Home » Weight Loss : वजन कमी करण्यासाठी सकाळी या गोष्टी कराच

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी सकाळी या गोष्टी कराच

by Jyotsna Kulkarni
0 comment
Weight loss
Share

आजच्या आधुनिक काळात वजन वाढ ही सर्वात मोठी समस्या बनली आहे. प्रत्येकी १० व्यक्तींमागे ७ व्यक्ती लठ्ठपणाची शिकार होताना दिसत आहे. बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, फास्टफूड खाण्याच्या सवयी आदी अनेक कारणांमुळे लोकांमध्ये झपाट्याने वजन वाढ दिसून येत आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक जणं विविध प्रकारचे उपाय करताना दिसतात. आहारामध्ये जमेल तसा बदल करतात, नियमित व्यायाम करण्याचा प्रयत्न करतात. मात्र तरीही त्यांना अपेक्षित परिणाम दिसून येत नाही. रस्ताही आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर काय करावे याबद्दल सांगणार आहोत. हे उपाय किंवा बदल करून नक्कीच तुमचे वजन कमी करण्यासाठी फायदा होईल यात शंका नाही. (Weight Loss)

वजन कमी करण्यासाठी चांगली झोप घेणे अतिशय आवश्यक आहे. खाण्यापिण्याच्या योग्य सवयी आणि नियमित व्यायाम करण्यासह रोज पुरेशा प्रमाणात झोप घ्यावी. रोज कमीत कमी आठ तास झोपणे आवश्यक आहे. रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठणे आरोग्याच्या दृष्टीने खूपच लाभदायक असते. जर तुमची झोप कमी झाली किंवा तुम्ही रात्री उशिरापर्यंत जागत असाल तर तुमची भूक वाढते. भूक लागल्याने अतिरिक्त आहार पोटात जातो आणि चयापचय नीट होत नाही. परिणामी वजन वाढते. (Marathi)

सकाळी उठल्याउठल्या ग्लासभर पाणी पिणं शरिरासाठी अत्यंत फायद्याचे असून पचनक्रीयेसंबंधित असणारे त्रास कमी होण्यास याने मदत होते. ब्रश करण्याच्या आधी पाणी प्यायल्यास तर आणखी फायदा होत असल्याचं तज्ञ सांगतात. उठल्यावर पाणी प्यायल्यानं पोटात अन्न साठून राहत नाही, आणि वजन कमी होण्यास मदत होते. तुम्ही जमेल तर लिंबू आणि मध घालून पाणी देखील रोज पिऊ शकता. लिंबू आणि मधाचे पाणी वजन कमी करण्यास मदत करते. यासाठी तुम्ही सकाळी उठल्यानंतर १ ग्लास कोमट पाण्यात पाव तुकडा लिंबाचा रस मिक्स करावा आणि त्यात १ चमचा मध घालावे. याचे रोज सेवन केल्याने वजन लवकर कमी होण्यास मदत मिळते. तसंच लिंबू आणि मध हे पचनक्रिया डिटॉक्स करण्यासाठी उत्तम ठरते. (Health Care)

Weight loss

जिऱ्याच्या पाण्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते. यासाठी तुम्ही १ चमचा जिरे रात्रभर १ ग्लास पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी या जिऱ्याच्या पाण्याचे सेवन करावे. वजन कमी करण्यासह पोटाच्या आरोग्यासाठीही याचा फायदा मिळतो. याशिवाय ओवा हा सामान्य सर्दीच्या व्हायरसशी लढा देण्याचे काम करते याशिवाय पोटासंबंधित त्रासही ओव्यामुळे कमी होतात. मात्र याशिवाय वजन कमी करण्यासाठीही याचा उपयोग करून घेता येतो. रात्री १ ग्लास पाण्यात १ चमचा ओवा भिजवा आणि सकाळी उठून हे पाणी उकळा. कोमट झाल्यावर गाळून हे पाणी प्या. (Top Marathi News)

सूर्यप्रकाशात राहणे त्वचा आणि डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. सूर्यप्रकाश आपल्याला व्हिटॅमिन डी प्रदान करते. तसेच हाडांसाठी आणि एकूण आरोग्यासाठी देखील चांगले आहे. उठताच किमान ३० मिनिटे सूर्यप्रकाशात घालवण्याचा प्रयत्न करा. यामुळे चयापचय वाढतो आणि आपल्या शरीरात कॅलरीज जलद बर्न होण्यास मदत होते. तसंच सूर्यप्रकाश घेतल्यानं सेरोटोनिन, आनंदाचे संप्रेरक वाढवते. हे कॉर्टिसोल संतुलित करते आणि चरबी जमा होण्यास प्रतिबंध करते. झोपेच्या समस्या असलेल्यांसाठी देखील हे फायदेशीर आहे. (Latest Marathi Headline)

एका रिपोर्टनुसार, वजन कमी करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये तेलकट-तिखट पदार्थांऐवजी प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करावा, यामुळे जास्त प्रमाणात भूक लागत नाही आणि वजन कमी होण्यासही मदत मिळते. वजन कमी करण्यासाठी सकाळी आरोग्यदायी गोष्टी खाणे ही एक उत्तम सवय आहे. प्रथिनेयुक्त पदार्थ खाल्ल्याने तुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते. साखरयुक्त आणि गोडाधोडाचं खाणं टाळल्यानं शरिरात कॅलरिज जमा होत नाहीत. परिणामी वजन कमी होण्यास मदत मिळते. चहा कॉफी बंद करणं शक्य नसेल तर किमान प्रमाण कमी करत करत बंद करण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. आहारात हिरव्या पालेभाज्या, फायबरयुक्त पदार्थ, फळे, वरण किंवा पातळ पदार्थ, दुग्धजन्य पदार्थ, प्रोटीन अशा सर्व पोषण असणाऱ्या पदार्थांचा समावेश करा. जेवणाची वेळ रोज एकसारखी ठेवा. (Top Trending News)

===========

Baby Care : तूप की नारळाचे तेल, लहान बाळांच्या मसाजसाठी काय वापरावे? घ्या जाणून

===========

मॉर्निंग वर्कआउट्स हा दिवसाचा टोन सेट करण्याचा एक चांगला मार्ग आहे. सकाळच्या वजन कमी करण्याच्या सवयींचा सर्वात मोठा पैलू म्हणजे सातत्याने व्यायाम करण्याची प्रेरणा मिळणे. वजन कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर व्यायाम करावा, वजन कमी करण्यासाठी हा प्रभावी उपाय मानला जातो. नियमित तुम्हाला आवडणारे व्यायाम करा, जसे की योगा, नृत्य इत्यादी. यामुळे रक्ताभिसरण वाढेल, पचनाच्या समस्या दूर होतील आणि तुमचे पाय आणि हातातील स्नायूंचे पेटके टाळता येतील. (Social News)

(टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कोणतेही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.