काही वेळेस अचानक केस गळण्यास सुरुवात होतेच. पण अन्य काही लक्षण सुद्धा दिसून येतात जसे की, वजन वाढणे, थकवा जाणवणे. परंतु तुम्हाला सुद्धा एकाच वेळी अनेक लक्षण दिसून येत असतील तर समजून जा थायरॉइड (Thyroid) संदर्भातील समस्येचा तुम्ही सामना करत आहात. थायरॉइड हे गळ्याच्या भागात होते. गलगंड हे अधिक प्रमाणात किंवा कमी प्रमाणात थायरॉइडचे हार्मोन्स तयार करण्यास सुरुवात करतात. त्यामुळे आपल्याला त्रास व्हायला सुरुवात होते. सध्या केस गळणे, वजन वाढणे, चेहऱ्यावर केस येणे सारख्या समस्या दिसून येऊ शकतात. दरम्यान, हार्मोन्सला संतुलित करणे सुद्धा सोप्पे आहे. तर जाणून घेऊयात अशी कारणे ज्यामुळे तुमचे वजन वाढलेय किंवा केस गळणे ही नक्की थायरॉइडची लक्षण आहेत की नाही.
थायरॉइलडमुळे का केस गळण्यास सुरुवात होते?
अभ्यासानुसार थायरॉइडमध्ये केस गळण्यास सुरुवात होऊ शकते. खरंतर थायरॉइडच्या ग्रंथीतून निघणारे टी३, टी४ हार्मोन केसांच्या विकासासाठी मदत करतात. हे दोन्ही केसांच्या पिगमेंटेशनवर नियंत्रण ठेवण्याचे काम दोघेही करतात. या दोन्हीपैकी कमी-जास्त असल्यास केस अधिक गळू लागतात.
केसांसंबंधित लक्षण कोणती असू शकतात?
-जेव्हा केस पातळ होतात
-केस अधिक ड्राय होतात
-चेहऱ्याच्या दुतर्फा केसांची समस्या अधिक वाढू लागल्यास
-केस अधिक गळू लागतात
हे देखील वाचा- प्रेग्नेंसीदरम्यान अधिक वजन वाढलेय? नियंत्रणात ठेवण्यासाठी फॉलो करा ‘या’ टीप्स
वजनासंबंधित लक्षण
हायपर थायरॉइडिज्म ज्यामध्ये थायरॉइड (Thyroid) अधिक झालेले असते. या दरम्यान, वजन कमी होणे, चिंता वाटणे, रात्री झोपण्यास समस्या, पाहण्यास समस्या, हृदयांच्या ठोक्यांमध्ये बदल सारखी लक्षण दिसू शकतात. हायपो थायरॉईडीझममध्ये ज्यामध्ये थायरॉइडचे प्रमाण कमी होते, वजन वाढण्यासारखी लक्षणे दिसतात.
या व्यतिरिक्त थायरॉइड होण्यामागे काही कारण असू शकतात. जसे की, अधिक तणावाखाली असाल तर थायरॉइड हार्मोनच्या सक्रियतेवर परिणाम होतो. आहारात अधिक-कमी प्रमाणात मीठ असल्यास थायरॉइडच्या ग्रंथी विशेष रुपात प्रभावित होतात. तसेच थायरॉइड हा अनुवांशिक सुद्धा अस शकतो. दरम्यान, जेव्हा ही सर्व लक्षण दिसून येत असतील तर थायरॉइडची चाचणी जरुर करुन घ्या. त्यावेळी तुमचे थायरॉइड कमी जास्त झालेय का हे सुद्धा पहा. दररोज डॉक्टरांनी दिलेली औषधे घेतल्यास थायरॉइड संतुलित राहू शकते. तसेच तंदुरुस्त आरोग्यासाठी सुद्धा काही गोष्टी मर्यादित खाणे गरजेचे असते. त्यामुळे थायरॉइडची समस्या अधिक वाढण्यापेक्षा त्यावर वेळीच उपचार घेतल्यास तो बरा होऊ शकतो.