Home » ‘या’ आठवड्यात ‘या’ राशीला होणार अनपेक्षित धनप्राप्ती

‘या’ आठवड्यात ‘या’ राशीला होणार अनपेक्षित धनप्राप्ती

by Team Gajawaja
0 comment
Weekly Horoscope
Share

प्रत्येकजणला आपल्या जीवनात पुढे काय होणार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. मग ते करिअरच्या बाबतीत असो, आरोग्याच्या बाबतीत असो, धन लाभाच्या बाबतीत असो की अगदी प्रेमाच्या बाबतीत… त्यामुळे हा आठवडा बारा राशींसाठी कसा असेल, कोणत्या राशींवर कुठल्या ग्रहांचा प्रभाव असेल हे जाणून घेऊयात…(Weekly Horoscope 10 Apr to 16 Apr)

मेष – अष्टमस्थानातून चंद्राचे भ्रमण तर नुकत्याच आलेल्या धनेश शुक्राचे धनस्थानातून भ्रमण या ग्रहस्थितीमुळे आपणास अनपेक्षित धनप्राप्ती होणार आहे. आपल्या मृदू बोलण्यामुळे इतरांना आपलेसे कराल. कुटुंबीयांसाठी वेळ द्याल. दिनांक 14 रोजी रवी आपल्या राशीत प्रवेश करत आहे. आपले मनोबल वाढेल. आत्मविश्वास आणि महत्त्वाकांक्षेच्या जोरावर धाडसी निर्णय घेतले जातील. भाग्यस्थानातील चंद्रभ्रमणामुळे प्रवास योग घडून येतील. सामाजिक धार्मिक कार्यात सतत कार्यरत राहाल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल. तरुणांना नोकरीच्या नवीन संधी चालून येतील. उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यश लाभेल. जीवाभावाचे मित्र भेटतील.

शुभ दिनांक – 12, 13

वृषभ – गेल्या आठवड्यात आपल्या राशीत राशीस्वामी शुक्राने प्रवेश केला आहे, तर सप्तमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. जोडीदाराचे चांगले सहकार्य लाभेल. आळस झटकून नव्या जोमाने कामाला लागाल. कुटुंबातील कटूता दूर होऊन आनंदी, उत्साही वातावरण अनुभवता येईल. अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. कवी, चित्रकार, कलाकारांना नवीन संधी चालून येतील. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. परदेशस्थ भावंडांशी सुसंवाद साधाल. व्ययस्थानातील रवी, बुधामुळे परदेशात एखादी चांगली संधी चालून येईल. उत्तरार्धात सामाजिक संस्थांना मदत कराल.

शुभ दिनांक – 14 ते 16

मिथुन – आपल्या राशीतून मंगळाचे तर राशीच्या षष्ठस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. नोकरीत मिळालेल्या सुसंधीचे सोने कराल. व्यवसायातून विशेष लाभ होतील. नवीन प्रकल्प राबवण्यात यशस्वी व्हाल. अनावश्यक खर्च वाढले तरी त्यांचा विनियोग चांगल्या कामासाठीच केला जाईल, त्यातून भविष्यात आपणास फायदा संभवतो. कुटुंबातील काही अप्रिय घडामोडीमुळे सात्विक संताप जाणवेल. उष्णतेचे विकार, नेत्र विकार यांचा त्रास जाणवेल. अचानक समोर आलेल्या समस्यांवर शिताफिने मार्ग काढावा लागेल. हितशत्रूंच्या कारवायांना सामोरे जाल. आठवड्याच्या उत्तरार्धात धार्मिक स्थळांना भेट द्याल. आध्यात्मिक प्रगती होईल. मनस्वास्थ लाभेल.

शुभ दिनांक – 11 ते 13

कर्क – राशीच्या पंचमस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण संततीच्या उत्कर्षाची वार्ता देणारे राहील. नवपरणितांना गोड बातमीची चाहूल लागेल. घरातील वातावरण अतिशय आनंदित होईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा चांगले यश लाभेल. पंचमातील चंद्र व लाभातील शुक्र यांचा होणारा प्रतियोग आपल्यासाठी शुभ फलदायी ठरेल. कलाकारांना कलाक्षेत्रात चांगले यश लाभेल. विलासीवृत्ती वाढून अवाजवी खर्च वाढतील. जीवाभावाचे नातेवाईक भेटतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखून काम करण्यातच आपले हित आहे. आपली रेंगाळलेली कामे विलंबाने का होईना पण मार्गी लागतील यातच आपल्याला समाधान लाभेल.

शुभ दिनांक – 10, 11

सिंह – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या सुखस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. कुटुंबात शुभ समारंभाचे आयोजन होईल. घरात पाहुण्यांची वर्दळ वाढेल. गृह सुशोभीकरणासाठी आकर्षक शोभेच्या वस्तूंची खरेदी केली जाईल. विद्यार्थ्यांना मनाजोग्या ठिकाणी प्रवेश मिळेल. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना यश लाभेल. संशोधनपर कार्यातून आपला नावलौकिक वाढेल. लाभातील मंगळ आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी देईल. अष्टमातील गुरुमुळे मात्र कोणत्याही अंधश्रद्धांना बळी पडू नका. परदेश व्यवहारातून लाभ संभवतात. कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तीचे सहकार्य लाभेल.

