निरोगी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रत्येक जणं आग्रही असतो. त्यासाठी विविध सोपे, घरगुती उपाय करून सर्वच जणं आपली प्रकृती जपण्याचा प्रयत्न करत असतात. कोणी घरातच छोटे व्यायाम करतात, योगा करतात, आहाराकडे लक्ष देतात. तर बहुतकरून लोकं सकाळी फिरायला बाहेर जातात. सकाळचे चालणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच चांगले असल्याचे तज्ज्ञ देखील मान्य करतात. मोकळ्या आणि फ्रेश वातावरणात सकाळी चालण्यामुळे आपले तन आणि मन देखील प्रसन्न होते, शिवाय संपूर्ण दिवसही चांगला जातो. मात्र आज आम्ही तुम्हाला निरोगी आरोग्यासाठी अजून एक सोपा आणि साधा उपाय सांगणार आहोत. (Walk)
एका साध्या सोप्या उपायानं विविध आजारांवर नियंत्रण ठेवणं अगदी सहज शक्य आहे. हा उपाय आहे अनवाणी पायाने चालण्याचा. अनेक लहान, मोठ्या गंभीर आजारांवर हा उपाय खूपच लाभदायक आहे. सध्याची ताणतणावाच्या जीवनशैली अनेक आजारांना आमंत्रण देण्यास पूरक ठरत आहे. त्यासाठीच सोपे मात्र खूपच फायदेशीर उपाय करत आपल्याला आपले आरोग्य जपायचे आहे. यातला एक अतिशय सोपा उपाय सकाळी सकाळी हिरव्या गवतावर अनवाणी चालणे. जाणून घेऊया या उपायाचे आरोग्यवर्धक फायदे. (Health News)
नजर चांगली होते
सकाळी सकाळी अनवाणी गवतामध्ये चालण्यामुळे शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. याचा थेट परिणाम आपल्या नजरेवर दिसून येतो. अनवाणी गवतावर चालताना पायाच्या तळव्यावरील एक्युप्रेशर पाँईंटवर दबाव येतो आणि हा पाँईंट शरीरावरील अवयवांना प्रभावित करतो. चालताना आपला योग्य दबाव पडल्यास डोळ्यांची दृष्टी अधिक चांगली होण्यास मदत मिळते. (Walking On Green Grass)
अलर्जीपासून सुटका
सकाळी गवतातून अनवाणी चालणे हे शरीरासाठी फायदेशीर ठरते. सकाळी गवतातून चालणे ही एक कमालीचे थेरपी आहे. याला इंग्रजीमध्ये ग्रीन थेरपी असे म्हटले जाते. तसंच हिरव्या गवतावर चालल्यामुळे पायाखाली असणाऱ्या नसा अधिक सक्रिय होतात. ज्यामुळे अंगावर येणारी अलर्जी निघून जाण्यास मदत मिळते. अनवाणी पायांनी गवतावर चालण्याचे काही नुकसान नाही. पण जर तुम्हाला सर्दी झाली असेल किंवा इतर कोणतीही समस्या असेल तर तुम्ही मोजे घालून गवतावर फिरू शकता. (Marathi Latest News)
पायांना आराम
सकाळी जेव्हा हिरव्या गवतावर २० मिनिटं चालल्यास कोणत्याही मेहनतीशिवाय पायाला मसाज मिळतो. पायांवरील मांसपेशींना हिरव्या गवतामुळे अधिक आराम मिळतो आणि अधिक फ्रेश वाटते. पायामध्ये थोडेसे दुखत असेल तर हिरव्या गवतावर किमान २० मिनिट्स तुम्ही अनवाणी चालल्याने फायदा मिळतो. (Marathi Top News)
तणाव दूर करा
हिरव्या गवतावर सकाळी चालल्यामुळे मानसिक तणाव दूर करून मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. नियमित स्वरूपात हिरव्या गवतावरून चालल्याने तणाव आणि ताण दोन्ही दूर राहण्यास मदत मिळते आणि मानसिक आरोग्य अधिक चांगले होते. (Social News)
=======
हे देखील वाचा :WAVES : मनोरंजनसृष्टीची Waves Summit
=======
डायबिटीसमध्ये लाभदायी
डायबिटीस रूग्णांना जर जखम झाली तर ती भरून येण्यास बराच मोठा काळ लागतो. मात्र तुम्ही रोज २० मिनिटं हिरव्यागार गवतामध्ये अनवाणी चालल्यावर यापासून सुटका मिळते. गवतावर अनवाणी चालल्यामुळे योग्य प्रमाणात शरीराला ऑक्सिजन मिळते आणि आजारांपासून दूरही राहाता येते. गवतावर अनवाणी चालण्याने मज्जातंतूंवर दबाव येतो, ज्यामुळे अंगांचे कार्य सुधारू शकते. (Top Stories)
रक्ताभिसरण सुधारते
अनवाणी पायानं चालण्याने शरीरात रक्ताचा प्रवाह योग्य राहतो आणि रक्ताभिसरण योग्य प्रकारे होते. मधुमेही रुग्णांनाही गुडघेदुखीची समस्या असते. अनवाणी पायाने चालण्याने ही समस्याही दूर होते. चालण्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि रक्तातील साखरेचे नियंत्रणही होते. दररोज नियमितपणे अनवाणी चालण्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यासही मदत होते. साखरही नियंत्रणात राहते. (Marathi Trending News)
हाडं मजबूत होतात
आजच्या काळात हाडे वयापूर्वीच कमकुवत होण्याचे प्रमाण खूपच वाढत आहे. यावर चालण्याचा व्यायाम अतिशय फायदेशीर ठरतो. सतत अनवाणी गवतावर चालण्याने हाडांमध्ये असलेले कॅल्शियम वाढते आणि ती मजबूत होतात.