Home » वॉर झोन : युक्रेन युद्धावर डॉक्युमेंटरी

वॉर झोन : युक्रेन युद्धावर डॉक्युमेंटरी

by Team Gajawaja
0 comment
Documentary
Share

मॅन व्हर्सेस वाइल्ड या दूरचित्रवाणी मालिकेमुळे प्रसिद्ध झालेला बेअर ग्रिल्स आता युक्रेन युद्धावर एक माहितीपट सादर करत आहे. बेअर ग्रिल्स यांने केलेली वॉर झोन: बेअर ग्रिल्स मीट्स प्रेसिडेंट झेलेन्स्की या डॉक्युमेंटरीचा (Documentary) प्रीमियर 15 मे रोजी प्रदर्शित झाला. डिस्कव्हरने याबाबतची घोषणा केली असून यामध्ये बेअर ग्रिल्स याने युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांची रशिया-युक्रेन युद्धावर मुलाखत घेतली आहे. तसेच युक्रेनच्या नागरिकांबरोबरही त्यांनं संवाद साधला आहे. शिवाय युक्रेनच्या ज्या भागात युद्ध चालू आहे, अशा भागातही झेलेन्स्की यांची बेअर ग्रिल्सनं अगदी थेट रस्त्यावर मुलाखत घेतली आहे. या डॉक्युमेंटरीमध्ये झेलेन्स्की यांनी युद्धाबाबत आपली मतं व्यक्त केली असून युक्रेनच्या ऐकीसाठी केलेले प्रयत्न सांगितले आहेत.  

वॉर झोन: बेअर ग्रिल्स मीट्स प्रेसिडेंट झेलेन्स्की या डॉक्युमेंटरी (Documentary) चित्रपटाचा प्रीमियर 15 मे रोजी प्रदर्शित झाला. डिस्कव्हरने याबाबतची घोषणा केली असून बेअर ग्रिलने या सर्व डॉक्युमेंटरीचे काम केले आहे.  त्यामुळे बेअरच्या चाहत्यांची या डॉक्युमेंटरीबाबत मोठी उत्सुकता होती.  शिवाय  युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी या डॉक्युमेंटरीमध्ये युद्धाबाबत आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाबाबत अनेक भाष्य केले आहे. यामुळे झेलेन्स्की नेमकं काय आणि कोणाबाबत बोलले आहेत, याचीही उत्सुकता आहे. झेलेन्स्की यांच्या या भूमिकेचे भविष्यात नक्कीच परिणाम होणार आहेत. स्वतः झेलेन्स्की अशा पद्धतीच्या डॉक्युमेंटरीसाठी (Documentary) उत्सुक होते. त्यांनी यासाठी बेअर ग्रिलला आमंत्रित केले होते. रशियाच्या आक्रमणानंतर सुमारे एक वर्षानंतर ग्रिल्स यानं  युक्रेनला भेट दिली आणि या डॉक्युमेंटरीचे काम केले. यात त्यानं युक्रेनियन नागरिकांबरोबर संवाद साधला आहे. या युद्धामुळे लहान मुलं आणि महिलांची अधिक फरफट झाली. अनेक ठिकाणी लहान मुले आणि महिलांची विक्री झाल्याची किंवा त्यांचे अपहरण झाल्याची घटनाही पुढे आली आहे. याबाबत रशियन सैन्याला दोषी ठरवण्यात आले आहे.  युक्रेनच्या नागरिकांमध्ये या सर्वाबाबत राग आहे.  ग्रिलने जेव्हा युक्रेनी नागरिकांबरोबर संवाद साधला तेव्हा हा संताप बाहेर आला आहे.  ग्रिल आता आपल्या डॉक्युमेंटरीमध्ये युक्रेनी नागरिकांचे बोल कशा पद्धतीन दाखवतो,  हे बघणं उत्सकतेचं असेल. 

रशियानं युक्रेनवर सुरु केलेल्या युद्धाला वर्ष उलटून गेलं आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर बेअर ग्रिल्स यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली. या दोघांमध्ये युद्धाची पार्श्वभूमी, युक्रेनी जनता, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा अट्टाहास, आणि आंतरराष्ट्रीय राजकारण या सर्वांवर झेलेन्स्की यांनी आपली मतं नोंदवली आहेत. या डॉक्युमेंटरीमध्ये (Documentary) युक्रेनमधील युद्धाची परिस्थिती, तिथे राहणारे नागरिक,  उध्वस्त झालेले उद्योग,  शाळा,  रहिवाशी वस्त्या यासोबत आणि झेलेन्स्कीचें रशियासोबत एवढ्या दिर्घ काळ युद्ध लढण्याचे कौशल्य आदीवरही प्रकाश टाकण्यात येणार आहे. यात बेअर ग्रिल्स युक्रेनची राजधानी कीवमध्येही फेरफटका मारतांना दिसणार आहे. युद्धाच्या भीषणतेने प्रभावित झालेल्या आणि आपल्या कुटुंबियांपासून दुरावलेल्या युक्रेनी नागरिकांची मानसिकताही या डॉक्युमेंटरीमध्ये (Documentary) दाखवण्यात येणार आहे. बेअर याने राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यासोबत कीवच्या रस्त्यावर फिरुन तेथील परिस्थिती जाणून घेतली आहे. यादरम्यान बेअर युक्रेनमधील नागरिकांशीही संवाद साधला आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी या डॉक्युमेंटरीद्वारे आपली प्रतिमा जगभरात अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न केला आहे. रशियाची प्रतिमा या डॉक्युमेंटरी (Documentary) द्वारे मलीन करण्याचा प्रयत्न असल्याची ओरडही झाली आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपूर्वी रशियामध्ये द्रोणद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. त्यामागे युक्रेन असल्याचा आरोप रशियानं केला आहे आणि रशिया याचा बदला घेण्यासाठी युक्रेनवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचीही बातमी आहे. त्यापूर्वी जागतिक राजकारणात आपली प्रतिमा सुधारण्याचा हा झेलेन्स्कीचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे. त्यासाठी झेलेन्स्की यांना युरोपचा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे.  

======

हे देखील वाचा : अमेरिका रासायनिक शस्त्रे नष्ट करणार…

======

बेअर ग्रिल्स यांनी या डॉक्युमेंटरीसाठी (Documentary) पुढाकार घेतला तेव्हाच ही चर्चा सुरु झाली होती. बेअर मॅन व्हर्सेस वाइल्ड या दूरचित्रवाणी मालिकेमुळे प्रसिद्धीच्या झोकात आला. त्यानं थेट अमेरिकेचे अध्यक्ष ते भारतीय पंतप्रधान आणि अनेक तारे तारकांनाही आपल्या या दूरचित्रवाणीच्या मालिकेमध्ये सहभागी करुन घेतले होते.  तोच ग्रिल आता रशिया-युक्रेन युद्धावर डॉक्युमेंटरी बनवत आहे. 15 मे रोजी आलेल्या या डॉक्युमेंटरीमुळे या युद्धावर काय परिणाम होणार आहेत, हे काही दिवसातच स्पष्ट होईल.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.