शुभ दिनांक – 12 ते 14

कन्या – राशीच्या तृतीयस्थानातून होणाऱ्या चंद्रभ्रमणामुळे कामानिमित्त प्रवास घडतील. परदेशस्थ भावंडांचे सहकार्य लाभेल. कुटुंबातील सदस्यांसंबंधी सुवार्ता कानी येईल. गृहउद्योगातून फायदा होईल. आपल्या दैनंदिन कामात विरोधकांमुळे त्रास जाणवेल. अडीअडचणींना तोंड द्यावे लागेल. वरिष्ठ व्यक्तींच्या सहकार्यामुळे, धडाडीने घेतलेल्या निर्णयाने निश्चितच आपण यशस्वी व्हाल, आणि विरोधकांवर विजय मिळवता येईल. भागीदारी व्यवसायातून लाभ संभवतो. विवाहेच्छूक तरुणांना मनाजोगा जीवनसाथी निवडता येईल. समाजात आपल्या व्यक्तिमत्त्वाचा चांगला प्रभाव पडेल.

शुभ दिनांक – 14, 15

तूळ – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या धनस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. धनेश मंगळाची धनस्थानावर दृष्टी असल्याने आर्थिक लाभ होतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. समाजात आपल्या मतांचा आदर केला जाईल. सामाजिक, राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग घ्याल. भावंडांच्या गाठीभेटी होतील. कामानिमित्त प्रवास घडतील. सतत कामाचा उत्साह आणि आपला आत्मविश्वास हे वेगवान प्रगतीला कारणीभूत ठरतील. हाती घेतलेले अतिशय कठीण काम जिद्द आणि महत्त्वाकांक्षेच्या जोरावर पूर्ण कराल. उत्तरार्धात घरात पाहुण्यांची वर्दळ राहील. धार्मिक शुभ समारंभाचे आयोजन केले जाईल. विद्यार्थ्यांना संशोधनपर अभ्यासक्रमातून यश लाभेल.

शुभ दिनांक – 12 ते 14

वृश्चिक – आपल्या राशीतून चंद्राचे भ्रमण तर आपल्या राशीवर शुक्राची दृष्टी असल्याने आपण आनंदी राहणार आहात. अनेक मनाजोग्या घटना घडतील. हा आठवडा आपली इच्छापूर्ती करणारा राहील. घरात विवाह, वास्तुशांती यासारखे शुभ कार्य घडून येईल. आपल्या कुटुंबीयांसाठी खर्च केला जाईल. वैवाहिक सौख्य लाभेल. नोकरीत आपल्या कामाची दखल घेतली जाईल. बढती बदलीचे योग संभवतात. शैक्षणिक क्षेत्रात परदेशी संस्थांशी संबंध येईल. कार्यक्षेत्रातून प्रशिक्षणासाठी आपली निवड होईल. व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहाल कला, क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना नावलौकिक लाभेल.

शुभ दिनांक – 15, 16

धनु – आपल्या राशीच्या व्ययस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. दैनंदिन जीवनातून विरंगुळा मिळावा म्हणून सहलीत सहभागी व्हाल. नशिबाची चांगली साथ आपल्याला या आठवड्यात लाभणार आहे. आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ होतील. जुनी व्यावसायिक येणी वसूल होतील. कलाक्षेत्रातून व्यावसायिक प्रदर्शने भरवता येतील. करमणुकीच्या कार्यक्रमांचा लाभ घ्याल. आपला आत्मविश्वास आणि नेतृत्वशक्ती यांच्या जोरावर मोठी मजल माराल. या आठवड्यात कितीतरी आनंदाचे क्षण आपल्या वाट्याला येणार आहेत.

शुभ दिनांक – 12,13

मकर – आपल्या राशीच्या लाभस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण आपणांस सुख समाधान देणारे राहील. लाभस्थानावर असलेल्या शुक्राच्या दृष्टीमुळे कवी, कलाकारांना हा आठवडा भाग्यकारक ठरेल. नवनवीन कल्पना आकार घेतील. विरंगुळ्यासाठी सहलीचे आयोजन केले जाईल. कर्तव्य भावना जागृत ठेवून इतरांना सहकार्य कराल. समाजात आपली पत-प्रतिष्ठा वाढवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहाल. तरुणांच्या कौशल्याला वाव मिळेल. नोकरीतील कामानिमित्त मनाजोग्या ठिकाणी बदलीची ऑर्डर येईल. इच्छित गोष्टी सहज साध्य होतील. उत्तरार्धात जुनी येणी वसूल होतील.

शुभ दिनांक – 14, 15

कुंभ – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या कर्मस्थानातून चंद्राचे भ्रमण होत असल्याने तरुणांना नोकरीच्या सुसंधी चालून येतील. आपल्या मेहनतीला योग्य न्याय मिळेल. वरिष्ठांकडून आपल्या कामाची प्रशंसा होईल. कला, क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींसाठी हा आठवडा अनुकूल फलदायी ठरेल. तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल. उत्तरार्धात धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. तीर्थस्थळांना भेटी दिल्या जातील. आपल्या कर्तुत्वाला चांगली जळाली येईल. परदेशस्थ भावंडांशी सुसंवाद साधाल.

शुभ दिनांक – 15, 16

मीन – राशीतील गुरुची भाग्यस्थानातील चंद्रावर पूर्णदृष्टी असल्याने धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग राहील. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचे योग येतील. संशोधनपर अभ्यासक्रमातून यश लाभेल. न्यायप्रविष्ट प्रकरणात आपल्या बाजूने निर्णय लागल्याने मानसिक स्वस्थता लाभेल. तरुणांना नोकरीच्या सुसंधी लाभतील. विवाहेच्छूक तरुणांचे विवाह जमतील. जोडीदाराचे चांगले सहकार्य लाभेल. भागीदारी व्यवसायातून नवीन कार्यारंभ केले जातील. करमणुकीच्या कार्यक्रमातून आनंद घ्याल. रेंगाळलेली सरकारी कामे मार्गी लागतील.

शुभ दिनांक – 13, 14

  • श्री बालाजी ज्योतिषालय आणि वास्तू कन्सल्टन्सी, पुणे 

9011149780 / 8668293104

टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असू असेही नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.