Home » ‘ही’ रास होणार आर्थिक उलाढाली करण्यात यशस्वी

‘ही’ रास होणार आर्थिक उलाढाली करण्यात यशस्वी

by Team Gajawaja
0 comment
Weekly Horoscope
Share

आजच्या आठवड्याचे राशीभविष्य. जाणून घ्या कसा जाणार तुमचा हा आठवडा. जाणून घ्या कोणती रास होणार आर्थिक उलाढाली करण्यात यशस्वी (Weekly Horoscope 06 Feb to 12 Feb)

मेष – आपल्या राशीच्या पंचमस्थानातून चंद्राचे तर लाभस्थानातून शुक्र आणि शनीचे भ्रमण होत आहे. आपल्याला अनुकूल ग्रहमान लाभल्यामुळे यशाचा आलेख उंचावणार आहे. आपले स्वप्न साकार होईल. अनेक संधी चालून येतील. आर्थिक बाबतीत पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ होतील. जुनी येणी वसूल होतील. सकारात्मक ऊर्जा वाढल्यामुळे कामांना गती येईल. धाडसी निर्णय घेतले जातील. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. करमणुकीच्या कार्यक्रमातून आनंद घ्याल. आप्तस्वकीयांच्या गाठीभेटी होतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल उत्तरार्धात जोडीदाराचे चांगले सहकार्य लागेल.

शुभ दिनांक – 6 ते 8

वृषभ – आपल्या राशीच्या सुखस्थानातून चंद्राचे तर दशमस्थानातून शनी, शुक्राचे भ्रमण होत आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच घरात पाहुण्यांची वर्दळ राहील. कुटुंबीयांसंबंधी प्रगतीच्या वार्ता कानी येतील. शुभ समारंभात सक्रिय सहभाग घ्याल. मातृसौख्य लाभेल. सहलीत सहभागी व्हाल. धार्मिक स्थळांना भेटी दिल्या जातील. नशिबाची चांगली साथ लाभेल. आपण करत असलेल्या कामात मेहनतीच्या जोरावर भरघोस यश संपादन कराल. आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी मिळेल. आजवर रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. नवीन कल्पना आकार घेतील. इच्छापूर्ती होईल.

शुभ दिनांक – 9, 10

मिथुन – राशीच्या तृतीय स्थानातून चंद्राचे तर सप्तमस्थानातून बुधाचेे होणारे भ्रमण आपल्या उत्कर्षास शुभ फलदायी ठरेल. अष्टमस्थानातून होणाऱ्या रवीच्या भ्रमणामुळे महत्त्वाची सरकारी कामे रेंगाळण्याची शक्यता राहते. कोणत्याही महत्त्वाच्या कागदपत्रांवर तूर्तास सह्या करू नका. कुटुंबीयांना सहकार्य करावे लागेल. घरातील सुख सुविधा वाढवण्याकरता खरेदी केली जाईल. मातृसौख्य लाभेल‌. संतती संबंधी चिंता वाटेल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अथक परिश्रम घ्यावे लागतील. आठवड्याच्या उत्तरार्धात अनपेक्षित खर्च उद्भवण्याची शक्यता राहते.

शुभ दिनांक – 6 ते 8

कर्क – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या धनस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाली होतील. जुनी व्यावसायिक येणी वसूल होतील. कुटुंबात शुभ समारंभाचे आयोजन होईल. घरात सकारात्मक ऊर्जा वाढल्यामुळे उत्साही वातावरण राहणार आहे. विविध व्यावसायिक उपक्रमातून यश लाभेल. कामानिमित्त प्रवास घडतील. महत्त्वाची कागदपत्रे हाती लागतील. भावंडांचे सहकार्य लाभेल. धार्मिक शुभ समारंभात सहभागी व्हाल. आध्यात्मिक प्रगती होईल. आईच्या प्रकृतीची काळजी वाटेल.

शुभ दिनांक – 9, 10

सिंह – आपल्याच राशीतून चंद्राचे भ्रमण तर राशी स्वामी रवी आणि धनेश बुधाचे भ्रमण षष्ठस्थानातून होत आहे. नोकरी व्यवसायात काही सकारात्मक घटना घडतील. आपल्या मनाजोगे काम मिळाल्यामुळे उत्साहाने काम कराल. नोकरीत बढती बदलीचे योग संभवतात. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घेतले जातील. कुटुंबात आपल्या मतांचा आदर केला जाईल. कुटुंबियांचे सहकार्य लाभेल. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. भावंडांना सहकार्य करावे लागेल.

