Home » ‘या’ राशींच्या तरुणांना नोकरी व्यवसायात मिळणार चांगली संधी पण…

‘या’ राशींच्या तरुणांना नोकरी व्यवसायात मिळणार चांगली संधी पण…

by Team Gajawaja
0 comment
Weekly Horoscope
Share

प्रत्येकजणला आपल्या जीवनात पुढे काय होणार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. मग ते करिअरच्या बाबतीत असो, आरोग्याच्या बाबतीत असो, धन लाभाच्या बाबतीत असो की अगदी प्रेमाच्या बाबतीत… त्यामुळे हा आठवडा बारा राशींसाठी कसा असेल, कोणत्या राशींवर कुठल्या ग्रहांचा प्रभाव असेल हे जाणून घेऊयात…(Weekly Horoscope 17 Apr to 23 Apr)

मेष – आपल्या राशीतून रवी, बुध, राहू आणि हर्षल तर धनस्थानातून शुक्र आणि पराक्रमस्थानातून मंगळाचे भ्रमण होत आहे. लाभस्थानातील शनिवरून चंद्राचे होणारे भ्रमण आपणास शुभफलदायी ठरेल. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. इच्छित गोष्टी साध्य होतील. भविष्यकाळाच्या दृष्टीने गुंतवणूक करण्यात यश लाभेल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. मित्र परिवाराबरोबर सहलीचे आयोजन केले जाईल. तीर्थस्थळांना भेटी द्याल. आपली वैयक्तिक कामे मार्गी लावण्यासाठी प्रवास करावा लागेल. नशिबाची चांगली साथ मिळाल्यामुळे प्रवासातून कार्यसिद्धी होईल. व्यावसायिक प्रदर्शनातून चांगला वित्तलाभ होईल. आपल्या संभाषण चातुर्याच्या जोरावर स्वजनांना आपलेसे कराल. उत्तरार्धात घरातील वातावरण आनंदी राहील. धनस्थानातील धनेश शुक्र आपली आर्थिक बाजू भक्कम करणारा राहील. शुभ समारंभाचे आयोजन होईल.

शुभ दिनांक – 20, 21

वृषभ – राशीस्वामी शुक्राचे स्वराशीतून होणारे भ्रमण आपणास आनंददायी ठरेल. तर दशमातून दशमेश शनीवरून होणारेे चंद्राचे भ्रमण तरुणांना नोकरी व्यवसायात चांगल्या संधी देणारे राहील. वडीलधाऱ्या व्यक्तींचे चांगले सहकार्य लाभेल. लाभस्थानातील गुरुवरुन होणाऱ्या चंद्राच्या भ्रमणामुळे समोर आलेल्या चांगल्या संधींचा फायदा घ्याल. आपली इच्छापूर्ती होणाऱ्या घटना घडतील. व्ययस्थानात मेष उच्चराशीतीत आलेला रवी आपणास धाडसी निर्णय घेण्यास प्रवृत्त करेल. व्ययस्थानातील रवी, बुध, राहू आणि हर्षलमुळे कामानिमित्त प्रवास घडतील. परंतु आपल्या कामाची आखणी करताना प्रकृतीकडे मात्र दुर्लक्ष करू नये. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. समाजात आपली प्रतिष्ठा वाढेल अशी खरेदी केली जाईल.

शुभ दिनांक – 22, 23

मिथुन – राशीतील मंगळामुळे आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी येणार आहे. भाग्यस्थानातील शनि वरून चंद्राचे भ्रमण होत असल्याने विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रातून नावलौकिक लाभेल. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्यात यश येईल. तरुणांच्या कौशल्याला चांगला भाव मिळेल. नोकरीच्या सुसंधी लाभतील. नोकरीत बढती बदलीचे योग संभवतात. धार्मिक शुभ समारंभात सहभागी व्हाल. लाभातील रवी, बुध, राहू मुळे प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचे योग येतील. सामाजिक, राजकीय क्षेत्रातून नावलौकिक वाढेल. मित्र परिवाराचे चांगले सहकार्य लाभेल. आपली इच्छापूर्ती होणाऱ्या घटना घडतील. स्वतंत्र विचारसरणीमुळे महत्त्वाचे निर्णय धाडसाने घेतले जातील. या आठवड्यात कितीतरी आनंदाचे क्षण आपल्या वाट्याला येणार आहेत. उंची वस्त्रालंकारांची खरेदी होईल. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा चांगला ठसा उमटवाल.

