Home » Health : दररोज दहा हजार स्टेप्स चालण्याने होतील ‘हे’ अभूतपूर्व फायदे

Health : दररोज दहा हजार स्टेप्स चालण्याने होतील ‘हे’ अभूतपूर्व फायदे

by Jyotsna Kulkarni
0 comment
Health
Share

जिथे आजच्या काळात खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक लोकांना कमी वयातच गंभीर आणि मोठे आजार जडताना दिसत आहे. मात्र दुसरीकडे भविष्यातील आरोग्याचा धोका ओळखता अनेक लोकांनी आपल्या आरोग्यची काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. जास्त काही केले जात नसले तरी आता अनेक लोकं मोठ्या प्रमाणावर चालताना दिसतात. (Health)

हातात स्मार्ट वॉच घालत दररोज प्रयत्नपूर्वक दहा हजार स्टेप्स पूर्ण करण्याचा चांगला प्रयत्न करतात. असेही कायमच डॉक्टर आणि तज्ञ आपले उत्तम आरोग्य टिकवण्यासाठी चालणे हा उत्तम व्यायाम असल्याचे सांगताना दिसतात. सोशल मीडियावर दहा हजार स्टेप्स चालण्याबद्दल अनेकदा आपण ऐकतो. कदाचित म्हणूनच अनेक लोकांनी दहा स्टेप्स चालण्यास सुरुवात केली आहे. दररोज दहा हजार स्टेप्स चालण्याचे नक्की कोणकोणते फायदे आपल्या शरीराला होतात चला जाणून घेऊया. (Marathi News)

तज्ज्ञांच्या माहितीनुसार साधारणतः १ किलोमीटर चालण्यात १३०० ते १५०० पाऊले मोजली जातात. त्यानुसार, १० हजार पावलांमध्ये सुमारे ७.५ ते ८ किलोमीटर अंतर कापले जाऊ शकते. अनेक लोक हे अंतर ७ किलोमीटरमध्येही पूर्ण करू शकतात. हे लोकांच्या चालण्याच्या पद्धती, उंची आणि गतीवरही अवलंबून असते. तुमच्याकडे पाऊले मोजण्याचे उपकरण नसेल, तर ते ७ ते ८ किलोमीटर चालून लक्ष्य पूर्ण करू शकतात. काही लोकं सात हजार पावले चालणे देखील लाभदायक असल्याचे सांगतात. मात्र जर तुम्ही दररोज दहा हजार पावलं चाललात तर नक्कीच तुमच्या आरोग्याला त्याचे अनेक प्रकारे लाभ होऊ शकतात. (Todays Marathi Headline)

Health

दररोज दहा हजार पाऊल चालणं फायदेशीर नक्कीच आहे. मात्र आपल्या वयानुसार शारीरिक क्षमतेनुसार आपण आपल्या चालण्याचे लक्ष सेट केले पाहिजे. विशेष म्हणजे दिवसाला १०,००० पावलं चालण्याचे उद्दिष्ट कोणत्याही वैज्ञानिक शोधातून नाही तर मार्केटिंगच्या अभियानातून पुढे आले आहे. भरपूर चालण्याचे निश्चितच अनेक मोठे फायदे शरीराला होतात. परंतु दिवसाला १०,००० पावलं चालण्याने लगेच तुमच्या आरोग्यात झटपट सुधारणा होतील असे नाही. अनेकांना ४,००० पावलं चालणे देखील फायदेशीर ठरू शकते तर काहींना १०००० पावलं देखील कमी पडू शकतात. तरीही जर तुम्ही दररोज दहा हजार पावलं चालतात तर पुढील फायदे तुम्हाला होऊ शकतात. (Latest Marathi News)

>नियमित वेगाने दररोज साधारण १० हजार पावलं चालल्यास स्नायू मोकळे होण्यासोबतच बळकटही होतात. यामुळं हाडांचं आरोग्यही सुधारते. (Top Marathi News)
> दररोज १०,००० पावलं चालल्याने कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. यामुळे ऊर्जेची कमतरता निर्माण होऊन वजन नियंत्रणात ठेवण्यास किंवा कमी करण्यास मदत होते. दररोज चालण्याने लठ्ठपणाशी संबंधित समस्या उदभवण्याचा धोका कमी होतो.
> दररोज चालण्याने हृदयाला अनेक फायदे होतात. रक्ताभिसरण वाढून हृदयाशी संबंधित समस्या दूर करण्यास मदत करते. तसेच हृदयरोग, हाय ब्लड प्रेशर आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो. (Latest Marathi Headline)
> १० हजार पावलं दररोज चालल्यास मानसिक आरोग्यही सुरळीत राहते. तणाव आणि नैराश्य मोठ्या फरकानं कमी होते. त्यामुळं दररोज १० हजार स्टेप्स दररोज चालण्याने ताण-ताणव कमी होतो आणि चांगली झोप येण्यास मदत होते. तसेच रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा सुधारते.
> व्यायाम केल्याने इन्सुलिनची सेन्सेटिव्हिटी वाढते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. चालण्याने मधुमेहाचा त्रास असलेल्या व्यक्तींना फायदा होतो. यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
> दररोज चालण्याने फुफ्फुसाची क्षमता सुधारते, श्वसन कार्य वाढण्यास मदत होते. उत्तम श्वसनक्रिया फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते आणि शरीराला ऑक्सिजन देण्यास मदत करते. (Top Trending News)

=======

Heart Attack : हार्ट अटैकचे आधीचे इशारे शरीर काही तासांपूर्वीच देतं चेतावणी, ओळखल्यास वाचू शकते जीव

Arthritis : आर्थ्रायटिसची सुरुवातीची लक्षणे ओळखा! सांधेदुखीपासून बचाव कसा कराल? जाणून घ्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन

=======
> दररोज शारीरिक हालचाल, व्यायाम किंवा चालण्याने निरोगी राहतो. तसेच आपल्याला दीर्घायुष्य मिळते.
> दररोज चालणे हे स्नायूंचा ग्रुप सक्रिय करण्यास मदत करते. यामुळे ताकद आणि तग धरण्याची क्षमता वाढते. तसेच मस्कुलोस्केलेटल समस्याांचा धोका कमी करण्यास मदत होते.
> दरोज चालणे हे सांध्यांसाठी फायदेशीर ठरते. कठोरपणा कमी होतो. संधिवात आणि सांध्यांच्या संबंधित इतर समस्यांचा धोका कमी होण्यास मदत होते.
> १० हजार पाऊले चालल्याने शरीराची कॅलरी बर्न करण्याची क्षमता वाढते, ज्यामुळे वजन कमी होण्यास आणि चांगली फिटनेस मिळण्यास मदत होते. (Social News)

(टीप : हा मजकूर सामान्य माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. कोणतेही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.