‘राजा नाही फकीर आहे, देशाची तकदीर आहे’ या नाऱ्यांसह एंशीच्या दशकात अखरेच्या वर्षात विश्वनाथ प्रताप सिंह देशाचे ८ वे पंतप्रधान झाले. यापूर्वी राजीव गांधी यांच्या सरकार मध्ये ते अर्थमंत्री होते आणि बोफोर्स तोफ दलालीच्या मुद्द्यावरुन आपल्याच सरकारला त्यांनी घेरले. मंत्री पद सोडून सरकारपासून विभक्त झाले. त्यांच्याच या निर्णयामुळे त्यांना नेत्यांच्या श्रेणीत उभे केले आणि त्यांची प्रतिमा एक वेगळीच झाली. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांना पसंद करणे सुद्धा दोन भागात विभागले गेले. (VP Singh)
२५ जून १९३१ रोजी उत्तर प्रदेशातील प्रयागराज मध्ये राजपूत परिवारात जन्मलेले वीपी सिंग जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा नेपाळ पर्यंत आनंदाची लाट आली होती. ती पहिलीच वेळ होती की, जेव्हा स्वातंत्र्यानंतर या समाजाचा एखादा नेता पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसणार होता. तर जाणून घेऊयत वीपी सिंह यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी.
जेव्हा ते देव बनले
आपल्या कार्यकाळात पंतप्रधान पदावर राहून सुद्धा त्यांनी एक मोठे पाऊल उचलले, देशातील मंडळ कमीशच्या सिफारशीला लागू केले. त्यावेळी देशात जवळजवळ अर्धी लोकसंख्या ओबीसी होती. त्यांच्या निर्णयामुळे ओबीसांना नोकरित आरक्षण मिळाले. पिछाडलेल्या वर्गातील सामाजिक आणि आर्थिक स्थिती बदलून गेली. आपल्या या निर्णयमामुळे वीपी सिंह सामाजिक न्यायाचे तर देव झालेच पण सवर्ण समाजात त्यांना विभाजनकारी रुपात पाहू लागले गेले.
पाहता पाहता सवर्ण समाजात संपात निर्माण होऊ लागला. जो समाज त्यांना ऐकेकाळी हिरो असल्याचे सांगत होता तोच त्यांना ते वाईट असल्याचे समजू लागले होते. वीपी सिंह यांच्या नजरेत भले त्यांचा निर्णय सामाजिक न्याय घेऊन येणारा होता पण सवर्णांच्या नजरेत त्यांना तो स्वार्थी असल्याचे वाटले. अशा प्रकारे त्यांना पसंद करणारी लोक दोन हिस्सांमध्ये वाटली गेली. ओबीसी वर्गात ते हिरो झाले तर सवर्णांच्या नजरेत ते खलनायक. त्यांच्या या निर्णयामुळे भाजपासह काही विरोधी पक्षांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांना सत्तेतून बेदखल करण्यासाठी तयारी सुद्धा सुरु झाली होती.
हे देखील वाचा- कथा ‘त्या’ तरुण राष्ट्राध्यक्षांची ज्यांचा हत्येचे गूढ आजही कायम
जेव्हा भाजपने समर्थन मागे घेतले
जेव्ही वीपी सिंग बोफोर्स आणि पाणबुडी संरक्षण कायद्यात दलालीचा मुद्दा उचलून राजीव गांधी यांच्या सरकारमधील अर्थमंत्री पद सोडले तेव्हा त्यांच्याकडे ना कोणताही राजकीय पक्ष नव्हता ना कोणती विचारधारा. मात्र स्वच्छ व्यक्तिमत्व आमि आपल्या या निर्णयमामुळे देशभरात ते प्रसिद्ध झाले. नंतर देशात पुन्हा निवडणूका झाल्या. बोफोर्स मुद्द्याला केंद्रात ठेवून निवडणूक लढवली. १९८९ मध्ये त्या लोकसभेत काँग्रेसला पराभव स्विकारावा लागला. भाजपाच्या समर्थनामुळे वीपी सिंह पंतप्रधान झाले. (VP Singh)
जेव्हा मंडल कमीशन लागू केल्यानंतर सवर्णांचा विरोध सुरु झाला तेव्हा त्यांच्या निर्णयामुळे भाजप आणि विरोधी पक्ष सुद्धा सहमत नव्हते. त्याचा निष्कर्ष असा निघाला की, समर्थन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आणि भाजपच्या संयुक्त मोर्चाचे सरकार संसदेत विश्वास मतादरम्यान कोसळली गेली.