Home » Vodafone ज्याने बदलली जाहिरातींची दुनिया!

Vodafone ज्याने बदलली जाहिरातींची दुनिया!

by Team Gajawaja
0 comment
Share

2009 चा एप्रिल मे महिना. संध्याकाळची वेळ. आपल्यापैकी अनेकांच्या घरात टीव्हीवर नवीनच सुरू झालेल्या आयपीएलच्या मॅचेस सुरू असायच्या तितक्यात मॅच मध्ये लागायची ऍड आणि स्क्रीनवर दिसायची पांढऱ्या रंगाची सेम चेहऱ्याची कार्टून्स. तुमच्याही डोळ्यासमोर ते चित्र आलं का ? हो मी बोलतेय आपल्या सगळ्यांच्या आवडत्या आयकॉनिक वोडाफोन zoozoo बद्दल! पण ही झुझूची आयडिया नेमकी कोणाची होती? मध्यंतरीच्या काळात ती बंद का झाली? थोडक्यात या zoozoo बद्दल सविस्तरपणे जाणून घेऊ. (Vodafone)

सध्या आयपीएलचा १८ वा सीजन सुरू आहे. याच आयपीएलचा (IPL)पहिला सीजन सुरू झाला होता 2008 साली. त्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे 2009 मध्ये आयपीएलच्या मॅचेस टीव्हीवर सुरू असताना मधल्या ऍडमध्ये आपल्यासमोर यायचे झुझु कार्टून्स. व्हाईट रंगाचा सूट, शरीराने एकदम बारीक आणि मोठा अंडाकृती चेहरा ,दिसायला काहीसे असे होते हे झुझु (Zoo Zoo). लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांवर त्यांनी आपली भुरळ घातली होती. लहान मुलांना तर त्या बोरींग मॅच पेक्षा कधी एकदा ती कार्टून स्क्रीनवर येतात असं व्हायचं. पण सगळ्यांच्या मनात एक प्रश्न होता की हे झुझु खरच ॲनिमेटेड होते की ती खरी माणसं होती? (Top Stories)

तर ही ऍड कम्पेन चालवणाऱ्या वोडाफोनचं उद्दिष्ट एकदम साधं होतं की आपल्या व्हॅल्यू ऍड सर्विसेस म्हणजेच मिस कॉल अलर्ट, कॉल फिल्टर ,फोन बॅकअप अशा सगळ्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवायच्या. पण एक अडचण अशी होती की आयपीएलमध्ये खूप जाहिराती होत्या मग आपली ऍड कशी चालणार? बरं प्रॉडक्ट विकायचं म्हणजे ॲड तर करायलाच हवी पण काहीतरी हटके करायला हवं होतं. मग तेव्हा ऑगीलवी & मॅथर या फेमस एजन्सीला सांगितलं गेलं की असं काहीतरी करा जे सगळ्यांच्याच कायम लक्षात राहील मग काय ही एजन्सी कामाला लागली आणि मग जन्म झाला झुझुचा. (Vodafone)

Vodafone

ऑगीचे क्रिएटिव्ह डिरेक्टर राजीव राव (Rajeev Rao) यांच्या डोक्यात एक कल्पना आली की जाहिरात ॲनिमेटेड वाटली पाहिजे पण ते ॲनिमेशन (Animation)नसून खरं असावं. आता म्हणजे काय आणि ते नेमकं कसं एक्झिक्युट केलं? तर हाच खरा ट्विस्ट आहे कारण झुझु म्हणजे खरी माणसं होती. होय! झुझु म्हणजे कोणतेही ग्राफिक्स नसून हे खरे कलाकार होते. या ऍडसाठी मुद्दामून छोट्या बांध्याच्या कलाकारांची निवड केली गेली होती. त्यांना फोम आणि रबरने बनवलेला कॉस्ट्यूम घातला जायचा आणि त्यांचं डोकं परपेक्स या प्लास्टिक मटेरियल पासून बनवलेलं होतं आणि चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स हे रबरच्या स्ट्रीप लावून बनवलेले होते. त्यांच्या डोक्यावरती तीन होल्स होते ज्याच्या थ्रू कलाकारांना श्वास घेणं इझी होतं. याच शूटिंग झालं होतं कॅप टाऊन, साउथ आफ्रिकेत!

