Home » ‘या’ राशिच्या लाेकांच्या नोकरीत बढती बदलीचे योग

‘या’ राशिच्या लाेकांच्या नोकरीत बढती बदलीचे योग

by Team Gajawaja
0 comment
Weekly Horoscope
Share

राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, साप्ताहिक आठवडा कसा जाणार याचा अंदाज वर्तविण्यात येतो. ज्यामध्ये सर्व राशींचे वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते. चला मग जाणून घेऊया, या वर्षातल्या शेवटच्या आठवड्याचे राशिभविष्य (Weekly Horoscope 26 Dec to 01 Jan)

मेष – आपल्या राशीच्या कर्मस्थानातून बुध, शुक्र, शनि बरोबर चंद्राची युती होत आहे. तेव्हा कर्मस्थानातून होणारा लक्ष्मीनारायण योग आपली आवक वाढवणारा राहील. लक्ष्मीची उपासना केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढेल. व्यवसायातील कामांना गती मिळेल. नवीन संधी चालून येतील. नोकरीत बढती बदलीचे योग येतील. नवीन कार्यारंभ कराल. स्वकर्तृत्वाने, मेहनतीने हाती घेतलेल्या कार्याचे उत्तम नियंत्रण आणि नियोजन करून आपण त्यात यशस्वी व्हाल. आपला आत्मविश्वास वाढेल. उत्साही वृत्ती आपले व्यक्तिमत्व उजळून टाकेल. कर्मस्थानातील शुक्र कलाकारांना अनुकूल राहील. अभिनय, कलाक्षेत्रात आपल्याला चांगले प्राविण्य मिळवता येईल. मित्र परिवाराचे चांगले सहकार्य लाभेल. अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. उत्तरार्धात धाडसी निर्णय घेतले जातील.

शुभ दिनांक – 26 ते 28

वृषभ – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या भाग्यस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. भाग्यस्थानातील ग्रहाधिक्य आपला वैयक्तिक उत्कर्ष वाढवणारे राहील. बुध शुक्र शनीची युती मेहनतीने आपली आवक वाढवणारी राहील. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल. कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तीच्या प्रकृतीची काळजी वाटेल. अंगभूत कलागुणांना चांगला भाव मिळेल. कलाकार, लेखकांना विशेष प्रसिद्धीचे योग येतील. पुरस्कार जाहीर होतील, नावलौकिक, प्रतिष्ठा लाभेल. कुटुंबीयांसाठी सुंदर भेटवस्तू खरेदी केल्या जातील. आपल्या संततीस उच्चशिक्षणासाठी परदेशी पाठवण्याचे आपले प्रयत्न यशस्वी होतील. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. अनपेक्षित अर्थलाभ होतील. सहलीत सहभागी व्हाल. स्पर्धा परीक्षातून यश लाभेल.

शुभ दिनांक – 29 ते 1

मिथुन – राशीच्या अष्टमस्थानातून बुध, शुक्र आणि शनिवारून चंद्राचे भ्रमण होत आहे. कामात बदल घडवून येतील. हे बदल आपल्या चांगल्यासाठीच राहणार आहेत. अनपेक्षित वित्त लाभ होईल. सासुरवाडीकडून लाभ होतील. महत्त्वाचे निर्णय घेताना आपल्या बोलण्यामुळे कुठेही फसू नका, कोणालाही न पूर्ण करता येण्यासारखे आश्वासन देऊ नका. कुटुंबात महत्त्वाचे निर्णय घेताना जोडीदाराबरोबर संगनमताने चर्चा करून घ्यावेत. अध्यात्मिक कार्यात रुची वाढेल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना चांगल्या संधी लाभतील. नोकरीत बढती बदलीचे योग येतील. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. दाताच्या अथवा त्वचेच्या विकारांपासून सुटका होईल. कौन्सिलिंग, शिक्षणक्षेत्र अथवा बँकेशी संबंधित नोकरी असणाऱ्यांना फायदा होईल.

शुभ दिनांक – 29 ते 1

कर्क – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या सप्तमसस्थानातील बुध, शुक्र आणि शनिवरून चंद्राचे भ्रमण होत आहे. भागीदारी व्यवसायातून कामाचा व्याप वाढवाल. नवीन कार्यारंभ केले जातील. जोडीदाराचे चांगले सहकार्य लाभेल. विवाह इच्छुक तरुणांना मनपसंत जोडीदार मिळेल. नोकरीच्या चांगल्या संधी चालून येतील. लेखक, कवी, कलाकार तसेच मार्केटिंग क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या तरुणांना हा आठवडा शुभफलदायी राहील. धाडसी निर्णय घेतले जातील. प्रगतीची अनेक कवाडे खुली होतील. कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा एखादा सल्ला लाखमोलाचाा ठरेल. चांगले अर्थार्जन होईल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल. आठवड्याच्या उत्तरार्धात भाग्य स्थानातील गुरुवरून होणारे चंद्राचे भ्रमण अध्यात्मिक उन्नती करणारे राहील. तीर्थस्थळांना भेटी द्याल. नवीन संधी चालून येतील.

