Home » थंडीच्या दिवसात वाढलंय वजन? वेट लॉससाठी ‘या’ टीप्स जरुर वापरा

थंडीच्या दिवसात वाढलंय वजन? वेट लॉससाठी ‘या’ टीप्स जरुर वापरा

by Team Gajawaja
0 comment
Weight Loss in Winter
Share

थंडीच्या दिवसात आपण थोडे आळशी होते. या गोष्टीवर बहुतांश जण होकार ही देतात. कारण थंडीच्या दिवसात आपल्या शरिराची हालचाल फार कमी होते आणि आपल्याला अधिकाधिका भूक लागत राहते. परंतु ही स्थिती फिटनेसकडे लक्ष देणाऱ्या आणि वजन कमी करणाऱ्यांसाठी एक आव्हान असते. अशातच तुमच्यासोबत ही स्थिती निर्माण होत असेल तर आम्ही तुम्हाला काही सीक्रेट्स सांगणार आहोत. (Weight Loss in Winter)

थंडीत तुम्ही थोडासा आळशीपणा करुन ही तुमचे वजन कमी करु शकता. तुम्हाला फक्त हेच करायचे आहे की, थोड्या समजूतदारपणाने काही गोष्टी कराव्या लागणार आहेत. अशातच थंडीच्या दिवसात वजन वाढले असेल तर पुढील काही टीप्स तुमच्या कामी येणार आहेत.

-हर्बल गरम पाणी
संपूर्ण दिवसात सुंठ टाकून उकळलेले गरम पाणी तुम्ही पिऊ शकता. असे पाणी तुम्ही थंडी आणि पावसाळ्यावेळी ही पिऊ शकत.

हे कसे तयार कराल?
-१ लीटर पाण्यात केवळ अर्धा चमचा सुंठ टाका
-ते तोपर्यंत उकळवा की त्यामधील पाणी कमी होईल
-असे केल्यानंतर दिवसभर तु्म्ही हे पाणी कधी ही थोड्याथोड्या वेळाने पिऊ शकता
-आयुर्वेदात सुंठला शुंथि नावाने ओळखले जाते
-हे आलं जसे असते त्याचप्रमाणे दिसते

फायदे
-चयापचयाच्या क्रियेत सुधार होते
-वजन कमी करण्यास मदत होते
-सर्दी, खोकला दूर राहतो
-सूज येणे, गॅस किंवा पोट दुखी कमी करते

पुढील व्यायाम तुम्ही दररोज करु शकता

-कपालभाति प्राणायम
यामुळे तुमचा मेटाबॉलिज्म उत्तम होण्यास मदत होते. तसेच पोटाच्या मसल्स मजबूत होतात आणि पाचक्रिया सुधारते. शरिरातील सर्व नाड्या शुद्ध होतात आणि शरिरातील रक्ताचा पुरवठा योग्य प्रमाणे होतो.

-सुर्यनमस्कार
सुर्यनमस्कार केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. चेहऱ्यावर ही ग्लो येतो आणि पचनक्रिया सुधारते. मासिक पाळी वेळेवर येण्यास मदत होते.

-चालणे
हेल्थी वजन राखण्यासाठी आणि शरिराची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही वॉकसाठी जाऊ शकता. हृदयासंदर्भातील रोग, स्ट्रोक, हाय ब्लडप्रेशन, कॅन्सर, टाइप २ मधुमेहासह विविध स्थिती मॅनेज करतात. कार्डियोवस्कुलर फिटनेस मध्ये सुधारणा होते. एनर्जीचा स्तर वाढला जातो. (Weight Loss in Winter)

सर्केडियन इंटरमिटेंट फास्टिंग
तुम्ही सुर्यास्त झाल्यानंतरच खाऊ शकता. जसे सकाळी ९-१०-११ ते संध्याकाळी ५-६-७ पर्यंत कधीही खाऊ शकता .

हे देखील वाचा- हिवाळ्यात तुमचे पाय अधिक थंड पडतात का? ‘हे’ असू शकते कारण

सर्केडियन फास्ट
जर तुम्हाला तुमचा नाश्ता सुर्योदयानंतर आणि रात्रीचे जेवण सुर्यास्तापूर्वी करत असाल तर सर्केडिन फास्ट फॉलो करा

इंटरमिटेंट फास्टिंग
तुम्हा ८-१० तासांपर्यंत खाऊ शकता. तसेच फास्टिंग पिरियडला १४-१६ तासापर्यंत ठेवू शकता.

परंतु हे सर्व करण्याव्यतिरिक्त लक्षात ठेवा की, डीप फ्राय, साखरेचे पदार्थ, मैद्याचे पदार्थ किंवा पाकिट बंद पदार्थ खाणे टाळा. त्याचसोबत सोडा, पेप्सी सुद्धा पिणे कमी करा.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.