Home » मुलं वयाच्या 30 व्या वर्षानंतर लग्न करण्यामागील काही प्रमुख कारणे

मुलं वयाच्या 30 व्या वर्षानंतर लग्न करण्यामागील काही प्रमुख कारणे

सध्या बदलत्या लाइफस्टाइलमुळे प्रत्येकाची आयुष्य जगण्याची पद्धत बदलली आहे. अशातच सध्याची पिढी वयाच्या 30 व्या वर्षानंतर लग्न करण्याचा विचार करते. यामागे काही कारणे आहेत. त्यापैकी एक कारण म्हणजे नोकरी आहेच. पण अन्य अशी कोणती कारणे आहेत याबद्दलही जाणून घेऊया....

by Team Gajawaja
0 comment
Indian Wedding
Share

Wedding Plans : सध्याच्या काळात प्रत्येकाला स्वत:ची वेगळी स्पेस हवी आहे. पण धावपळीच्या आयुष्यामध्ये प्रत्येकालाच असा वेळ मिळतो असे नाही. एक काळ असा होता मुलांचे लग्न वयाच्या 21 व्या वर्षी करुन दिले जायचे. पण आता मुलं वयाच्या तिशीतही लग्न करण्यासाठी तयार होत नाहीत. यामागे काही कारणे आहेत. खरंतर, लग्नासंदर्भात प्रत्येकाचे वेगवेगळे मत असू शकते.

आयुष्यात आर्थिक सक्षम होणे
आयुष्यात आर्थिक सक्षम होणे हे बहुतांश मुलांमधील लग्न उशिराने करण्यामागील एक कारण आहे. आजकालची मुलाचा पहिला दृष्टीकोन करियरमध्ये यशस्वी होण्याचा असतो. यानंतरच लग्नाचा विचार ते करतात. आर्थिक सक्षम झाल्यानंतरच लग्न करणे असे सध्याच्या मुलांना वाटते.

आयुष्य मोकळेपणाने जगण्याची इच्छा
लग्नानंतर मुलं मोकळेपणाने आयुष्य जगत नाही असे नाही. खरंतर, त्यांच्यावर आलेल्या जबाबदाऱ्यांमुळे काही मुलांना मनमोकळेपणाने जगता येत नाही. अशातच सध्याची मुलं लग्नासाठी उशिर करतात. स्वत:ला समजून घेण्यासह काही गोष्टी एक्सप्लोर करणे मुलांना आवडते.

योग्य पार्टनरचा शोध
आजकाल काहीजण लवकर लग्न करतात. पण नंतर मतभेद झाल्याने नाते मोडले जाते. मात्र सध्याची मुलं काही गोष्टींचा पूर्णपणे विचार करुनच लग्नासाठी पुढे जातात. आयुष्यातील पार्टनर समजूतदार आणि आपल्या गोष्टी सांभाळून घेणारा असावा असे प्रत्येक मुलाला वाटते. (Wedding Plans)

जबाबदाऱ्या उचण्यासाठी सक्षम
आयुष्यातील जबाबदाऱ्या उचलण्यासाठी सध्याची मुलं सर्वच दृष्टीकोनातून विचार करतात. अशातच लग्न केल्यानंतर बायकोची जबाबदारी, घराची जबाबदारी अशा काही गोष्टी आपल्याला हँडल करता येतील का याचा विचार देखील मुलं करतात. जबाबदाऱ्या घेण्यास सक्षम असल्यास एखाद्यावेळेस मुलं लग्नाचा विचार करतात.


आणखी वाचा :
रिलेशनशिपमधील ‘डेल्युजनशिप’चा अर्थ काय? असा काढा शोधून
लग्नाआधी मुलींना जबरदस्तीने दिले जाते खायला, कारण ऐकून व्हाल हैराण

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.