रशिया आणि युक्रेन युद्धाला आता चार वर्ष होत आहेत. हे युद्ध संपवण्यासाठी जगभरातील नेत्यांनी प्रयत्न केले. सध्या अमेरिकेच्या मध्यस्थीने शांतता चर्चाही सुरु आहे. मात्र दोन्हीही देशांकडून त्याला अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नाही. या युद्धात दोन्ही देशांचे लाखो सैनिक मृत्युमुखी पडले आहेत. अरबो रुपये खर्च झाले आहेत. युद्धामुळे युक्रेनची अर्थव्यवस्था पूरती डुबली असून रशियावरही या युद्धामुळे मोठा परिणाम झाला आहे. ही युद्धाची धामधुम चालू असतांना रशियामधून मात्र सर्वांनाच आश्चर्यचकीत करणारी बातमी आली आहे, अर्थात ही बातमी युद्धविरामाची नाही, तर चक्क प्रेमाची आहे. रशियाचे राषट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे चक्क प्रेमात पडले आहेत. पुतिन यांनीच या प्रेमाची कबुली दिली आहे. पुतिन यांनी रशिया-युक्रेन युद्धाबाबत माहिती देण्यासाठी एक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत एका पत्रकारानं त्यांना, तुम्ही प्रेमात आहात का, असा थेट प्रश्न विचारला. या प्रश्नावर पुतिन यांनीही दिलखुलासपणे “हो, मी प्रेमात आहे” अशी कबुली दिली आणि सर्वांनी पुतिनवर अभिनंदनाचा वर्षाव केला. ( Vladimir Putin )

२४ फेब्रुवारी २०२२ रोजी, रशियाने युक्रेनवर आक्रमण केले. दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपमधील सर्वात मोठे आणि प्राणघातक युद्ध म्हणून या युद्धाचा उल्लेख होत आहे. सुरुवातीला रशिया युक्रेनवर काही दिवसातच मात करेल असा अंदाज व्यक्त होत होता. मात्र आता या युद्धाला चार वर्ष होऊन गेली तरी, हे युद्ध संपण्याची कुठलिही शक्यता दिसत नाही. या लढाईत लाखो लष्करी जवानांचा मृत्यू झाला आहे. रशियालाही मोठी आर्थिक हानी सहन करावी लागली आहे. तर युक्रेनमधील संपूर्ण आर्थिक व्यवस्था उद्धवस्त झाली आहे. या सर्वात युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्दादिमीर पुतिन आणि 42 वर्षीय माजी ऑलिंपिक जिम्नॅस्ट अलिना काबाएवा यांच्या नात्याची चर्चा कायम होती. पुतिन यांनी युद्धाच्या काळातही अलिनासाठी भव्य असा शाही महल उभारला असून त्यात अलिना आपल्या दोन मुलांसह रहात असल्याची माहिती आहे. मात्र ही सर्व माहिती ऐकीव होती. त्याबाबत कुठलाही पुरावा सादर झाला नव्हता. रशियामध्ये राष्ट्राध्यक्षांच्या वैयक्तिक जिवनाबाबत फारशी कुठलिही माहिती प्रचारमाध्यमात येत नाही. पुतिन यांनी तर यासंदर्भातील नियम अधिक कडक केले आहेत. त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक जिवनाबाबत फारशी माहिती कुणालाही नाही. मात्र अलिना आणि पुतिन यांच्या नात्याबाबत तिथे उघडपणे चर्चा होते. हाच धागा पकडून एका महिला पत्रकारानं थेट पुतिन यांनाच प्रश्न विचारला.
रशिया आणि युक्रेन युद्धामध्ये अमेरिका मध्यस्थ म्हणून येत आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी व्लादिमीर पुतिन यांनी या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. याच पत्रकार परिषदेत रशियन राज्य माध्यमांशी संलग्न असलेल्या 360 च्या रेजिना ओरेखोवा यांनी पुतिन यांना “अध्यक्ष महोदय, तुम्ही प्रेमात पडला आहात का?” असा थेट प्रश्न विचारला. रेजिना यांच्या या प्रश्नामुळे संपूर्ण पत्रकार परिषदेत शांतता पसरली. खुद्द पुतिनही काही क्षण गडबडले. मात्र नंतर त्यांचा नेहमीचा गंभीर चेहरा हसरा झाला. पुतिन यांनी “हो, मी प्रेमात आहे” असे सांगून आपल्या प्रेमाची पहिल्यांदा जाहीरपणे कबुली दिली. 42 वर्षीय माजी ऑलिंपिक जिम्नॅस्ट अलिना काबाएवासोबत आपले अठरा वर्षांचे नाते असल्याची माहितीही पुतिन यांनी दिली. अलिना आणि पुतिन यंना दहा वर्षाचा इव्हान स्पिरोडोनोव्ह आणि सहा वर्षाचा व्लादिमीर स्पिरोडोनोव्ह ही दोन मुलेही आहेत. पुतिन यांनी ही कबुली दिल्यावर सर्वांना टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन केले. ( Vladimir Putin )
=======
हे देखील वाचा : Vladimir Putin : पुतिनची महिला ब्रिगेड !
=======
पुतिन यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीला २००८ मध्ये घटस्फोट दिल्याची माहिती आहे. मात्र रशियन सरकारनं हा दावा फेटाळला. क्रेमलिनने एप्रिल २०१४ मध्ये पुतिन आणि ल्युडमिला यांच्या घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली. ल्युडमिला आणि पुतिन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना मारिया व्होरोंत्सोवा आणि कॅटरिना तिखोनोवा या दोन मुली आहेत. मारिया एक डॉक्टर आणि संशोधक आहे. कॅटरिना एक वैज्ञानिक आहे. या दोन्हीही मुली रशियाच्या मंत्रिमंडळात पुतिन यांना मदत करत आहेत. पहिल्या पत्नीला दिलेल्या घटस्फोटानंतर पुतिन यांचे नाव ५० वर्षीय स्वेतलाना क्रिव्होनोगिख या मिस रशियासोबत जोडले गेले. मात्र तिही चर्चा फारशी झाली नाही. त्यानंतर ऑलिम्पिक विजेती अलिना काबाएवा हिच्याबरोबर पुतिन यांचे नाव जोडले गेले. अलिनाने १४ जागतिक आणि २५ युरोपियन अजिंक्यपद पदके जिंकली आहेत. २००७ मध्ये निवृत्त झालेली अलिना काहीवेळा पुतिन यांच्यासोबत दिसल्यामुळे त्यांच्या नात्याबद्दल उघड चर्चा सुरु झाल्या. आता खुद्द पुतिन यांनीच या नात्याची कबुली दिली आहे.
सई बने…
