Home » ‘या’ राशींना होणार मालमत्तेच्या व्यवहारातून लाभ

‘या’ राशींना होणार मालमत्तेच्या व्यवहारातून लाभ

by Team Gajawaja
0 comment
Weekly Horoscope
Share

प्रत्येकजणला आपल्या जीवनात पुढे काय होणार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. मग ते करिअरच्या बाबतीत असो, आरोग्याच्या बाबतीत असो, धन लाभाच्या बाबतीत असो की अगदी प्रेमाच्या बाबतीत… त्यामुळे हा आठवडा बारा राशींसाठी कसा असेल, कोणत्या राशींवर कुठल्या ग्रहांचा प्रभाव असेल हे जाणून घेऊयात…(Weekly Horoscope 20 Mar to 26 Mar)

मेष – आपल्या राशीत आलेले बुध, शुक्र आणि राहू आपला वैयक्तिक उत्कर्षास पूरक आहेत. आपल्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. संगीत तसेच कलाक्षेत्रात चांगली प्रगती होईल. वाणीचाकारक बुध ग्रह आपल्या राशीतून भ्रमण करत असल्यामुळे वाक्चातुर्याच्या जोरावर मोठ मोठी कामे यशस्वी करता येतील. आठवड्याच्या सुरुवातीला लाभस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण व्यावसायिक उत्कर्षास अनुकूल ठरेल. विविध उपक्रम हाती घेऊन यशस्वी कराल. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. कामानिमित्त प्रवास घडतील. मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाईल. उंची वस्त्रालंकारांची खरेदी होईल. महत्त्वाची कागदपत्रे हाती लागतील. स्थावर मालमत्तेच्या व्यवहारातून लाभ होतील.

शुभ दिनांक – 23 ते 25

वृषभ – राशीच्या दशमस्थानातून चंद्राचे होणारे भ्रमण नोकरी व्यवसायाच्या नवीन संधी देणारे राहील. व्ययस्थानातील बुध, शुक्र, राहू आणि हर्षल कामानिमित्त प्रवास घडवतील. विदेशात आपल्या व्यवसाया संबंधी गुंतवणूक केली जाईल. सामाजिक, राजकीय क्षेत्रात प्रतिष्ठा उंचावेल. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग राहील. धनस्थानातील व्ययेश मंगळामुळे परदेशातून आवक वाढेल. नवनवीन उपक्रम राबवण्यात यश येईल. आपल्या जीवनशैलीत चांगला बदल घडेल. उंची वस्त्रालंकारांची खरेदी केली जाईल. आपल्या वक्तृत्वाचा इतरांवर चांगला प्रभाव पडेल. प्रवासातून कार्यसिद्धी होईल. आपल्या अंगभूत कला गुणांना चांगलावाव मिळेल.

शुभ दिनांक – 20, 21

मिथुन – आपल्या राशीतून मंगळ, लाभस्थानातून बुध, शुक्र, राहू, हर्षल दशमस्थानातून रवी गुरु तर भाग्यस्थानातील शनीवरून चंद्राचे भ्रमण होत आहे. महत्त्वाचे निर्णय मोठ्या धाडसाने घेतले जातील. भाग्यस्थानातील शनिच्या भ्रमणामुळे उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचे प्रयत्न करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना यश लाभेल. संशोधनपर अभ्यासक्रमातून नवीन शोध लावले जातील. आपल्या मेहनतीच्या व कर्तृत्वाच्या जोरावर नवीन जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. प्रकृतीच्या तक्रारी दूर होतील. रेंगाळलेली सरकारी कामे मार्गी लागतील. कर्मस्थानातील रवी आणि गुरु आपणास अनेक संधी उपलब्ध करून देतील. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ होतील. सामाजिक क्षेत्रात नावलौकिक मिळेल. लेखक कलाकारांना आपल्या क्षेत्रात चांगल्या संधी चालून येतील.

शुभ दिनांक – 21, 22

कर्क – अष्टमस्थानातील शनिवरून चंद्राचे भ्रमण होत आहे. मन अस्वस्थ होणाऱ्या घटना घडण्याची शक्यता राहते. प्रकृतीच्या जुन्या तक्रारी डोके वर काढतील. भाग्यस्थानातील रवी व गुरुमुळे अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. तीर्थस्थळांना भेटी द्याल. संत सज्जनांचा सहवास लाभेल. तरुणांना सरकारी नोकरीच्या संधी चालून येतील. रेंगाळलेल्या सरकारी कामाला गती येईल. दशमस्थानातील बुध, शुक्र, राहूमुळे लेखकांच्या हातून झालेल्या दर्जेदार लिखाणास पुरस्कार मिळतील, कविता कलाकारांना चाहत्यांकडून चांगली दाद मिळेल. करमणुकीच्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. मात्र कोणत्याही फसव्या भूलथापांना बळी पडू नये.

