ब्रिटेनमध्ये पाण्यात अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरु आहे. हे ऐकून खरंतर तुम्ही हैराण व्हाल. कारण ब्रिटेनमधील सर्वाधिक फ्युनरल कंपनी को-ऑप फ्यूनरलकेयर करणार आहे. ही सेवा या वर्षाच्या अखेर पर्यंत सुरु केली जाणार आहे. अशा प्रकारच्या अंत्यसंस्कारावेळी मृत व्यक्तीला दफन करण्याऐवजी पाण्यात त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. (Water Cremation)
खरंतर जेव्हा मृत शवाचे अंत्यसंस्कार केले जातात तेव्हा आपण त्यावर इंधनाचा वापर करतो. यामुळे ग्रीनहाउस गॅस यामधून अधिक निघतो. आता पर्यंत पारंपरिक पद्धतीने दफन करूनच अंत्यसंस्कार केले जातात. मात्र वॉटर क्रिमेशनमध्ये नक्की काय होणार याच बद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
कसे होणार वॉटर क्रिमेशन?
को-ऑप फ्यूनरलकेअर वॉटर क्रिमेशनच्या माध्यमातून लोकांना पर्यावरणाला अनुकल अशा अंत्यसंस्काराचा ऑप्शन देणार आङे. एक्वामेशन प्रक्रियेदरम्यान मृत शव हे स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात ठेवले जाते. स्टीलची भांड्यात ठेवण्यापूर्वी त्यात क्षार मिक्स केले जातात. हे क्षार शवाचे वजन, लिंग याच्या आधारावर केले जाते. त्यानंतर ९५ टक्के आणि ५ टक्के क्षारच्या सोल्यूशनला 200-300°F पर्यंत गरम केले जाते.
जेव्हा ही प्रक्रिया पूर्ण होते तेव्हा या ही सामग्री लहान-लहान हाडांमध्ये तोडली जाते. त्यानंतर हाडं नरम होतात. त्यांना सुकवून सफेद रंगाची पावडर तयार केली जाते. ती कलशात टाकून नातेवाईकांना दिली जाऊ शकते. मृत शवावर जेव्हा आपण अंत्यसंस्कार करतो तेव्हा सुद्धा असेच होते.
अमेरिकन पर्यावरण संरक्षण एजेंसी अटलांटिकनुसार, मृत शरिर जाळून त्यावर अंत्यसंस्कार केल्याने पर्यावरणाला हानि पोहचते. यामधून कार्बन डायऑक्साड मोठ्या प्रमाणात निघतो. त्याचसोबत दफन केल्याने भुजल दुषित होण्याचा धोका असते. एका अंत्यसंस्कामुळे जवळजवळ ५३५ पाउंज कार्बन डायऑक्साइड निर्माण होतो. जो जवळजवळ ६०० मील कार चालवण्यासमान आहे. तर दफनच्या वेळी जर शव धातु किंवा प्लास्टिकमध्ये ठेवल्यास तर तो मातीत सडण्यासाठी खुप वर्ष लागतात. (Water Cremation)
हेही वाचा- चिनी शास्त्रज्ञाने लावला कायम चिरतरुण राहण्याचा शोध
दरम्यान, वॉटर क्रिमेशनसाठी किती खर्च येईल हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र फ्युनरल गाइड यांनी दावा केला आहे की, यामध्ये पारंपारिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या अंत्यसंस्काराऐवढाच खर्च येऊ शकतो. ब्रिटेनमधील फ्युनरल कंपनी को-ऑप एका वर्षात ९३ हजार अंत्यसंस्कार करते. अमेरिका, कॅनडा आणि दक्षिण अफ्रिकेत वॉटर क्रिमेशन अधिक लोकप्रिय आहे.