Home » बांबूपासून पाण्याच्या बाटल्या?  

बांबूपासून पाण्याच्या बाटल्या?  

by Team Gajawaja
0 comment
Water bottles
Share

मार्च, एप्रिल, मे.. हे तीन महिने म्हणजे गरमीच्या झळा…अशावेळी एकच गोष्ट सर्वांना हवी असते, ती म्हणजे थंड पाणी. पाणी थंड करण्यासाठी फ्रिजचा वापर होतो. उन्हाळ्यात अनेक घरात मातीच्या मडक्यातही थंड पाणी करण्यात येते. पण प्रश्न येतो, प्रवासात. प्रवासात थंड पाणी हवे असेल तर त्याला फारसा पर्याय उपलब्ध नाही. शिवाय हे पाणी प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांमधून मिळते. प्लॅस्टिकच्या बाटल्यांमधील (Water bottles) हे पाणीही आरोग्यास घातक असल्याचे मानले जाते, पण त्याला पर्याय उपलब्ध नसल्यानं या बाटल्या मोठ्या प्रमाणात विकल्या जातात.  या सर्वांवर एक हक्काचा आणि आरोग्यदायी असा पर्याय उपलब्ध झाला आहे. हा पर्याय म्हणजे बांबूपासून बनवलेल्या बाटल्या. बांबूपासून बनवलेल्या या बाटल्या (Water bottles) कुठेही नेण्यास उपयुक्त असतात आणि यात ठेवलेले पाणी हे थंडगारही होते. मुख्य म्हणजे बांबूच्या बाटल्यांमधील पाणी हे आरोग्यासही चांगले असते, त्यामुळे येत्या काही दिवसातच बांबूपासून बनवलेल्या बाटल्या सर्वत्र दिसू लागल्या तर नवल वाटायला नको. 

काही दिवसांपूर्वी नागालॅंडमधील एका मंत्र्यांनी सोशल मिडियावर बांबूपासून बनवलेल्या वस्तूंची उपयुक्तता किती आहे, यासंदर्भात माहिती दिली. यामध्ये बांबूच्या बाटल्यांबद्दल (Water bottles) प्रामुख्यानं उल्लेख करण्यात आला होता. यामुळे बांबूपासून बनवलेल्या बाटल्यांची चर्चा होऊ लागली.  येणा-या उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये या बांबूपासून बनवलेल्या बाटल्या (Water bottles) अतिशय उपयुक्त ठरणार असून त्यामध्ये पाणी हे थंड होतेच, शिवाय त्यात औषधी गुणधर्मही असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या बांबूच्या बाटल्यांमधून पाणी प्या आणि तंदरुस्त रहा, असा संदेशच त्यांनी दिला आहे.  त्यामुळेच या बांबूच्या बाटल्या (Water bottles) कशा असतात, याबाबत उत्सुकता वाढली आहे. ईशान्य भारतातील अनेक शेतकरी बांबूची शेती करतात.  या  पिकाचा ईशान्य भारतात मोठ्या प्रमाणात उपजीविकेसाठी उपयोग होतोच. शिवाय आहारातही बांबूपासून तयार केलेल्या अन्नपदार्थांचा वापर होतोय. देशाच्या इतर भागातही बांबूची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येते. या बांबूचा वापर आतापर्यत फक्त फर्निचर बनवण्यासाठी होतो, याचीच माहिती होती.  पण  बांबूचे इतरही फायदे आहेत.  त्याची मुख्य खासियत म्हणजे बांबूपासून बनवलेल्या पाण्याच्या बाटल्या… मुख्य म्हणजे हे पाणी जास्त काळ थंड राहते.  या बाटल्यांमधील (Water bottles) पाणी फायदेशीर असल्याने आरोग्यालाही त्याचा फायदा होतो. 