शुभ दिनांक – 23 ते 25

सिंह – सप्तमस्थानातील शनीचा होणारा शशयोग वैवाहिक जीवनात सौख्य आणणारा राहील. भागीदारी व्यवसायातून नवीन कार्यारंभ केले जातील. आपल्या मेहनतीला योग्य न्याय मिळून आपला आर्थिक उत्कर्ष होण्याच्या दृष्टीने पूरक ग्रहमान आहे. व्यवसायाचा विस्तार होण्याच्या दृष्टीने अनेकांचे सहकार्य लाभेल. अंधश्रद्धेला बळी पडू नका. कोर्ट कचेरीची कामे तूर्तास पुढे ढकलावीत. प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये. उष्णतेचे विकार, नेत्र विकार, मधुमेह यांचा त्रास होऊ शकतो. आठवड्यात च्या उत्तरार्धात सहलीत सहभागी व्हाल. मनोरंजनाच्या कार्यक्रमातून आनंद लुटाल. भाग्यतील बुध, शुक्र आपला उत्साह द्विगुणीत करतील.

शुभ दिनांक – 24 ते 26

कन्या – आपल्या राशीच्या षष्ठस्थानातील शनिवरून चंद्राचे भ्रमण होत आहे.प्रकृतीच्या जुन्या तक्रारी डोके वर काढण्याची शक्यता राहते. वातविकार, सांधेदुखी यांचा त्रास होण्याची शक्यता राहते. विरोधकांच्या कारवायांवर मोठ्या शिताफीने मात कराल. कोर्ट कचेरीच्या कामातून आपल्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता राहते. जोडीदाराचे चांगले सहकार्य लाभेल. विवाहेच्छूक तरुणांना मनपसंत जोडीदार मिळेल. भागीदारी व्यवसायातून नवीन कार्यारंभ करता येतील. नवीन संधी चालून येतील. या संधींचा भविष्यात आपणास चांगला फायदा होईल. स्थावर मालमत्तेतून लाभ होतील. अनपेक्षित पैसा हाती येईल. आठवड्याच्या उत्तरार्धात कामानिमित्त प्रवास होतील.

शुभ दिनांक – 21 ते 23

तूळ – आपल्या राशीच्या पंचमस्थानातील शनिवरून चंद्राचे भ्रमण होत आहे. आपल्या व्यवहारी, स्वार्थीवृत्तीत वाढ होण्याची शक्यता राहते. स्थावर मालमत्तेच्या व्यवहाराची कामे मार्गी लागतील. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचे प्रयत्न करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुकूल कालावधी राहील. संशोधनपर अभ्यासक्रमातून यश लाभेल. स्पर्धा परीक्षांतून फायदा होईल. मनाजोग्या ठिकाणी नोकरी मिळेल तसेच सरकारी नोकरीचे प्रयत्न करत असाल तर यश मिळेल. मातुल घराण्याचे सहकार्य लाभेल. सप्तमास्थानातील बुध, शुक्र आणि राहू यामुळे भागीदारी व्यवसायात नवीन कार्यारंभ होतील. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. समाजात चांगला नावलौकिक लाभेल. वैवाहिक सौख्य लाभेल. जोडीदाराच्या सहकार्याने रेंगाळलेली कामे मार्गी लावता येतील.

शुभ दिनांक – 22 ते 24

वृश्चिक – आपल्या राशीच्या सुखस्थानातून शनीवरून चंद्राचे भ्रमण होत आहे. घराच्या नूतनीकरणासाठी वेळ द्याल. मातृसौख्य लाभेल. घरात पाहुण्यांची वर्दळ राहील. दिनांक 22 रोजी मीन राशीतील गुरु वरूनमीन राशीतील गुरु वरून होणाऱ्या चंद्रभ्रमणामुळे संत सज्जनांचा सहवास लाभेल. तीर्थस्थळांना भेटी दिल्या जातील. अध्यात्मिक प्रगती होईल. विद्यार्थ्यांसाठी अतिशय अनुकूल कालावधी आहे. उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळवण्याच्या प्रक्रियेत यश लाभेल. सरकारी नोकरीच्या प्रयत्नात असणाऱ्या तरुणांना चांगल्या संधी चालून येतील. बड्या व्यक्तींचे सहकार्य लाभेल. नोकरीत स्त्री अधिकारी वर्गाकडून मदत होईल. महत्त्वाची कागदपत्रे हाती लागतील. आपल्या अंगभूत कला गुणांना चांगला वाव मिळेल‌. सामाजिक, राजकीय क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल.

