भारताप्रमाणे अमेरिकेत ही पुढील वर्षात निवडणूका होणार आहेत. २०२४ मध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीसाठी आतापासूनच तयारी करण्यास सुरुवात केली गेली आहे. येथे होणाऱ्या निवडणूकांवर भारताचे खास लक्ष असणार आहे. कारण जगातील सर्वाधिक ताकवादन पदासाठी होणाऱ्या निवडणूकीत भारतीय वंशाचे अमेरिकन लोक सुद्धा त्याच्या रिंगणात उतरणार आहेत. निक्की हेली यांच्या व्यतिरिक्त आणि एक यशस्वी तरुण भारतीय आहे ज्यांनी ही निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. (Vivek Ramaswamy)
गेल्या दिवसांपूर्वी निक्की हेली यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढण्याबद्दल आपल्या उमेदवारीची घोषणा केली होती. अमेरिकेत उमेदवारांची निवड करण्यासाठी एक दीर्घ प्रक्रिया असते, त्यानंतरच उमेदवार ठरवले जातात. निक्की हेली यांच्या व्यतिरिक्त भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी जे हेल्थ केअर आणि तंत्रज्ञान क्षेत्रात एक मोठे व्यावसायिक, रुढीवादी टीप्पणीकार आणि लेखक आहेत त्यांनी सुद्धा फॉक्स न्यूज सोबत दिलेल्या एका मुलाखतीत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या आपल्या उमेदवरीबद्दल जाहीर केले.
विवेक रामास्वामी यांनी मुलाखतीत असे म्हटले की, मला असे सांगताना गर्व होत आहे मी राष्ट्राध्यक्ष पदाच्या धर्यतीत उतरणार आहे, केवळ ३७ वर्षीय विवेक जे ‘वोक, इंक: इनसाइट कॉर्पोरेट अमेरिकाज सोशल जस्टिस स्कॅम’ चे लेखक आणि गेल्या वर्षात न्यू यॉर्कर मॅगझिन मध्ये त्यांना अँन्टी वोक, इंकचे सीईओ असे बोलले गेले होते. (Vivek Ramaswamy)
त्यांनी असे म्हटले की, हे केवळ राजकीय अभियान नव्हे. येथील अमेरिकन लोकांच्या पुढील पिढीसाठी नवे स्वप्न बनवण्याचे एक सांस्कृति आंदोलन आहे. विवेक यांनी असे ही म्हटले, तुम्ही या देशात आपल्या वर्णाच्या रंगावरुन नव्हे तर आपण आपल्या चारित्र्य, आपले योगदानच्या आधावर पुढे जाण्याचा प्रयत्न केला आहे.
बालपणातच अमेरिकेत आले
विवेक रामास्वामी जेव्हा लहान होते तेव्हाच ते आपल्या आई-वडिलांसोबत केरळातून संयुक्त राज्य अमेरिकेत येऊन स्थाईक झाले होते. तर ९० च्या दशकातते ओहिओ मध्ये एका सडपातळ मुलाच्या रुपात वाढलो. मी किताबी किडा होतोच. पण माझे आडनाव ही थोडेसे विचित्र होते. माझ्या आई-वडिलांनी मला शिकवले की, आयुष्यात पुढे जाण्यासाठी आपली वेगळी ओळख निर्माण केली पाहिजे. यश हेच माझ्यासाठी आयुष्यात पुढे जाण्याचे तिकिट होते असे त्यांनी म्हटले.
तर विवेक रामास्वामी हे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्ंम्प आणि दक्षिण कॅरोलिना मध्ये माजी गवर्नर आणि संयुक्त राष्ट्रात माजी राजदूत निक्की हेली यांच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीसंदर्भातील घोषणेनंतर ते सुद्धा रिपब्लिकन पार्टीकडून या शर्यतीत सहभागी झाले आहेत.
हे देखील वाचा- चीनी व्यावसायिक एकामोगाम एक होतायत गायब, आता बाओ फॅन बेपत्ता
यापूर्वी रिपब्लिकन पार्टीच्या भारतवंशी नेत्या निक्की हेली यांनी राष्ट्राध्यक्ष निवडणूकीतील आपल्या उमेदवारीसाठी १५ फेब्रुवारीला औपचारिक रुपात अभियानाची सुरुवात केली होती. त्याचसोबत त्यांनी आपल्या काळात राहिलेल्या नेत्या आणि डोनाल्ड ट्रंम्प यांच्या तुलनेत स्वत:ला एक युवा आणि नव्या ऑप्शनच्या रुपात सादर केले आहे. हेली या दक्षिण कॅरोलिनाच्या दोन वेळा गवर्नर राहिल्या आहेत.