Home » आता वेब युजर्सलाही YouTube Music ऑफलाइन डाउनलोड करता येणार, वापरा ही ट्रिक

आता वेब युजर्सलाही YouTube Music ऑफलाइन डाउनलोड करता येणार, वापरा ही ट्रिक

युट्यूब म्युझिकच्या माध्यमातून तुम्हाला उत्तम फीचर्स मिळतात. या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास त्यानुसार बेव युजर्सला अधिकाधिक 10 गाणी ऑफलाइन पद्धतीने डाउनलोड करता येतात.

by Team Gajawaja
0 comment
YouTube Video Advertisement
Share

YouTube : आता युट्यूब म्युझिक वेब युजर्सलाही ऑफलाइन म्युझिक डाउनलोड करण्याचे ऑप्शन मिळणार आहे. हा ऑप्शन आधी केवळ मोबाइल युजर्सला उपलब्ध करून दिला होता. पण आता वेब वर्जनमध्येही उपलब्ध करून दिला आहे. याच्या नव्या फीचरमध्ये तुम्हाला अधिकाधिक 10 म्युझिक ऑफलाइन पद्धतीने डाउनलोड करता येऊ शकतात.

9to5Google च्या रिपोर्ट्सनुसार, काही युजर्सला युट्युब म्युझिकला वेब अॅपवर New! Download Music to listen offline चा मेसेज देत आहेत. हा मेसेज साइडबारमधील लाइब्रेरी ऑप्शनमध्ये आहे. तुम्हाला कंप्युटरमध्ये गाणी डाउनलोड करण्यासाठी YouTube Music च्या सेटिंगमध्ये जावे लागेल. येथे तुम्हाला डाउनलोडचा पर्याय मिळेल. या टॅबवर क्लिक करून तुम्बी डाउनलोड करण्यात आलेली गाणी पाहू शकता.

किती गाणी डाउनलोड करता येतात?
सध्यातरी हे फीचर सर्वांसाठी उपलब्ध नाही. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, तुमचे सिस्टिम 30 दिवसांपर्यंत इंटरनेटशी कनेक्टेड नसल्यास तुमचा कंटेट एक्सपायर होईल. यामध्ये तुम्ही 10 गाणी ऑफलाइन पद्धतीन डाउनलोड करू शकता. युट्युबने YouTube Music ला वर्ष 2019 मध्ये भारतात लाँच केले होते. यामध्ये प्लेलिस्ट व्यतिरिक्त काही रेडिओ चॅनल्समधील गाणी, लाइव्ह परफॉर्मेन्सचा समावेश आहे. (YouTube)

युट्युब म्युझिकमध्ये तुम्हाला काही उत्तम फीचर्स मिळतात. यामध्ये रिअल टाइम लिरिक्स ते पॉडकास्ट्सच्या काही गोष्टींचा समावेश आहे. गाणी डाउनलोड करण्यासाठी युट्युब प्रीमियमची मेंबरशिप घेणे आवश्यक आहे. प्रीमियमसह तुम्हाला काही गोष्टी मिळतात. ज्यामध्ये अॅपमध्ये फ्री अॅड गाणी ऐकणे, ऑडिओ आणि व्हिडीओ कोणत्याही अडथळ्याशिवाय स्विच करण्याचा पर्याय मिळतो. याशिवाय 100 अब्ज गाणी, व्हिडीओ आणि अन्यकाही गोष्टीही मिळतात.


आणखी वाचा :
नोकरी मिळण्यास अडथळा येत असल्यास या गोष्टी ठेवा लक्षात
तयार होतोय सहावा महासागर
सौदीमध्ये धावणार ‘ड्रीम ऑफ द डेजर्ट’

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.