Home » किचनमधील हे 5 मसाले करतील पोटावरील चरबी कमी

किचनमधील हे 5 मसाले करतील पोटावरील चरबी कमी

वजन कमी करण्याबद्दल ज्यावेळी बोलले जाते त्यावेळी हेल्दी डाएट आणि एक्सरसाइजकडे अधिक लक्ष दिले जाते. पण तुम्ही घरातील किचनमधील काही वस्तूंचा वापर करूनही वजन कमी करू शकता.

by Team Gajawaja
0 comment
Weight Loss
Share

Weight Loss : वजन कमी करण्याबद्दल ज्यावेळी बोलले जाते त्यावेळी हेल्दी डाएट आणि एक्सरसाइजकडे अधिक लक्ष दिले जाते. पण तुम्ही घरातील किचनमधील काही वस्तूंचा वापर करूनही वजन कमी करू शकता. खरंतर वेलची, बडीशेप, काळी मिरी, आल आणि हळद असे मसाले तुमच्या पोटावरील चरबी करण्यास मदत करू शकतात.

मेथी
मेथी तुम्हाला वजन कमी करण्यास नक्कीच मदत करेल. मेथीच्या दाण्यांमध्ये हेटेरो पॉली सॅकेराइड गॅल्कोमेनन गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. जे शरिरातील फॅट्स कमी करण्यास मदत करतात. एक चमचा मेथीचे दाणे रात्रभर भिजत ठेवा. सकाळी मेथीच्या दाण्यांचे पाणी प्या.

दालचिनी
दालचिनी गरम मसाल्यांपैकी एक आहे. पुलाव असो किंवा भाजी अथवा नॉन-व्हेज डिश, दालचिनीचा वापर बहुतांश पदार्थांमध्ये वापर केला जातो. याशिवाय दालचिनीचे सेवन केल्याने शरिरातील चरबी कमी होण्यास मदत होते. याशिवाय दालचिनीमध्ये अँटी-ऑक्सिडेंट्ससह अन्य पोषण तत्त्वे भरपूर प्रमाणात असतात, जे तुमचा मेटाबॉलिक रेट वेगाने वाढवतात. अशातच तुमचे वजन वेगाने कमी होऊ शकते. तुम्ही सकाळी दालचिनीमध्ये अन्य गरम मसाला मिक्स करुन चहा पिऊ शकता.

Weight loss diet, include these 8 herbs and spices for faster result |  Health - Hindustan Times

हळद
शरिरातील दुखणे दूर करण्यासाठी हळद अतिशय गुणकारी मानली जाते. हळदीमध्ये करक्युमिन भरपूर प्रमाणात असते. यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. यामुळे गरम पाण्यात एक इंच कच्ची हळद किसून ती उकळवून प्या. असे पाणी सकाळी उपाशी पोटी प्यायल्याने वेगाने वजन कमी होण्यास मदत होते.

वेलची
वेलची शरिरातील मेटाबॉलिक रेट वाढवते. ज्यामुळे पोटाच्या आसपास जमा झालेली चरबी कमी होण्यास मदत होते. वेलचीमध्ये अँटी-ऑक्सिडेंट्ससह अन्य पोषण तत्त्वे असतात. जे वजन नियंत्रण ठेवण्यास मदत करततात. याचे सेवन केल्याने केवळ वजन कमीच नव्हे तर शरिरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासह ब्लड शुगरचा स्तर कंट्रोलही होते. (Weight Loss)

बडीशेप
बडीशेप आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. यामुळे तुमची भूक खूप वेळ कंट्रोल राहण्यास मदत होते. याशिवाय शरिरात जमा झालेले फॅट्स कमी होतातत. बडीशेपचे सेवन केल्याने तुमची पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत देखील होते.


आणखी वाचा :
हिवाळ्यात शरीराचे तापमान गरम राहण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स
उपाशीपोटी आवळा खाण्याचे हे आहेत आश्चर्यचकीत करणारे फायदे
वयाच्या 35 नंतर व्यायाम करताना या गोष्टी ठेवा लक्षात

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.