Home » एखाद्या वेबसाइटवर तुमचा डेटा Save केलायं हे तपासून पाहण्यासाठी ‘ही’ ट्रिक वापरा

एखाद्या वेबसाइटवर तुमचा डेटा Save केलायं हे तपासून पाहण्यासाठी ‘ही’ ट्रिक वापरा

by Team Gajawaja
0 comment
Website Search
Share

कोणत्याही गोष्टीची माहिती आपल्याला हवी असेल तर आपण सहज इंटरनेटवर त्याबद्दल सर्च करतो. काही वेळेस इमेल आयडी आणि पासवर्डचे लॉग इन करुन काम ही होते. दुसऱ्या बाजूला बहुतांश अशा काही वेबसाइट्स आहेत ज्यासाठी लॉगिन केल्याशिवाय तुमचे काम होते. त्यानंतर काही लोक लॉगआउट करतात. पण काही जण लॉगआउट करत नाहीत किंवा ते करणे विसरतात. अशातच या वेबसाइट तुमच्या डेटाचा वापर करु शकतात. दरम्यान, तुम्ही रिक्वेस्ट पाठवून तो डेटा वेबसाइटवरुन डिलीट करु शकतात. (Website Search)

तुम्हाला सुद्धा तुमचा डेटा कोणत्या वेबसाइटवर स्टोर केला आहे हे माहिती करुन घ्यायचे असेल तर ते करणे सोप्पे आहे. त्यासाठी कोणते अॅप डाऊनलोड करण्याची गरज नाही. डेटा तपासून तुम्ही तो डिलिट करण्याची फक्त तुम्हाला रिक्वेस्ट पाठवायची असते.

या वेबसाइटवर तपासून पहा डेटा
आता पर्यंत इंटरनेट ब्राउजवर तुम्ही एखाद्या वेबसाइटवर लॉग इन केले आहे आणि त्याचा कोणत्या प्रकारे वापर केला जात आहे तपासून पाहण्यासाठी तुम्ही optout.aboutads.info वेबसाइटवर जाऊन पाहू शकता. ही वेबसाइट पूर्णपणे फ्री आहे. डेटा तपासून पाहण्यालाठी तुम्हाला या वेबसाइटवर लॉगइन करण्याची सुद्धा गरज भासत नाही. फक्त तुम्हाला विविध इंटरनेट ब्राउजवर जाऊन तुम्हाला या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. आता सर्व ठिकाणी तपासून पाहिल्यानंतर डिलिट करण्यासाठी रिक्वेस्ट पाठवावी लागेल.

Website Search
Website Search

डेटा तपासून पाहण्यासाठी पुढील काही स्टेप्सचा वापर करा
-सर्वात गुगल क्रोमवर ती वेबसाइट सुरु करा
-आता या वेबसाइटला भेट दिल्यानतर जावास्क्रिप्ट, नेटवर्क क्वालिटी चेक, फर्स्ट पार्टी कुकीज चेक आणि थर्ड पार्टी कुकीज चेक होईपर्यंत वाट पहा.
-ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ओके बटणावर क्लिक करा
-आता थोडा वेळ वाट पहा, ही प्रोसेस १०० टक्के झाल्यानंतर तुम्हाला कळेल की कोणत्या वेबसाइटवर तुम्ही प्रथम लॉगइन केले होते.(Website Search)

हे देखील वाचा- Facebook युजर्सने कधीच करु नयेत ‘या’ चूका अन्यथा बँक खाते होईल रिकामे

सर्व वेबसाइटवरुन अशा पद्धतीने बाहेर पडा
-आता सर्व वेबसाइटवरुन बाहेर पडण्यासाठी ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर चेक टू ऑप्ट आउटवर क्लिक करा
-Users current IBS status शंभर टक्के झाल्यानंतर सर्व वेबसाइट्स सिलेक्ट करा
-आता ऑप्ट आउट ऑफ ऑलवर क्लिक करा
-DAA web choice पूर्ण होईपर्यंत वाट पहा
-ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर ओके बटणावर क्किल करुन तुम्ही सर्व वेबसाइटवरुन ऑप्ट आउट व्हाल
-काही दिवसानंतर या प्रोसेसच्या माध्यमातून पु्न्हा तुम्ही तपासून पाहू शकता.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.