ब्युटी आणि वेलनेसच्या क्षेत्रातील VLCC एक प्रसिद्ध नाव आहे. जगातील १८ देशात तो पोहचला गेला आहे. याची सुरुवात कोलकाता येथे जन्मलेल्या वंदना लूथरा यांनी केली होती. त्यांनी फक्त २ हजार रुपयांनी या कंपनीची सुरुवात केली असली तरीही त्यांचे आजचे नेटवर्थ १३०० कोटी रुपयांवर पोहचले आहे. वंदना लूथरा यांनी फक्त आपली कंपनी यशाच्या मार्गावरच नव्हे तर महिलांना सुद्धा प्रेरित केले आहे. (VLCC Success Story)
वंदना लूथरा यांचे वडिल एक मॅकेनिकल इंजिनियर होते आणि आई ऑयुर्वेदिक डॉक्टर. तिची आई एका संगठनेच्या माध्यमातून लोकंची मदत करायची. वंदना हिला तिच्याकडून प्रेरणा मिळाली आणि लोकांमध्ये बदल घडवून आणण्याचा तिने निर्धार केला. आपले लक्ष्य पूर्ण करण्यासाठी ब्युटी अॅन्ड वेलनेसमध्ये शिक्षण करण्यासाठी वंदना परदेशा गेली. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर ती भारतात आल्यानंतर तिने या क्षेत्रात आपले करियर करण्याचा विचार केला. मात्र प्रवास खडतर होता.
१९८९ मध्ये सुरु केले देशातील पहिले ट्रांन्सफॉर्मेशन सेंटर
वंदना हिला असे वाटत होते की, तिला सौंदर्य म्हणजे हेल्थ असे मानले गेले पाहिजे. मात्र तेव्हा डॉक्टर तिच्या बोलण्यावर सहमत नव्हते. लोकांना आपली गोष्ट आपल्या अंदाजात समजवणे आणि त्यांच्यामध्ये बदल करण्यासाठी वंदनाने १९८९ मध्ये आपल्या बचतीच्या माध्यमातून कंपनीची सुरुवात केली. मात्र २ हजारात दिल्लीत देशातील पहिले ट्रांन्सफॉर्मेशन सेंटर सुरु केले. तो असा काळ होता जेव्हा देशात वेलनेस मार्केटची सुरुवात झाली होती. वंदना आपल्या कामाला एका यशाच्या शिखरावर पोहचवू पाहत होती. ते साध्य झाले ”जस्सी जैसी कोई नहीं” कार्यक्रमातून.
सीरियलमुळे झाले मोठे बदल
कार्यक्रमातील प्रमुख भुमिकेत असलेल्या जस्सीला अशा एका मुलीच्या रुपात सादर करण्यात आले होते की, ती आकर्षक दिसतच नाही. मात्र नंतर तिचा मेकओवर होताना दाखवण्यात आले. आठवड्याआठवड्याला तिच्यामध्ये बदल होताना दिसून येत होता. अशा प्रकारे एक साधारण मुलगी मॉर्डन होते. टेलिव्हिजन वरील या भुमिकेच्या मेकओवरची जबाबदारी वंदना हिच्या कंपनीला मिळाली होती.
एका मुलाखतीत वंदना लुथरा हिने असे म्हटले होते की, आम्ही पहिल्यांदा मेकओवर टीव्हीतील एका कलाकाराचा केला आहे. ऐवढेच नव्हे तर यामुळे महिलांना आपल्या लूक मध्ये बदल करण्यास पसंद पडू लागले होते. तो असा टर्निंग पॉइंट होता की, जेव्हा महिला आणि तरुणींनी स्वत: मध्ये बदल करण्यास सुरुवात केली होती. यामुळेच ट्रांसफॉर्मेस सेंटरचा वेग अधिक वाढला.
…अशा प्रकारे यशाचे मार्ग मोकळे होत गेले
महिलांना स्वत: मध्ये बदल करण्याची पद्धत ऐवढी आवडली की, वीएलसीसीचे नाव अगदी वेगाने प्रसिद्ध होऊ लागले. ब्युटी अॅन्ड वेलनेस सेक्टरमध्ये क्रांति घडवणून आणण्यासह आणि नाव अधिक प्रसिद्ध करण्यामध्ये २०१३ मध्ये वंदना लूथरा हिला पद्मश्रीने गौरवण्यात आले.
२०१५ मध्ये फॉर्च्युन इंडियाने तिला भारतातील सर्वाधिक ताकदवान महिलेच्या यादीत सहभागी करुन घेत ३३ व्या रँकवर ठेवले. आपल्या क्षेत्रात खास यश मिळवल्याने मोदी सरकारने तिला ब्युटी अॅन्ड वेलनेस सेक्टर स्किलच्या काउंसिलचे चेअरपर्सन बनवले. आज वीएलसीसीचा व्यवसाय जगातील १२ देशात पसरला गेला आहे. (VLCC Success Story)
हे देखील वाचा- ब्रिटिश काळात एका वकिलाने बस चालवण्यासाठी सुरु केली होती TVS, वाचा इतिहास
कंपनीत ६ हजारांपेक्षा अधिक कर्मचारी
भारत आणि सिंगापूर मध्ये वीएलसीसीचे आपले प्लांट असून जेथे प्रोडक्ट्स तयार केले जातात. कंपनीत ६ हजार कर्मचारी काम करतात. कंपनीकडे तज्ञांनी एक मोठी टीम सुद्धा आहे. ज्यामध्ये डॉक्टर, साइकोलॉजिस्ट, न्युट्रिशनिस्ट, ब्युटिशियन, कॉस्मेटोलॉजिस्ट आणि फिजियोथेरपिस्टचा समावेश आहे. गेल्या ३२ वर्षात कंपनी आशियातील सर्वाधिक मोठी वेलनेस कंपनीत सहभागी झाली आहे.