शुभ दिनांक – 22, 23

कर्क – अष्टमस्थानातील शनिवरून चंद्राचे होणारे भ्रमण जुन्या वास्तूतून तसेच स्थावर मालमत्तेतून लाभ दर्शवते. स्थावरासंबंधीचे व्यवहार मार्गी लागतील. व्यवसाय उद्योगातील जुनी येणी वसूल होतील. भाग्यस्थानातील गुरू नेपच्यूनवरून होणारे चंद्रभ्रमण आध्यात्मिक प्रगती दर्शवते. तीर्थस्थळांना भेटी द्याल. हातून दानधर्म होतील. अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. दशमस्थानातील रवीमुळे सरकारी नोकरीचे प्रयत्न करत असलेल्या तरुणांना यश लाभेल. इम्पोर्ट एक्सपोर्ट संबंधी व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचा कामाचा व्याप वाढण्याची शक्यता दिसून येते. व्यवसायातील महत्त्वाचे सौदे पार पाडण्यासाठी प्रवास करावा लागेल. नव्या जोमाने कामाच्या विस्ताराचा ध्यास घ्याल. आपल्या संभाषण चातुर्यामुळे स्वजनांना आपलेसे करून घ्याल. नात्यातील दुरावा दूर होईल. लाभातील शुक्रामुळे करमणुकीच्या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घ्याल.

शुभ दिनांक – 20, 21

सिंह – आपल्या राशीच्या सप्तमास्थानातील सप्तमेश शनीवरून चंद्राचे भ्रमण होत आहे. भागीदारी व्यवसायातील जुनी येणी वसूल होतील. नवीन कामे मिळतील. आपल्या कामात होणारी वेगवान प्रगती आपणास निश्चित जाणवेल. या आठवड्यातील ग्रहांची बैठक आपल्याला पूरक आणि समाधान देणारी असेल. कुटुंबातील वयस्कर व्यक्तींच्या कर्तव्य भावना जागृत होतील. एकीकडे कौटुंबिक जबाबदाऱ्या तर दुसरीकडे व्यवसाय उद्योगात होणारी धावपळ यामुळे होणारी तारेवरची कसरत आपल्याला नवनवीन अनुभव देणारी राहील. महत्त्वाची कागदपत्रे हाती लागतील परंतु कोणत्याही कागदपत्रांवर सह्या करण्यापूर्वी योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन घ्यावे. भाग्यस्थानातील बुधामुळे लेखक, साहित्यिकयांच्या हातून झालेल्या दर्जेदार लिखाणाला प्रसिद्धी मिळेल. दशामातील शुक्र कलाकारांना नवीन संधी देणारा राहील.

शुभ दिनांक – 17

कन्या – षष्ठस्थानातील शनीवरून होणाऱ्या चंद्राच्या भ्रमणामुळे प्रकृतीच्या जुन्या तक्रारी डोके वर काढतील. कामाचा व्याप वाढल्यामुळे प्रकृतीकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता राहते. नोकरी व्यवसाय निमित्त सतत प्रवास घडून येतील. व्यवसाय वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने भावंडांचा एखादा सल्ला फार मोलाचा ठरेल. प्रवासात आपली महत्त्वाची कागदपत्रे तसेच मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. न्यायप्रविष्ट प्रकरणे तूर्तास पुढे ढकलावीत. वाहन चालवताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे.कोणत्याही भुलथापांना बळी पडू नये. आपल्या सहकाऱ्यांबद्दल गैरसमज करून घेऊ नका. आठवड्याच्या उत्तरार्धात करमणुकीच्या कार्यक्रमातून आनंद मिळेल. अनपेक्षित मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाईल.

शुभ दिनांक – 22, 23

तूळ – आपल्या राशीच्या पंचमस्थानातील शनीवरून चंद्राचे होणारे भ्रमण विद्यार्थ्यांना संशोधनपर अभ्यासक्रमातून यश देणारे राहील. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. संतती सौख्य लाभेल. संततीचा उत्कर्ष मन प्रसन्न करेल. घरात आनंदाचे वातावरण राहील नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना चांगल्या संधी चालून येतील. हितशत्रूंच्या कारवायांना सामोरे जावे लागेल, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून सतत कार्यरत राहिलात तरच आपले ध्येय गाठू शकाल. सप्तमस्थानातील रवी, बुध, राहू, हर्षलमुळे अनपेक्षित पणे भागीदारी व्यवसायातून नवीन कार्यारंभ करता येतील. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. जुनी व्यावसायिक येणी वसूल होतील. अष्टमस्थानातून अष्टमेश शुक्राचे होणारे भ्रमण अनपेक्षित धनप्राप्ती करणारे राहील.

शुभ दिनांक – 17 ते 19

वृश्चिक – आपल्या राशीच्या चतुर्थस्थानातील शनि वरून होणाऱ्या चंद्रभ्रमणामुळे कुटुंबातील वयस्कर व्यक्तीचे सहकार्य लाभेल. स्वजनांच्या गाठीभेटीतून आनंद मिळेल. पंचमस्थानातील गुरुवरुन होणाऱ्या चंद्रभ्रमणामुळे संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. नवपरिणीतांना गोड बातमीची चाहूल लागेल. तीर्थस्थळांना भेटी द्याल. अध्यात्मिक प्रगती होईल. आपल्या हातून दानधर्म होतील. प्रवासातून कार्यसिद्धी होईल. नवनवीन कल्पना आकार घेतील. नव्या जोमाने कामाला लागाल. जिद्द आणि महत्त्वाकांक्षा वाढेल. नोकरीत बढती बदलीचे योग संभवतात. आपल्या कामाची वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. उत्तरार्धात विवाहेच्छूक तरुणांना मनपसंत जोडीदार मिळेल. जोडीदाराकडून आर्थिक लाभ होतील.

