Home » जगातील सर्वाधिक मोठी स्मशानभूमी

जगातील सर्वाधिक मोठी स्मशानभूमी

by Team Gajawaja
0 comment
Wadi al-Salaam Cemitério
Share

जगातील प्रत्येक कोपऱ्यात आपल्याला कुठे ना कुठे तरी स्मशानभूमी दिसते. या ठिकाणी मृत शवांना गाढले जाते. भारतात अशा काही लहान-मोठ्या स्मनाशभूमी सुद्धा आहेत. पण भारताव्यतिरिक्त अन्य देशांत ही त्या आहेत. परंतु तुम्हाला माहिती आहे का जगातील सर्वाधिक मोठी स्मशानभूमी कुठे आहे? याच बद्दल आपण अधिक जाणून घेऊयात. (Wadi al-Salaam Cemitério)

जगातील सर्वाधिक मोठी स्मशानभूमी
जगातील सर्वाधिक मोठी स्मशानभूमी ही खाडी देश इराक मध्ये आहे. ती इराक मधील नजफ शहरात स्थित आहे. येथील स्मशानभूमीबद्दल असे सांगितले जाते, ही ऐवढी विशाल आहे की त्याच्या आतमध्ये १-२ शहर वसली जातील.

या स्मशानभूमीचे नाव काय?
वादी अल सलाम असे या स्मशानभूमीचे नाव आहे. जवळजवळ १५०० पेक्षा ही अधिक एकर जमिनीवर विस्तरली आहे. या स्मशानभूमीला वॅली ऑफ पीसच्या नावाने ही ओळखले जाते. जगभरात ही स्मशानभूमी प्रसिद्ध आहे. असे म्हटले जाते की, येथे शिया इमाम आणि चौथे खलीफा इमाम अली इब्न तालीब यांच्या दरग्यासह अन्य काही मुख्य दरगाह सुद्धा आहेत. सर्व दरगाह म्हणजेच कबरी या दगड आणि मातीने तयार करण्यात आलेल्या आहेत.

किती जुनी आहे ही स्मशानभूमी?
वादी-अल सलाम म्हणजेच वॅली ऑफ पीस खुप जुनी आहे. या बद्दल असे सांगतात की, येथे दफन करण्याचे काम हे १०-२ वर्षांपासून नव्हे तर १४०० वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून चालत आले आहे. एका अनुमानानुसार, या स्मशानभूमीत जवळजवळ कोटींहून अधिक मृत शव गाढले गेले आहेत.(Wadi al-Salaam Cemitério)

हे देखील वाचा- ब्रिटनमध्ये सापडले प्राचीन मंदिर…

वादी-अल-सलाम स्मशानभूमीबद्दलच्या अन्य गोष्टी
ही स्मशानभूमी जगभरातील शिया मुस्लिमांमध्ये खुप फेमस आहे. तर इमाम अली इब्न तालिब यांचा दरगाहजवळ असल्याने इराक मध्ये राहणारे बहुतांश शिया लोक स्वत:ला वादी-ए-सलाम मध्ये दफन करु नये असे म्हणतात. या व्यतिरिक्त जगभरातील शिया समुदायातील लोकांना मात्र येथे दफन करण्याची इच्छा असते. एका वृत्तानुसार, या स्मशानभूमीत दररोज जवळजवळ २०० मृत शव दफन केले जातात. त्याचसोबत येथे एक असा मकबरा आहे जेथे काही लोक मन्नत मागण्यासाठी येतात. ही स्मशानभूमी युनिस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज मध्ये ही सहभागी आहे. या स्मशानभूमीत एक मकबरा सुद्धा आहे. त्याबद्दल असे बोलले जाते की, आयएसआयएसच्या विरोधात लढणारे लढवय्ये या मकबऱ्याच्या येथे येऊन अशी मन्नत मागतात की, जर त्यांचा लढाईत मृत्यू झाल्यास तर त्यांना याच स्मशानभूमीत दफन केले जावे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.