प्रत्येकाला आपल्या जीवनात पुढे काय होणार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. मग ते करिअरच्या बाबतीत असो, आरोग्याच्या बाबतीत असो, धन लाभाच्या बाबतीत असो की अगदी प्रेमाच्या बाबतीत… त्यामुळे हा आठवडा बारा राशींसाठी कसा असेल, कोणत्या राशींवर कुठल्या ग्रहांचा प्रभाव असेल हे जाणून घेऊयात… (Weekly Horoscope 10 July to 16 July)

मेष – आपल्या राशीच्या व्ययस्थानातून नेपच्यून वरून चंद्राचे भ्रमण होत आहे. तर आपल्याच राशीत गुरु राहू हर्षल आहेत. तेव्हा स्थळांना भेटी देण्याचे योग्य तील अध्यात्मिक प्रगती होईल. राजकारण, समाजकारणात अनपेक्षित नवीन संधी मिळतील. आपणासाठी काही अनुकूल बदल घडून येतील. समोर आलेल्या संधीचे सोने कराल. जुनी येणी वसूल होतील. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ होतील. उत्तरार्धात राशीतील रवीमुळे धाडसी निर्णय घेतले जातील.
शुभ दिनांक – 11, 12

वृषभ – लाभस्थानातील नेपच्यूनवरून चंद्राचे होणारे भ्रमण विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात अनुकूल राहील. विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी परदेशी जाण्याची संधी मिळेल. नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने घडणारे परदेश प्रवास यशस्वी होतील. इम्पोर्ट एक्स्पोर्टच्या व्यवसायातून लाभ होतील. सामाजिक पतप्रतिष्ठा उंचावेल. कुटुंबात आपल्या मतांचा आदर केला जाईल. या आठवड्यातील ग्रहयोग अर्थार्जनाच्या नवीन संधी देणारे राहतील.
शुभ दिनांक – 13, 14

मिथुन – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या दशमस्थानातील नेपच्यून वरून चंद्राचे भ्रमणहोत आहे. धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. राशीतील रवीमुळे आणि लाभातील गुरु, राहू, हर्षलमुळे राजकीय, सामाजिक क्षेत्रातून आपली पतप्रतिष्ठा उंचावेल. अनपेक्षित चांगल्या संधी चालून येतील. आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी लाभेल. नवनवीन उपक्रम राबवण्यात यशस्वी व्हाल. समाजात आपल्या शब्दाला चांगला मान मिळेल. उत्तरार्धात कामानिमित्त प्रवास घडून येतील. आपल्या इच्छा, आकांक्षा पूर्ण होतील.
शुभ दिनांक – 15 ते 17

कर्क – आपल्या राशीच्या भाग्यस्थानातून चंद्राचे होणारे भ्रमण वैयक्तिक उत्कर्षाच्या दृष्टीने पूरक राहील. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. हातून दान धर्म होईल. शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तरुणांना सुसंधी लाभतील. मित्र परिवाराचे चांगले सहकार्य लाभेल. आपल्या वाक् चातुर्याच्या जोरावर अनेक चांगली कामे मार्गी लावता येतील. वरिष्ठांकडून एखादी मोठी जबाबदारी आपल्यावर सोपवण्यात येईल आणि आपण ती यशस्वीपणे पार पाडाल. इम्पोर्ट एक्सपोर्टच्या व्यवसायातून चांगलीी आवक होईल.
शुभ दिनांक – 13, 14

सिंह – अष्टमस्थानातील नेपच्यूनवरून होणारे चंद्राचे भ्रमण धार्मिक तसेच गुढ शास्त्राचा ओढा वाढवणारे राहील. कोणत्याही अंधश्रद्धांना मात्र बळी पडू नका. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. राजकीय सामाजिक क्षेत्रात अनपेक्षित होणारे बदल आपणास पूरक ठरतील. तरुणांना नोकरीच्या चांगल्या संधी चालून येतील कोर्ट कचेरी, सरकारी कामे तसेच स्थावर मालमत्तेच्या व्यवहारातून फायदा होईल. बड्या व्यक्तींच्या सहकार्याने रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. राशीतील शुक्र – मंगळामुळे उंची वस्त्रालंकारांची खरेदी केली जाईल. प्रकृतीच्या तक्रारींकडे मात्र दुर्लक्ष करू नका.
शुभ दिनांक – 13 ते 15

कन्या – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या सप्तमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. जोडीदाराच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. भागीदारी व्यवसायातून नवीन कार्यारंभ केले जातील. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून कोणतेही काम सोपवू नका. अंधश्रद्धांना बळी पडू नका. मधुमेह, ब्लडप्रेशर तसेच उष्णतेच्या विकारांचा त्रास होऊ शकतो. कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी वडीलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला घ्यावा. कामानिमित्त प्रवास घडतील. नोकरीत बढती बदलीचे योग संभवतात. उंची वस्त्रालंकरांची खरेदी केली जाईल.
शुभ दिनांक – 15 ते 17