शुभ दिनांक – 23 ते 25

धनु – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या तृतीयस्थानातून स्वराशीतून शनीवरून चंद्राचे भ्रमण होत आहे. आपली वाचनाची आवड जोपासता येईल. विविध विषयातील पुस्तके वाचनात येतील. लेखकांच्या हातून दर्जेदार लिखाण होईल. घरात शुभ समारंभाचे आयोजन होईल. भावंड सौख्य लाभेल. नवीन जीवनशैली स्वीकाराल. आपल्या आयुष्यात नाविन्यपूर्ण घडामोडी घडतील. अंगभूत कला गुणांना चांगला वाव मिळेल. करमणुकीच्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. सहलीचे आयोजन केले जाईल. मित्र परिवाराबरोबर वेळ मजेत घालवाल. संतती संबंधी सुवार्ता कानी येतील. चैनीच्या वस्तूंची खरेदी केली जाईल.

शुभ दिनांक – 23 ते 26

मकर – आपल्या राशीच्या धनस्थानात शशयोग होत आहे, म्हणजेच स्वराशीचा शनि आपली आर्थिक बाजू भक्कम करणारा राहील. तेथूनच होणारे चंद्राचे भ्रमण अर्थाजनाचे नवीन मार्ग देईल. कुटुंबातील वयस्कर व्यक्तींचे सहकार्य लाभेल. जुनी येणी वसूल होतील. पराक्रमस्थानातील रवी आणि गुरु अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती करण्यास अनुकूल ठरतील. धाडसी निर्णय घेतले जातील. भावंडांचे सहकार्य लाभेल. रेंगाळलेली सरकारी कामे मार्गी लागतील. विविध व्यावसायिक उपक्रम राबवले जातील. घरातील सुख सुविधा वाढवण्याच्या दृष्टीने अत्याधुनिक वस्तूंची खरेदी कराल. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासासाठी अनुकूल कालावधी आहे. सामाजिक, राजकीय क्षेत्रातून पुरस्कार मिळतील.

शुभ दिनांक – 22 ते 24

कुंभ – राशीस्वामी शनी वरून चंद्राचे भ्रमण होत आहे. आपली आवक वाढून खर्च कमी होण्याची शक्यता राहते. आपल्या राशीत होणारा शशयोग आपल्या मेहनतीला योग्य न्याय देणारा राहील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींची पतप्रतिष्ठा उंचावेल. धनस्थानातील रवी आणि गुरुमुळे उत्पन्नाचे अनेक स्त्रोत निर्माण होतील. घरात शुभ समारंभाचे आयोजन होईल. बड्या व्यक्तींच्या घराला पाय लागतील. आपल्या मतांचा कुटुंबात आदर केला जाईल. आपली महत्वाकांक्षा आणि मेहनतीच्या जोरावर मोठी मजल माराल. भावंड सौख्य लाभेल. कामानिमित्त प्रवास घडतील. उत्तरार्धात कुटुंबीयांना वेळ देता येईल. घरातील वातावरण आनंदी, उत्साही राहील.

शुभ दिनांक – 20 ते 22

मीन – शनी व गुरु यांचे अनुक्रमे कुंभ आणि मीन या आपल्या स्वराशीतून होणारे भ्रमण आपणास अनेक चांगल्या संधी देणारे राहील. अनेक नवीन गोष्टी शिकता येतील. नवनवीन क्षेत्रात आपली प्रतिमा उजळून टाकाल. आपल्या बोलण्याने इतरांना आपलेसे कराल. हा आठवडा आपल्यासाठी आर्थिक पाठबळ देणारा राहील. कुटुंबातील सदस्यांसंबंधी स्वार्थाकांनी येतील. आपल्या मेहनतीला योग्य न्याय मिळवून स्वकष्टार्जित धनामध्येे वाढ होईल. द्वितीय स्थानातील बुध, शुक्रामुळे कुटुंबात शुभकार्य ठरतील. जिभेचे चोचले पुरवले जातील. व्यापार उद्योगातून स्तुत्य उपक्रम राबवून यशस्वी केले जातील.

शुभ दिनांक – 22 ते 24

  • श्री बालाजी ज्योतिषालय आणि वास्तू कन्सल्टन्सी, पुणे 

9011149780 / 8668293104

टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असू असेही नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.