शुभ दिनांक – 21 ते 23

धनु – आपल्या राशीच्या पराक्रमस्थानातील शनीवरून चंद्राचे भ्रमण होत आहे. आपल्या मेहनतीला योग्य न्याय मिळेल. संशोधनपर अभ्यासक्रमातून यश मिळेल. कुटुंबातील वातावरण आनंदी उत्साही राहील. पाहुण्यांची वर्दळ राहील. घरात शुभसमारंभाचे आयोजन केले जाईल. पंचमस्थानातील रवी, बुधामुळे लेखक, साहित्यिकांच्या हातून झालेल्या दर्जेदार लिखाणास पुरस्कार प्राप्त होतील. समाजात नावलौकिक मिळेल. कामानिमित्त अनपेक्षितपणे प्रवास घडतील. गोड बोलून आपली कार्यसिद्धी करून घ्याल. नोकरीत स्त्री अधिकारी वर्गाकडून सहकार्य लाभेल. आठवड्याच्या उत्तरार्धात आपल्या राशीच्या पंचमस्थानात येणाऱ्या गुरूमुळे संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल.

शुभ दिनांक – 20, 21

मकर – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या धनस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. जुनी व्यावसायिक येणी वसूल होतील. पारिवारिक जीवनात आनंददायी घटना घडतील. वडीलधाऱ्या व्यक्तींचे सहकार्य लाभेल. आपल्याला मिळालेल्या संधींचा फायदा घेतल्यास भविष्यात चांगले लाभ होतील. समजदारीने वागण्याची जरुरी आहे. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. व्यावसायिक प्रदर्शनातून चांगली आवक होईल. नशिबाची चांगली साथ मिळेल. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. भावंडांशी सुसंवाद साधाल. आठवड्याच्या उत्तरार्धात बड्या व्यक्तींच्या सहकार्यामुळे मोठे निर्णय घेणे सोपे जाईल. भूतदया दाखवाल. कवी, कलाकारांना आपल्या कलेला वाव देता येईल. करमणुकीच्या कार्यक्रमातून आनंद मिळेल.

शुभ दिनांक – 20 ते 22

कुंभ – आपल्या राशीतील शनिवरून चंद्राचे भ्रमण तर धनस्थानातून गुरुचे भ्रमण होत आहे. आपल्या आमदानीत वृद्धी करणाऱ्या घटना घडतील. नवीन कार्यारंभ केले जातील. स्वकर्तृत्वाच्या जोरावर मोठे निर्णय घेऊन यशस्वीपणे पार पाडले जातील. घरात मंगल कार्याची नांदी होईल. हातून पुण्यकर्म घडेल. आठवड्याच्या उत्तरार्धात आपल्या राशीच्या धनस्थानातून तृतीयस्थानात गुरुमहाराज प्रवेश करतील. पराक्रमस्थानातील रवी, बुध, गुरुमुळे आत्मविश्वासाने मोठे प्रकल्प राबवाल. स्वतःची पतप्रतिष्ठा वाढवण्याच्या दृष्टीने सतत प्रयत्नशीलल राहाल. व्यवसाय उद्योगात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल. व्यावसायात आत्मविश्वास आणि कामाचा वेग वाढेल. परदेशस्थ भावंडांशी सुसंवाद साधाल. स्थावर मालमत्तेच्या व्यवहारातून लाभ होतील. घरातील सुख सुविधा वाढवण्याच्या दृष्टीने अत्याधुनिक वस्तूंची खरेदी केली जाईल.

शुभ दिनांक – 21 ते 23

मीन – राशीच्या व्ययस्थानातील व्ययेश शनी वरून होणाऱ्या चंद्रभ्रमणामुळे प्रकृतीच्या जुन्या तक्रारी डोके वर काढण्याची शक्यता राहते. अनपेक्षित खर्च उद्भवू शकतो. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. आपल्या राशीतून राशी स्वामी गुरु धनस्थानात प्रवेश करत आहे. घरगुती स्वरूपात व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना चांगली अर्थप्राप्ती होईल. पूर्वी मिळालेल्या कामाच्या ऑर्डर्स वाढवल्या जातील. विरोधकांवर विजय मिळवाल. प्रतिस्पर्धी आपल्या मतांची सहमत होतील. आपल्या कामातील अडचणी दूर झाल्यामुळे समाधान लाभेल. आपल्या संवाद शैलीमुळे इतरांना आपलेसे कराल. आठवड्याच्या उत्तरार्धात सहलीचे आयोजन केले जाईल. भावंडांच्या गाठीभेटीतून आनंद मिळेल.

शुभ दिनांक – 22, 23

  • श्री बालाजी ज्योतिषालय आणि वास्तू कन्सल्टन्सी, पुणे 

9011149780 / 8668293104

टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असू असेही नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.