Home » आठवड्याभरासाठीचा असा असावा वर्कआउट प्लॅन

आठवड्याभरासाठीचा असा असावा वर्कआउट प्लॅन

by Team Gajawaja
0 comment
Weekly workout plan
Share

पुरेशी झोप, मानसिक शक्ती आणि आनंदाचा स्तर व्यवस्थितीत असेल तर तुम्ही कोणत्याही गोष्टी अगदी सुरळीत करु शकता. त्यापैकीच एक महत्वाचा भाग म्हणजे व्यायाम. सकाळी उठल्यानंतर ते घराबाहेर पडेपर्यंत तुमचे शेड्युल कसे असते यावर तुमचा संपूर्ण दिवस अवलंबून असतो. सुट्टीच्या दिवशी आराम केला तर अन्य दिवशी व्यायाम करणे फार महत्वाचे असते. दररोज व्यायाम करावा पण एक दिवस तरी शरिराला आराम द्यावा. अशातच तुम्ही तुमच्या वर्कआउटचे आठवड्याभरासाठी एक शेड्युल तयार करु शकता. तज्ञांनुसार तुम्ही कार्डिओ किंवा स्ट्रेंथ एक्सरसाइज ही करु शकता. तर जाणून घ्या तुमचा आठवड्याभरासाठीचा वर्कआउट प्लॅन कसा असला पाहिजे. (Weekly workout plan)

सोमवार-अप्पर बॉडी स्ट्रेंथ ट्रेनिंग
डंबल्स काही वेळेस जड वाटू शकतात. पण तुम्ही जर बॉडी स्ट्रेंथ ट्रेनिंग करत असाल तर यामुळे तुमची ताकद वाढतेच पण एखादी दुखापत होण्यापासून ही तुम्ही दूर राहता. त्यामुळे सोमवारी तुम्ही हा वर्कआउट करु शकता. दररोज ४५-५० मिनिट हा वर्कआउट करा. जर स्ट्रेंथ ट्रेनिंग संबंधित एखादी समस्या असेल तर ट्रेनरला विचारा आणि त्यानंतरच तो करा.

मंगळवार-लोअर बॉडी स्ट्रेंथ ट्रेनिंग
मंगळवारी तुम्ही शरिर फिट रहावे म्हणून लोअर-बॉडी स्ट्रेंथ
ट्रेनिंग करु शकता. यामुळे तुमचे स्नायू सक्रिय होतातच. पण ब्लड सर्कुलेशन ही व्यवस्थितीत होते. लोअर बॉडीच्या माध्यमातून कार्डियोवॅस्कुलर हेल्थ आणि फिटनेस राखण्यासह अन्य काही फायदे सुद्धा यामुळे होतात.

बुधवार- अधिक हैवी वर्कआउट नको
आपल्या आठवड्याभराच्या व्यायामाचा थकवा दूर करण्यासाठी या दिवसी अधिक हैवी वर्कआउट करु नका. जर तुम्ही सोमवारी आणि मंगळवारी हैवी वर्कआउट करत असाल तर यादिवशी नॉर्मल वर्कआउट करा. जसे की, सायकल चालवणे, स्विमिंग असे काही. कारण स्नानूंना यावेळी आराम दिला तर ते लवकर रिकव्हर ही होतात.

Weekly workout plan
Weekly workout plan

गुरुवार-हिट वर्कआउट
हा वर्कआउट करण्यासाठी फार वेळ लागत नाही. पण तुमच्या अधिक कॅलरीज बर्न होतात. परंतु हा वर्कआउट तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार करा. थकवा वाटला तर थांबा आणि पुन्हा सुरु करा. हिट वर्कआउट हा कमीत कमी २० मिनिटे तरी करा. (Weekly workout plan)

शुक्रवार-टोटल बॉडी स्ट्रेंथ ट्रेनिंग
बहुतांश लोक जिममध्ये गेल्यानंतर केवळ आपले बायसेप्स आणि ६ पॅक एब्स बनवण्यावरच अधिक लक्ष देतात. परंतु फिट रहायचे असेल तर तुम्ही संपूर्ण शरिराचा व्यायाम केला पाहिजे. जेव्हा तुमचे संपूर्ण शरिर ग्रोथ करेल तेव्हा तुमची एक वेगळीच पर्सनालिटी दिसेल. त्यामुळे टोटल बॉडी स्ट्रेंथ ट्रेनिंगवेळी प्रत्येक अवयवाचा समांतर वर्कआउट करावा.

शनिवार-स्टेडी स्टेट कार्डिओ
स्टेडी स्टेट कार्डिओ व्यायामामुळे तुमच्या शरिरासह आरोग्याचे हेल्थ ही उत्तम राहते. आपल्या हृदयात अधिक वसा आणि कॅलरीज जमा होतात. कार्डिओ केल्याने हृदय रोगासंबंधित आजार दूर होतात. कार्डिओ करताना तो तुमच्या क्षमतेनुसार करा. जर तुमची क्षमता अधिक असेल तर अधिक फॅट बर्न होण्यास लवकर मदत होईल.

हेही वाचा- तोंड उघडे ठेवून झोपण्याची सवय अस्थमाचे कारण ठरु शकते

रविवार- आराम करा
रविवारी तुम्ही पूर्णपणे शरिराला आराम द्या. या दिवशी कोणताही वर्कआउट करु नका. परिवारासोबत वेळ घालवा किंवा बाहेर फिरायला जा. जेणेकरुन तुमचे स्नायू सुद्धा यामुळे रिलॅक्स होतील आणि पुढील आठवड्यात तु्म्ही पुन्हा वर्कआउट करण्यासाठी तयार रहाल.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.