणे आहे महिलांकडून अधिक अपघात होतात. त्याचप्रमाणे जेथे पुरुष मंडळी काम करतात तेथे महिलांना काम करण्याची परवानगी नाही. या व्यतिरिक्त महिलांना अशा संघटना बनवण्याची परवानगी नाही ज्या त्यांच्या अधिकारांसाठी आहेत.