भारत विविध भाषा, संस्कृती आणि परंपरांचा देश आहे. असे ही म्हटले जाते की. देशात एका कोसानंतर तेथील भाषा बदलली जाते. अशा प्रकारे देशातील विविध राज्य आणि त्यामधील गावात लग्नासोहळ्यासंबंधित विविध रिती-रिवाजांचे पालन केले जाते. कुठे अग्नीला साक्षी मानून सात फेरे घेतले जातात तर काही ठिकाणी पाण्याभोवती फेरे मारले जातात. अशातच विवाहसोहळा संपन्न झाल्यानंतर आपल्या कुलदैवतांचे नवं वधू-वर आशीर्वाद घेतात. मात्र राजस्थन मधील असे एक गाव आहे जेथे लग्नानंतरची पहिली पूजा एका वेगळ्या पद्धतीने केली जाते. (Wedding rituals)
राजस्थान मधील जैलरमेर पासून जवळजवळ ६ किमी दूर असलेल्या बडा बाग गावात लग्नानंतर नवं विवाहित दांपत्य हे आपली पहिली पूजा आपल्या कुलदेवतेऐवजी स्मशानभूमीत करतात.अशातच असा प्रश्न उपस्थितीत राहतो की, असे नक्की का केले जात असेल. खरंतर नवविवाहित जोडपल्याला गृहप्रवेशानंतर ही पूजा करण्यासाठी लगेच स्मशानभूमीत जावे लागते.
बडा बाग गावातील स्मशानभूमी खास मानली जाते. गावातील लोक याला राजपरिवारातील खानदानी स्मशानभूमी मानतात. या गावातील स्मशानभूमीत १०३ राजा आणि राण्यांच्या आठवणीत छत्र्या तयार करण्यात आलेल्या आहेत. या स्मशानभूमीतील वास्तूकला ही अत्यंत आकर्षक आहे. या स्शमानभूमीबद्दल लोकांचा आस्था ऐवढी मजबूत आहे की, लग्नानंतर नवविवाहित जोडप्यांची पहिली पूजाच नव्हे तर प्रत्येक शुभ कार्यापूर्वी लोक पहिल्या पूजेसाठी येथे येतात.
येथील लोकांची अशी मान्यता आहे की, लग्नकरुन आलेले नवविवाहित जोडप्याने जर पहिल्यांदा या स्मशानभूमीत पूजा केली तर त्यांना स्वर्गवासी राजा-राण्यांचे आशीर्वाद मिळतात. म्हणजेच, नवविवाहित जोडपे स्मशानभूमीत बनवण्यात आलेल्या राज-राण्यांच्या समाधीवर पूजा करतात. या व्यतिरिक्त लग्नानंतर पौर्णिमेच्या दिवशी ही पूजा केली जाते. असे मानले जाते की, नव्या आयुष्याची सुरुवात स्वर्गवासी राजा-राण्यांच्या आशीर्वादाने करावी, जेणेकरुन वैवाहिक आयुष्य आनंदात जाईल. (Wedding rituals)
हेही वाचा- ‘या’ ठिकाणी आहे 108 खांबांचे शिवमंदिर
रात्रीच्या वेळेस स्मशानभूमीतून येतात विचित्र आवाज
असे नाही की, गावातील लोक स्मशानभूमीत कधी ही येऊ किंवा जाऊ शकतात. त्यांना येथे येण्यास भीती ही वाटते. गावातील बहुतांश लोक या स्मशानभूमीत जाण्यास घाबरतात. रात्रीच्या वेळी स्मशानभूमीजवळून कोणीही ये-जा करत नाही. तेथील लोकांचे असे म्हणणे आहे की, स्मशानभूमीजवळ बहुतांशवेळा घोडेस्वार आणि त्यांच्या पायांचा आवाज येत असतो. या व्यतिरिक्त रात्रीच्या वेळी हुक्का ओढण्याचे ही आवाज ऐकू येतात.