Home » अनोखे क्लिनिक! विचित्र कपड्यांमध्ये राहतात कर्मचारी आणि डॉक्टर

अनोखे क्लिनिक! विचित्र कपड्यांमध्ये राहतात कर्मचारी आणि डॉक्टर

0 comment
Share

तुम्ही पाहिलं असेल की, अनेकांना डॉक्टरकडे किंवा दवाखान्यात जाण्याची भीती वाटते. त्यांच्या मनात डॉक्टरांबद्दल भीती असते. जेव्हा हे लोक आजारी पडतात, तेव्हा त्यांना डॉक्टरांकडे नेणे खूप कठीण असते. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच डॉक्टरांना पाहून त्यांच्या हृदयाचे ठोके वाढतात. (Weird Clinic)

अशा रुग्णांसाठी जपानमध्ये एक अनोखे क्लिनिक उघडण्यात आले आहे. येथे तुम्हाला कोणताही डॉक्टर किंवा कर्मचारी त्यांच्या ड्रेसमध्ये दिसणार नाही. या क्लिनिकमध्ये तुम्हाला सर्व लोक विचित्र कपड्यांमध्ये दिसतील. खरं तर, रुग्णाच्या मनातून डॉक्टरांची भीती घालवण्यासाठी, या क्लीनिकमध्ये वेगवेगळे कपडे घातले जातात. जेणेकरून ते त्यांच्या दातदुखीबद्दल मोकळेपणाने बोलू शकतील आणि उपचारही घेऊ शकतील. (Weird Clinic)

मेड थीम क्लोदिंग स्टाफ

हे अनोखे डेंटल क्लिनिक जपानची राजधानी टोकियो येथील अकिबामध्ये आहे. येथील कर्मचारी आणि डॉक्टरांचा पेहराव पाहून ते एखाद्या क्लिनिकमध्ये काम करतात, असे अजिबात वाटत नाही. अकिबा डेंटल क्लिनिकमधील कर्मचाऱ्यांना मेड थीमच्या कपड्यांसाठी चांगली पसंती मिळत आहे. डॉक्टर किंवा हॉस्पिटलचे नाव ऐकताच घाबरणाऱ्या रुग्णांचे लक्ष विचलित करण्यासाठी, हे अतिशय उपयुक्त ठरले आहे. (Weird Clinic)

हे देखील वाचा: जगातील सर्वात महागडी उशी, बनवायला लागली तब्बल १५ वर्षे

मेड थीम क्लोदिंग स्टाफ

हे अनोखे डेंटल क्लिनिक जपानची राजधानी टोकियो येथील अकिबामध्ये आहे. येथील कर्मचारी आणि डॉक्टरांचा पेहराव पाहून ते एखाद्या क्लिनिकमध्ये काम करतात, असे अजिबात वाटत नाही. अकिबा डेंटल क्लिनिकमधील कर्मचाऱ्यांना मेड थीमच्या कपड्यांसाठी चांगली पसंती मिळत आहे. डॉक्टर किंवा हॉस्पिटलचे नाव ऐकताच घाबरणाऱ्या रुग्णांचे लक्ष विचलित करण्यासाठी, हे अतिशय उपयुक्त ठरले आहे. (Weird Clinic)

रुग्णांची भीती कमी करण्याच्या प्रयत्न

डेली स्टारच्या वृत्तानुसार, स्वच्छतातज्ज्ञ क्लिनिकमध्ये असे गणवेश परिधान करत असतात. क्लिनिकचे संचालक डॉ. जोजी युकावा सांगतात की, काही लोक डेंटिस्टकडे जायलाही घाबरतात. अनेकांना दातांचा फोबिया असतो. अशा स्थितीत कर्मचाऱ्यांना वेगळ्या ड्रेसमध्ये पाहून, ते आरामात आपली समस्या सांगू शकतात आणि त्यांच्यावर उपचार करणेही सोपे जाते. (Weird Clinic)

कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, अशा गणवेशातील कर्मचाऱ्यांसाठी रुग्णांकडून वेगळे शुल्क आकारले जात नाही. विचित्र कपड्यात उपस्थित कर्मचाऱ्यांसोबत रुग्णांचे चांगलेच जमत आहे. या प्रकारची सेवा व्हाईटनिंग, कॅविटी ट्रीटमेंट आणि डेंटल क्लीनिंग दरम्यान प्रदान केली जाते. (Weird Clinic)


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.