त्याचं शूटिंग स्पेशल हायस्पीड कॅमेऱ्याने केलं गेलं होतं जेणेकरून हे जुजू ॲनिमेटेड वाटावे. प्रकाश वर्मा यांच्या निर्वाणा फिल्मने या सगळ्या एड्स डिरेक्ट केल्या होत्या. या ads बद्दल आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे दर दिवशी एक वेगळी ऍड लागायची. यात कधी कधी क्रिकेटचे अपडेट्स दाखवले जायचे कधी कॉल फिल्टर्स कधी एसएमएस पॅक बद्दलच्या गोष्टी. त्यात त्यांची गोंधळलेली भाषा आणि कोणाच्याही चेहऱ्यावर पटकन हसू यावं असा अभिनय हेच त्यांच्या यशाचं गुपित होतं. त्यांची भाषा कोणाला कळायची नाही पण ती सगळ्यांना आवडत नक्की होती. तेव्हा ही भाषा सगळ्यांना गिब्रिश वाटायची पण ही भाषा होती मल्याळम! हा पण नुसती मल्याळम नाही तर मल्याळम शब्द रिवर्स लँग्वेज मध्ये. म्हणजे कुठलाही मल्याळम शब्द फक्त तो उलट वाचायचा. (Vodafone)

================

हे देखील वाचा : Chanakyaniti : अपयशामुळे खचलात….? मग चाणक्य नीतीच्या ‘या’ गोष्टी ठेवा कायम स्मरणात

================

2009 साली या झुझुजनी सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला त्यांचे व्हिडिओज लाखो वेळा पाहिले गेले. त्यांच युट्युब चॅनेल हे भारतातलं सगळ्यात जास्त सबस्क्राईब केलेलं चैनल बनलं. तेव्हा झुजू हा शब्द google वर सर्वाधिक शोधला गेलेला शब्द ठरला. त्या झुझु मुळे आणखी एक सामाजिक आदर्श घातला गेला तो म्हणजे त्यावर्षी पेटा अर्थात people for the ethical treatment of animals यांनी वोडाफोनला ग्रेटर बॉक्स अवॉर्डने सन्मानित केलं. कारण पेटाच्या मते पूर्वीच्या पग जाहिरातीमुळे लोकांनी मोठ्या प्रमाणावर पग ब्रीडचे कुत्रे खरेदी केले पण नंतर त्यांची काळजी न घेतल्यामुळे अनेक कुत्रे रस्त्यांवर आढळले पण झुझू कॅम्पेन असं नव्हतं. दरम्यान 2018 मध्ये वोडाफोन आणि आयडियाने टायअप केल्यानंतर झुझु टीव्हीवर दिसायचे बंद झाले. (Vodafone)

पण आज जवळपास पंधरा वर्ष झाली पण अजूनही झुझु लोकांच्या लक्षात आहे. झुझुचे क्युट फेस आणि वोडाफोनचं युनिक प्रमोशन यांनी भारतीय एडवर्टाइजमेंट क्षेत्रात अक्षरशः वादळ आणलं. तेही विदाऊट एनी स्टार पर्सनॅलिटी! दरवर्षी आयपीएल कोण जिंकलं हे जरी अनेकांच्या लक्षात नसलं तरी 15 वर्षांपूर्वी आलेले झुझु मात्र आजही अनेकांच्या मनात घर करून आहेत. भन्नाट क्रिएटिव्हिटी, तगड टीम वर्क आणि साधेपणा यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे हे झुझु! तुम्हाला त्यांची कुठली ऍड आठवते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा!


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.