हिरवे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बांबूचे अमर्याद असे उपयोग आहेत. फर्निचर बनवण्यापासून ते अन्नपदार्थ बनवण्यापर्यंत त्यांचा उपयोग होतो. तज्ज्ञांच्या मते प्लॅस्टिकच्या पाण्याचा वापर काही काळासाठी चांगला आहे मात्र बांबूपासून बनवलेली बाटली (Water bottles) वर्षानुवर्षे वापरता येते. बांबूच्या बाटलीतून पाणी प्यायल्यावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. बांबूची बाटली फक्त बांबूच्या झाडापासून बनवली जाते.  त्यामुळेच या बाटलीतील पाणी नैसर्गिकरित्या थंड राहते. पाणी पिण्यासाठी प्लॅस्टिकच्या बाटलीचा वापर होत असेल तर शरीरात विविध रसायने जाण्याचा धोका असतो. त्याच वेळी, बांबूच्या बाटलीमध्ये (Water bottles) असा कोणताही धोका नसतो. बांबूच्या बाटल्यांमधील पाणी हे पोषक तत्वांची खाण समजले जाते. त्यात व्हिटॅमिन बी,  पोटॅशियम, कॉपर, मॅंगनीज, झिंक, व्हिटॅमिन बी2, ट्रिप्टोमर, प्रोटीन, आयसोल्युसिन आणि लोह असे सर्व धातूंचे प्रमाण असते. या बांबूपासून बनवलेल्या बाटल्या अनके वर्ष राहतात. जेवढ्या जुन्या बाटल्या तेवढी त्यांची उपयुक्तता वाढते, असे सांगतात. त्यामुळेच या उन्हाळ्यात अशा बांबूच्या पाण्याच्या बाटल्या (Water bottles) मोठ्या प्रमाणात विक्रीला येण्याची शक्यता आहे. 

=========

हे देखील वाचा : भारतात मोठा भूकंप येण्याची शक्यता?

=========

याशिवाय बांबूंचा वापर आहारातही करण्यात येतो. विशेषतः बांबूचे कोंब अनेक पदार्थात वापरले जातात. अनेक पोषक तत्त्वांनी युक्त असलेल्या बांबूच्या कोंबांना सुपर फूड म्हटले जाते. दरवर्षी पावसाळ्यात नवीन बांबू रुजून जमिनीतून वर येतात, तेव्हा ते कोवळे असतात. हेच कोवळे मांसल आणि मऊ असलेले कोंब हे भाजी आणि इतर खाद्य पदार्थ तयार करण्यासाठी वापरले जातात. यात फॅट आणि कॅलरीज अत्यंत कमी प्रमाणात असतात. बांबूच्या कोवळ्या कोंबांचा किंवा कोवळ्या पानांचा रस काढा बाळंतीणीला दिला जातो. बांबूच्या कोवळ्या कोंबांपासून तयार केलेले लोणचे आणि कढी पचनक्रीया वाढवते. महिलांना मासिक पाळीत होणारा त्रास कमी करण्यासाठीही या बांबूच्या कोवळ्या कोंबाची भाजी दिली जाते. रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठीही याचा उपयोग होतो. बांबूच्या कोवळ्या कोंबांचा वापर हा मुख्यतः चायनीज आणि थाई रेस्टॉरंट्समध्ये होतो. पण भारतातही  ईशान्येकडील राज्यांत याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.  शिवाय महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, उडीसा, अंदमान-निकोबार या राज्यांमध्ये बांबूचा वापर केलेले खाद्यपदार्थ केले जातात. अलिकडे यातील औषधी गुणधर्माची माहिती समजल्यावर या खाद्यपदार्थांना मागणी वाढली आहे. विशेष म्हणजे,  बांबूचे कोवळे कोंब जसे ताजे वापरले जातात, तसेच ते सुकवूनही ठेवले जातात आणि याच सुकवलेल्या कोंबांपासूनही अनेक खाद्यपदार्थ तयार केले जातात. अर्थातच उन्हाळ्यात बांबूपासून बनवलेल्या बाटल्यांप्रमाणे त्याचा वापर केलेले खाद्यपदार्थही तेवढेच उपयोगी आहेत. येत्या उन्हाळ्यात त्यांचा वापर नक्कीच करुन बघा…

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.