लठ्ठपणा ही एक जागतिक महामारी आहे, परंतु योग्य ते वजन नसणे किंवा गरजेपेक्षा अधिक बारीक असणे देखील कमी वजनाच्या लोकांसाठी एक मोठी समस्या आहे. कमी वजन असणे हे बर्याचदा खराब पोषण किंवा अंतर्गत आरोग्याच्या स्थितीचा परिणाम असते आणि पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्ये ही गोष्ट दिसून येते. मात्र महिलांमध्ये या गोष्टीचा विशेष त्रास जाणवतो. जसे वजन कमी झाले किंवा गरजेपेक्षा वजन कमी असेल तर केस गळणे, त्वचा कोरडी होणे, प्रजनन समस्या आणि दात खराब होणे यासारख्या बऱ्याच गोष्टी वजन कमी असण्याशी संबंधित आहेत. गंभीर गोष्टीबद्दल बोलायचे झाले तर कमी वजनाच्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते किंवा त्यांना ऑस्टिओपोरोसिस होऊ शकतो.जर तुम्ही ही या समस्येतून जात असाल तर आजचा लेख तुमच्यासाठी आहे. काही ठराविक गोष्टी आणि पदार्थ खाऊन तुम्ही तुमचे वजन वाढवू शकता. (Weight gain Tips)

वजन वाढवण्यासाठी एक फळ खाण्याचा सल्ला नेहमी दिला जातो आणि ते फळ म्हणजे केळ. केळी आणि दूध खाल्ल्याने तुमचं वजन वाढवता येतं असं तुम्ही लोकांना म्हणताना ऐकलं असेल. पण तुम्हाला माहित आहे का की तुम्ही केळी आणि तूप खाऊन देखील तुमचं वजन वाढवू शकता. होय, आजचा लेख याच विषयावर आहे. आज आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून केळी आणि तूप खाऊन आपले वजन कसे वाढवू शकता हे सांगणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात.
– वजन वाढवायचं असेल तर नाश्ता म्हणून केळी आणि तूप खाऊ शकता. त्यासाठी केळी चांगलं मॅश करून घ्या आणि त्यात तुमच्या आवडी नुसार तूप घाला. आता बनवलेल्या मिश्रणाचे सेवन करा. असे केल्याने वजन वेगाने वाढण्यास मदत होते.
– दुधासोबत केळी आणि तूपाचे ही सेवन करू शकता.त्यासाठी एक ग्लास दुधात केळी मिसळून त्यावर चमचाभर तूप घालावे.आणि या मिश्रणाचे सेवन करा. (Weight gain Tips)

– केळी आणि तुपाबरोबर मधाचे सेवन ही करू शकता.त्यासाठी एका बाऊलमध्ये केळी मिसळून त्यावर एक चमचा तूप आणि मध मिसळा. बनवलेल्या मिश्रणाचे सेवन करा.
– तुम्ही एका भांड्यात तूप आणि केळी मिसळा, आता हे मिश्रण दुधात उकळून मिक्स करा. रोज याचे सेवन केल्याने वजन वाढण्यास मदत होऊ शकते.
================================
( हे देखील वाचा: दूध आणि गुळाचे एकत्र सेवन केल्याने होतील हे आश्चर्यचकीत करणारे फायदे )
================================
लक्षात घ्या तुम्हाला सतत तेच तेच खाऊन कंटाळा येत असेल तर वजन वाढीसाठी जास्त कॅलरीयुक्त पदार्थ योग्य सुद्धा असतात परंतु हिरव्या भाज्या देखील वजन वाढण्यास खूप मदत करतात. यामध्ये अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात आणि ते पोट निरोगी ठेवतात. ज्यामुळे पचनसंस्था व्यवस्थित चालते आणि अन्नाचे पचन व्यवस्थित होते.वाजनाने कमी असलेल्या लोकांसाठी वजन वाढविणे अवघड काम नाही. आपल्याला फक्त आपले ध्येय निश्चित करणे आणि ते साध्य करण्यासाठी संयम बाळगणे आवश्यक आहे. आपण संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या आणि आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक पूरक आहार घेत राहावे. यामुळे तुमचे वजन तर वाढेलच, शिवाय तुम्ही निरोगी सुद्धा रहाल.
(डिस्क्लेमर: वरील लेख केवळ माहितीच्या आधारावर लिहिला गेला आहे. कोणताही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.)