शुभ दिनांक – 26, 27.

सिंह – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या षष्ठस्थानातून बुध, शुक्र आणि शनिवारून चंद्राचे भ्रमण होत आहे. नोकरी व्यवसायात नवीन संधी लाभतील. दीर्घकाळ चालणारी मोठी कामे स्वीकाराल. धीरापोटी फळे रसाळळ गोमटी हे लक्षात ठेवा. अथक परिश्रमातून आपले ध्येय यशस्वीपणे पूर्णत्वास जाईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षातून चांगले यश लाभेल. नवीन संधी चालून येतील. इतके दिवस चालू असलेली द्विधा मनस्थिती दूर होऊन योग्य मार्ग मिळेल. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. विद्यार्थ्यांच्या उत्कर्षास हा आठवडा अनुकूल राहील. जोडीदाराचे चांगले सहकार्य लाभेल. अंधश्रद्धेला बळी पडू नका. उत्तरार्धात कामानिमित्त प्रवास घडून येतील.

शुभ दिनांक – 28 ते 1

कन्या – राशीच्या पंचमस्थानातून राशीस्वामी बुध, धनेश शुक्र आणि पंचमेश शनि यांच्या वरून चंद्राचे भ्रमण होत आहे. संततीच्या सुवार्ता कानी येतील. अनपेक्षित धनलाभ होतील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षातून चांगले यश लाभेल. मनोरंजनाच्या कार्यक्रमातून आनंद घ्याल. शुभ ग्रहांच्या शुभ परिणामांमुळे सकारात्मक ऊर्जा वाढून वातावरण आनंदी बनेल. थकवा दूर होईल. नशिबाची चांगली साथ लाभणार आहे मित्र परिवाराच्या सहकार्याने, सल्ल्याने एखादे रेंगाळलेले काम मार्गी लागेल‌. नेत्रविकार, त्वचाविकार तसेच आरोग्याच्या इतर तक्रारी दूर होतील. दूरचे प्रवास घडतील, त्यातून आनंद मिळेल आणि लाभ होतील. नोकरीतील पॉलिटिक्सना सामोरेे जावे लागेल. परंतु तुम्हाला त्यातून बाहेर पडण्यासाठी योग्य मार्ग मिळत जातील.

शुभ दिनांक – 29, 30.

तूळ – राशीच्या सुखस्थानात ग्रहाधिक्य असल्यामुळे आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी मिळणार आहे. भावंडांचे तसेच कुटुंबीयांचे चांगले सहकार्य लाभणार आहे. आपल्या विचारांना नवी दिशा मिळेल. गोड बोलून आपली कामे मार्गी लावता येतील. ध्येयपूर्ती होईल. नवीन वाहन वास्तूचे योग आहेत. कामाचा व्याप वाढेल परंतु सहकार्यांचे सहाय्य लाभल्याने आपल्या कामाला गती येईल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या अनुकूल फलदायी असे ग्रहमान आहे आपल्या आवडीच्या कोर्ससाठी ऍडमिशन मिळेल. कुटुंबीयांसाठी वेळ द्याल. गृहसजावटीसाठी आकर्षक शोभेच्या वस्तूंची खरेदी केली जाईल. धार्मिक क्षेत्रात प्रगती होईल. तीर्थस्थळांना भेटी द्याल. संसर्गजन्य आजारांचा त्रास होऊ शकतो, तेव्हा प्रकृती अस्वास्थ्याकडे दुर्लक्ष करू नका.

शुभ दिनांक – 26, 27

वृश्चिक – आपल्या राशीच्या पराक्रमस्थानातून शनि, बुध, शुक्र यांच्यावरून चंद्राचे भ्रमण होत आहे. धाडसी निर्णय घेतले जातील. आज पर्यंतच्या आपल्या रिंगाळलेल्या कामांना गती मिळेल. मोठे निर्णय घेताना भावंडांचा सल्ला लाख मोलाचा ठरेल. सहलीत सहभागी व्हाल. करमणुकीच्या कार्यक्रमातून आनंद मिळेल. गोड बोलून आपली कामे मार्गी लावता येतील. गैरसमज दूर होतील. इम्पोर्ट एक्स्पोर्ट संबंधीचे व्यावसायिकांसाठी हा आठवडा अनुकूल फलदायी ठरेल. घरात धार्मिक शुभ समारंभाचे आयोजन केले जाईल. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश लाभेल. स्पर्धा परीक्षांचे निकाल आपल्या अनुकूल लागतील. डोकेदुखी, उष्णतेचे विकार, नेत्र विकार यांचा त्रास संभवू शकतो. आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे.

