Home » 90-30-50 च्या डाएट प्लॅनने फटाफट वजन होईल कमी, फॉलो करण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

90-30-50 च्या डाएट प्लॅनने फटाफट वजन होईल कमी, फॉलो करण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

गेल्या काही वर्षांमध्ये वजन कमी करण्याचे काही आधुनिक फंडे वापरले जातात. वजन कमी करण्यासाठी बहुतांशजण डाइटिशियन किंवा न्युट्रिशियनिस्टला संपर्क साधत स्ट्रिक्ट डाएट रुटीन फॉलो करतात.

by Team Gajawaja
0 comment
Weight Loss in Winter
Share

Weight Loss Diet Plan : गेल्या काही वर्षांमध्ये वजन कमी करण्याचे काही आधुनिक फंडे वापरले जातात. वजन कमी करण्यासाठी बहुतांशजण डाइटिशियन किंवा न्युट्रिशियनिस्टला संपर्क साधत स्ट्रिक्ट डाएट रुटीन फॉलो करतात. यामुळे भले वजन कमी होते.पण याचे काही दुष्परिणामही आरोग्यावर होतात. एक्सपर्ट्स असे मानतात की, या कारणास्तव लोकांमध्ये मानसिक ताण वाढला जातो आणि फायद्याऐवजी अधिक नुकसान होते. खरंतर आजकाल मार्केटमध्ये वेगाने वजन कमी करण्यासाठी 90-30-50 चा डाएट प्लॅन फॉलो केला जातो. पण हा डाएट प्लॅन नक्की काय आहे जाणून घेऊया अधिक….

या डाएटमध्ये कार्ब्स आणि फॅटच्या उत्तम इंटेकचा सल्ला दिला जातो. खरंतर कार्ब्स हे प्रोटीन आणि कार्ब्सच्या माध्यमातून फायबरचा इंटेक वाढवला जातो. यामुळे आपली पचनसंस्था सुधारण्यासह मेटाबॉलिज्मचा रेटही सुधारला जातो.

90-30-50 डाएट प्लॅन नक्की काय आहे?
एक्सपर्ट्स असे मानतात की, यामध्ये तुम्हाला 90 टक्के पोषण तत्त्वांनी भरपूर फूड, 30 टक्के कॅलरीज आणि हेल्दी फॅट्ससह 50 टक्के कार्बोहाइड्रेट्सच्या रेश्योचे पालन करावे लागते.

कशा प्रकारे काम करते
एक्सपर्ट्स म्हणतात की, या डाएट प्लॅनला फॉलो केल्याने तुम्हाला हेल्दी सवयी लागतात. यामुळे आरोग्य सुधारले जाते. खरंतर लीन प्रोटीन्समुळे स्नायूंचा उत्तम विकास होतो. याशिवाय तृणधान्यापासून शरिराला उर्जा मिळते. (Weight Loss Diet Plan)

अशा प्रकारे करा फॉलो
90-30-50 चा डाएट प्लॅन फॉलो करण्यासाठी तुम्ही फळं आणि भाज्या खाण्याची सवय लावा. याशिवाय तृणधान्य, ब्राउन राइस सारखे पदार्थ खा. हिवाळ्यात तुम्ही संत्र्याचे सेवन करा. कारण यामध्ये फायबर आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. व्हिटॅमिन सीमुळे त्वचेला ग्लो येतो. तसेच तुम्ही पोटासंबंधित समस्यांपासून दूर राहता.

या गोष्टींची घ्या काळजी
तुम्हाला वेगाने वजन कमी करायचे असल्यास शरिर अधिकाधिक हाइड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा. यासाठी संपूर्ण दिवसभरात तीन ते चार लीटर पाण्याचे सेवन करा. याशिवाय फळांचेही सेवन करा. पाण्याची शरिरात कमतरता निर्माण झाल्यास खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थितीत पचले जात नाही. यामुळे अधिकाधिक प्रमाणात पाणी प्या.

(टीप : या लेखातील माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. ‘gajawaja.in’ याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर, वैद्य किंवा तज्ञांशी संपर्क साधावा.)


आणखी वाचा :
‘या’ फूड्समुळे होते तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी
हिवाळ्यात सांधेदुखीपासून दूर राहण्यासाठी करा ही सोपी योगासने
इन्स्टेंट नूडल्स खायला आवडतात का? आधी हे वाचा

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.