तूळ – षष्ठस्थानातून होणाऱ्या चंद्राच्या भ्रमणामुळे आपल्या आहार विहारावर नियंत्रण ठेवावे. प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. भागीदारी व्यवसायातून वादन व उद्भवण्याची शक्यता राहते. गोड बोलून आपले हित साध्य करण्याचा प्रयत्न करावा. अनपेक्षित स्थावर मालमत्तेच्या व्यवहारातून धनलाभ होऊ शकतात. सामाजिक, राजकीय क्षेत्रात होणाऱ्या मोठ्या घडामोडींचा आपणास फायदा होईल. करमणुकीच्या कार्यक्रमातून आनंद घ्याल.
शुभ दिनांक – 11, 12

वृश्चिक – पंचमस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण अध्यात्मिक ओढा वाढवणारे राहील. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षातून चांगले यश लाभेल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल. तरुणांना नोकरी व्यवसायात चांगल्या संधी चालून येतील. सामाजिक, राजकीय क्षेत्रातून प्रतिष्ठा उंचावेल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. प्रकृतीच्या तक्रारी दूर होतील. अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका.
शुभ दिनांक – 13, 14

धनु – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या सुखस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. घरात पाहुण्यांची वर्दळ राहील. स्वजनांच्या गाठीभेटीतून आनंद मिळेल. संततीच्या उत्कर्षाची बातमी येईल. विद्यार्थ्यांना अनपेक्षित लाभ होतील. स्पर्धा परीक्षातून चांगले यश प्राप्त होईल. नोकरीच्या चांगल्या संधी तरुणांना चालून येतील. आपण पूर्वी केलेल्या कामाची वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. हितशत्रूंच्या कारवायांवर मोठ्या शिताफीने मात कराल. जोडीदाराला बढती बदलीचे योग संभवतात. विवाहेच्छूक तरुणांना मनपसंत जोडीदार मिळेल.
शुभ दिनांक – 15 ते 17

मकर – आपल्या राशीच्या पराक्रमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. अष्टमात शुक्र मंगळ आहेत. संघर्षातून अनपेक्षित लाभ होतील. अथक परिश्रम आणि मेहनत करून जसे प्राप्ती संभवते. भावंडांचे सहकार्य लाभेल. कुटुंबाच्या नूतनीकरणासाठी वेळ द्याल. गृह सजावटीसाठी विविध वस्तूंची खरेदी केली जाईल. जबाबदारीने मोठी कामे पार पाडाल. आईच्या प्रकृतीची मात्र काळजी वाटू शकते. वाहन चालवताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. षष्ठात आलेल्या शुक्रामुळे आरोग्याच्या तक्रारी मात्र हळूहळू दूर झालेल्या दिसून येतील.
शुभ दिनांक – 13, 14

कुंभ – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या धनस्थानातून नेपच्यून वरून चंद्राचे भ्रमण होत आहे. घरात धार्मिक शुभ समारंभाचे आयोजन केले जाईल, तसेच तीर्थस्थळांना भेटी द्याल. हातून दान धर्म होतील. भावंडांवर आपली मते लादू नका. कामानिमित्त प्रवास घडतील प्रवासात मात्र काही अडचणी उद्भवू शकतात. आप्तेष्टांच्या गाठीभेटीतून आनंद मिळेल. सामाजिक, राजकीय क्षेत्रात नावलौकिक वाढेल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल.
शुभ दिनांक – 11, 12

मीन – आपल्याच राशीतील नेपच्यूनवरून चंद्राचे होणारे भ्रमण अध्यात्मिक ओढा वाढवणारे राहील. राशीस्वामी गुरुधनस्थानात राहू, हर्षल बरोबर आहे. तेव्हा धनप्राप्तीचे अनेक योग निर्माण होत आहेत. आपल्या कार्यक्षेत्रात योग्य मेहनत घेऊन यश खेचून आणता येईल. आपल्या परिश्रमाला योग्य न्याय मिळेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढणार आहेत. आहार, विहारावर तसेच आपल्या भावनांवर संयम ठेवावा लागेल. कोणतीही गोष्ट अविचाराने बोलू नका. भावंडांच्या गाठीभेटीतून आनंद मिळेल. उत्तरार्धात बड्या व्यक्तींचे पाय घराला लागतील. त्यांच्या सहकार्याने चांगली उन्नती साधता येईल.
शुभ दिनांक – 16, 17
- श्री बालाजी ज्योतिषालय आणि वास्तू कन्सल्टन्सी, पुणे
9011149780 / 8668293104
टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असू असेही नाही.