शुभ दिनांक – 6 ते 8

कन्या – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या व्यवस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. तर राशी स्वामी बुध सुखस्थानातून दिनांक सात फेब्रुवारी रोजी पंचमस्थानात प्रवेश करत आहे. व्यवसाय उद्योगात मोठ्या प्रमाणावर केलेल्या आर्थिक उलाढाली यशस्वी होतील. कामानिमित्त परदेश प्रवास होतील. सामाजिक राजकीय क्षेत्रात आपली पत उंचावेल. मित्र परिवाराचे चांगले सहकार्य लाभेल. सकारात्मक ऊर्जेमुळे सतत कार्यरत राहाल. धाडसी निर्णय घेतले जातील. उत्तरार्धात खर्चाला आळा घाला.

शुभ दिनांक – 9, 10

तूळ – आपल्या राशीच्या लाभस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे तर लाभेश रवी आणि बुधाची सुखस्थानात होणारी युती आपणासाठी अनुकूल फलदायी ठरेल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. करमणुकीच्या कार्यक्रमातून आनंद मिळवाल. आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. आपली इच्छापूर्ती होणाऱ्या घटना घडतील. विदेशातील कंपन्यांसोबत केलेले व्यावसायिक करार फायदेशीर ठरतील. कुटुंबात शुभ समारंभाचे आयोजन केले जाईल.

शुभ दिनांक – 11, 12

वृश्चिक – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या कर्मस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. दशमेश रवी आणि लाभेश बुध यांची पराक्रमस्थानातून होणारी युती आपल्या उत्कर्षास पूरक राहील. ज्यांच्या मूळ पत्रिकेत सरकारी नोकरीचे योग असतील त्यांच्या प्रयत्नास यश येण्यासाठी हा काळ अनुकूल राहील. मित्र परिवाराच्या सहाय्याने एखादे रेंगाळले काम मार्गी लागेल. कोर्ट कचेरीच्या कामातून यश लाभेल. वैयक्तिक सुवार्ता कानी येतील. कामानिमित्त परदेशी जाण्याचे प्रयत्न करत असाल तर तूर्तास थांबावे लागेल.

शुभ दिनांक – 9, 10

धनु – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या भाग्यस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. तर दशमेश बुध दिनांक सात रोजी् आपल्या राशीच्या धनस्थानात प्रवेश करत आहे. नोकरी व्यवसायातून चांगले अर्थार्जन होईल. नवीन संधी चालून येतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखून काम केल्याने कौतुकास पात्र व्हाल. सामाजिक, राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग राहील. नवनवीन उपक्रम राबवले जातील. आपल्या वाक्चातुऱ्याच्या जोरावर काही कामे मार्गी लावता येतील. मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक तूर्तास टाळावी.

शुभ दिनांक – 9, 10

मकर – राशीच्या अष्टमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे तर अष्टमेश रवी आणि भाग्येश बुध यांचे आपल्याच राशीतून भ्रमण होत आहे. अशी आपणास अतिशय पूरक ग्रह स्थिती लाभल्यामुळे आजवर प्रत्येक कामात येत असलेल्या अडचणी दूर होतील. नवनवीन उपक्रम हाती घेऊन यशस्वी करता येतील. स्थावर मालमत्तेचे व्यवहार मार्गी लागतील. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा चांगला ठसा उमटवाल. धाडसी निर्णय घेतले जातील. विरोधकांवर मोठ्या कौशल्याने मात कराल. आपली आर्थिक बाजू उंचावेल.

शुभ दिनांक – 11, 12

कुंभ – आपल्या राशीच्या सप्तमस्थानातून चंद्राचे होणारे भ्रमण जोडीदाराच्या उत्कर्षाची वार्ता देईल. भागीदारी व्यवसायातून नवीन संधी चालून येतील. प्रवासात आपले खिसा पाकीट सांभाळावे. प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. उत्तरार्धात धार्मिक स्थळांना भेटी द्याल. अध्यात्मिक प्रगती होईल. राशीत होणारी भाग्येश शुक्र आणि राशीस्वामी शनी यांची युती आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव देणारी राहील, स्थिरता लाभेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल.

शुभ दिनांक – 6 ते 8

मीन – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या षष्ठ स्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. षष्ठेश रवीचे लाभस्थानातून भ्रमण होतोत असल्यामुळे आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. नोकरीत वरिष्ठांकडून आपल्या कामाची प्रशंसा होईल. एखाद्या सवलतीचा लाभ मिळेल. विवाहेच्छूक तरुणांना मनपसंत जोडीदार मिळेल. भागीदारी व्यवसायात नवीन उपक्रम राबवाल. प्रवासात आपले खिसा पाकिट सांभाळावे. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका.

शुभ दिनांक – 9, 10

  • श्री बालाजी ज्योतिषालय आणि वास्तू कन्सल्टन्सी, पुणे 

9011149780 / 8668293104

टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असू असेही नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.