शुभ दिनांक – 28 ते 30

धनु – आठवड्याच्या सुरुवातीला जनहितार्थ कामे केली जातील. आपल्या मतांचा समाजात आदर होईल. आपल्या कामांचा चांगला ठसा उमटवाल. जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारातून फायदा होईल. जुनी व्यावसायिक येणी वसूल होतील. कुटुंबीयांसाठी मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल. संतसज्जनांचा सहवास लाभेल. हातून दानधर्म होईल. चतुर्थातून होणाऱ्या गुरुच्या भ्रमणामुळे हंसयोग होत आहे तर उत्तरार्धात तेथून चंद्राचे भ्रमण होत असल्यामुळे गजकेसरी योग होत आहे. आपल्या वैयक्तिक उत्कर्षाच्या दृष्टीने आपणास अतिशय अनुकूल ग्रहमान लाभले आहे तेव्हा महत्त्वाची कामे सहजतेने मार्गी लागतील. वित्तलाभ होईल. कामानिमित्त अनपेक्षितपणे परदेश प्रवास घडू शकतात. पूर्णपणे कामात घडून न जाता आपल्या आहार विहारावर लक्ष ठेवावे कारण अपचनाचे त्रास संभवू शकतात.

शुभ दिनांक – 29 ते 1

मकर – बुध, शुक्र आणि शनि या मित्र ग्रहांचे आपल्या राशीतून होणारे भ्रमण आपल्या मेहनतीला योग्य न्याय देणारे राहील. आजवर आपल्या प्रगतीत येणारे अडथळे दूर होतील कामाचा ताण वाढेल. नवीन कार्यारंभ केले जातील. सतत कामात व्यग्र रहाल. स्वतंत्र व्यावसायिकांना अनेक संधी चालून येतील. महत्त्वाचे निर्णय घेताना योग्य व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल. घरातील वातावरण अतिशय आनंदी राहील. सामाजिक पतप्रतिष्ठाा उंचावेल. स्वतःसाठी मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाईल. आपल्या वक्तृत्वाची चांगली छाप पडेल. कुटुंबात धार्मिक शुभ समारंभाचे आयोजन केले जाईल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागेल. जुने रेंगाळलेल्या आजारांपासून मुक्तता मिळेल. हातून दानधर्म होईल.

शुभ दिनांक – 28, 29.

कुंभ – आपल्या राशीच्या व्ययस्थानातून बुध, शुक्र आणि शनीचे भ्रमण होत आहे, तर आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण देखील तेथूनच होत आहे. नव्या उत्साहाने कामाला लागाल. संततीच्या उच्चशिक्षणासाठी परदेशी पाठवण्याचे प्रयत्न करत असाल तर त्यात यश येईल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ होतील तसेच शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाईल. संशोधनपर अभ्यासक्रमातून यश लाभेल. मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाईल. आपली इच्छापूर्ती होणाऱ्या घटना घडतील. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. रेंगाळलेली सरकारी कामे मार्गी लागतील. कुटुंबीयांबरोबर बोलताना कोणतेही चुकीचे ग्रह करून घेऊ नयेत. आपल्या चुका सुधारून वागल्यास गैरसमज होणार नाहीत. कॉम्प्युटर तसेच टेक्निकल क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांसाठी हा आठवडा अनुकूल राहील सर्दी, खोकला, कफाचा त्रास जाणवू शकतो.

शुभ दिनांक – 27, 28

मीन – आपल्या राशीतून राशीस्वामी गुरुचे तर लाभस्थानातून बुध, शुक्र आणि शनीचे भ्रमण होत आहे. हंसयोग, गजकेसरी योग तसेच लाभस्थानातून होणारा शशयोग आपल्या मेहनतीला योग्य न्याय देणारे राहतील. आपल्या कामाची दखल घेतली जाईल. नोकरीत बढती बदलीचे योग संभवतात. आपल्या कामात प्रयत्नपूर्वक लक्ष घातल्यास चांगली प्रगती साधता येईल. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. आहार विहाराच्या वेळा पाळल्या तर अपचनाचे त्रास होणार नाहीत. शेअर्स तसेच लॉटरीतून लाभ होतील. धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. जोडीदाराला नोकरी व्यवसायात फायदा होईल. आपल्या राशीवर व राशीतील गुरुवर शनीची दृष्टी असल्यामुळे नवीन कामाचे आयोजन करावे परंतु कार्यारंभ टाळावेत.

शुभ दिनांक – 29 ते 1

  • श्री बालाजी ज्योतिषालय आणि वास्तू कन्सल्टन्सी, पुणे 

9011149780 / 8668293104

टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असू असेही नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.