Health Effects : आजच्या डिजिटल युगात व्हिडिओ कंटेंट मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाला आहे. YouTube, Instagram Reels, Facebook, OTT प्लॅटफॉर्म्स आणि शॉर्ट व्हिडिओ अॅप्सवर लोक तासन्तास गुंगून बसतात. मनोरंजन, माहिती, शिक्षण सगळेच स्मार्टफोनवर सहज उपलब्ध असल्याने व्हिडिओ पाहण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. मात्र दिवसभर स्क्रीनसमोर बसण्याचे अनेक दुष्परिणाम आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

Health Effects
डोळ्यांवर होणारा ताण वाढता धोका : मोबाइल स्क्रीनवरील निळा प्रकाश (ब्लू लाईट) डोळ्यांना थेट हानी पोहोचवतो. दिवसभर व्हिडिओ पाहिल्याने डोळ्यांची कोरडेपणा वाढतो, दृष्टी कमी होते आणि सतत डोळ्यांत चुरचुर, वेदना जाणवू शकते. लहान मुलं आणि तरुणांमध्ये स्क्रीन-इंड्युस्ड मायोपिया म्हणजेच कमी दिसणे मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते. त्यामुळे व्हिडिओ पाहताना ‘20-20-20’ नियम पाळणे आवश्यक म्हणजे 20 मिनिटांनी 20 सेकंद 20 फूट अंतरावरील वस्तूकडे पाहा.

Health Effects
मान-खांदा व पाठदुखीची समस्या : मोबाइल हाती धरून सतत कमरेत वाकून किंवा मान खाली झुकवून बसल्याने मसल स्ट्रेनची समस्या वाढते. टेक्स्ट नेक सिंड्रोममुळे तरुणांमध्ये देखील सर्व्हिकलचा त्रास वाढत आहे. चुकीच्या पोश्चरमुळे दीर्घकाळात डिस्क डीजनरेशन, कंप, हात सुन्न होणे असे प्रश्न निर्माण होऊ शकतात. म्हणूनच स्क्रीन पाहताना पाठ सरळ ठेवणे आणि दर काही वेळांनी अंग हालवणे अत्यंत गरजेचे. (Health Effects)
मेंटल हेल्थलाही बसतो फटका भरपूर व्हिडिओ पाहिल्याने आपला मेंदू सतत नवनवीन माहितीचा भडिमार सहन करतो. त्यामुळे एकाग्रता कमी होणे, चिडचिड, चिंता वाढणे असे मानसिक त्रास उद्भवू शकतात. कंटेंट व्यसन (Content Addiction) आज तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले आहे. रात्रभर जागून व्हिडिओ पाहण्याची सवय झोपेचा समतोल बिघडवते आणि डिप्रेशनची शक्यता वाढवू शकते. (Health Effects)
शारीरिक क्रियाकलापात घट वजन आणि आजार वाढ तासन्तास बसून राहण्यामुळे शरीरातील चयापचय क्रिया मंदावतात. त्यामुळे वजन वाढणे, स्थूलता, डायबिटीज आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. WHO च्या मार्गदर्शनानुसार दररोज किमान 30 मिनिटे शारीरिक हालचाल करणे आवश्यक आहे. परंतु व्हिडिओ पाहण्यात वेळ जात असल्याने शारीरिक क्रिया कमी होऊन आरोग्य बिघडते. (Health Effects)
काय आहे उपाय?
दर 30 मिनिटांनी फोन बाजूला ठेवा आणि 2-3 मिनिटे स्ट्रेचिंग करा
स्क्रीनची ब्राइटनेस कमी ठेवा आणि ब्लू लाईट फिल्टर वापरा
जेवताना, झोपण्यापूर्वी आणि उठल्याबरोबर फोन पाहणे टाळा
दिवसातील स्क्रीन टाइम ठरवा आणि त्याचे पालन करा
वाचन, खेळ, छंद यांना वेळ द्या
==================
हे देखील वाचा :
Loan Guarantor : लोन गॅरंटर होण्यापूर्वी जाणून घ्या हे ५ मोठे धोके; नाहीतर होईल आयुष्यभर पश्चात्ताप!
==================
आवश्यक असल्यास डिजिटल डिटॉक्स दिवस ठरवा डिजिटल कंटेंट आपल्या ज्ञानात भर घालत असला तरी, त्याचा अतिरेक आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. मनोरंजनाशी मैत्री ठेवा पण शरीर-मनाची काळजीही घ्या. व्हिडिओ बघापण मर्यादा ठेवून! कारण आरोग्य चांगलं असेल तरच जीवनाचा खरा आनंद अनुभवता येईल.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
