Vitamin P : व्हिटॅमिन पी, ज्याला फ्लेवोनोइड्स किंवा बायोफ्लेवोनोइड्स नावानेही ओखळले जाते. येल्लो पॉलीफेनोलिक कंपाउंडचा एक मोठा समूह असून जो सर्वसामान्यपणे प्लांट बेस्ड फूड्स जसे की, भाज्या, गडद रंगाची फळं आणि कोकोमध्ये असते. क्वेरसेटिन, रुटिन, हेस्पेरिडिन आणि कॅटेचिन जसे बायोफ्लेवोनॉइड्स बहुतांश रोपांना गडद रंग देतात आणि त्यांचे अँटीऑक्सिडेंट, अँटी इंफ्लेमेंटरी आणि हार्ट डिजीज रोखण्यास मदत करतात. दरम्यान, आपले शरीर बायोफ्लेवोनॉइड्सचे उत्पादन करू शकत नाही. पण ते रोगप्रतिकारक शक्तीला सपोर्ट करणे, व्हिटॅमिन सी ची अॅक्टिव्हिटी वाढवणे आणि क्रॉनिक डिजीजपासून बचाव करण्यास महत्वाची भूमिका पार पाडते.
डार्क चॉकलेटचे सेवन करा
उच्च क्वालिटीचे डार्क चॉकलेट, खासकरुन कमीत कमी 70 टक्के कोको, कॅटेचिन आणि प्रोसायनिडिन सारखे फ्लेवोनोइड्सचे सेवन करा. यामुळे शुगर क्रेविंस कमी होते. याशिवाय शरीराला अँटी ऑक्सिडेंट्स मिळतात.
सफरचंद
सफरचंद त्याच्या सालीसोबत खावे. यामध्ये क्वेरसेटिन नावाचे बायोफ्लेवोनॉइड भरपूर प्रमाणात असते. याच्या सालीमधील फ्लेवोनॉइड्स असल्याने व्हिटॅमिन पी अधिक प्रमाणात असते.

Vitamin P
ग्रीन टी किंवा ब्लॅक टी
ग्रीन आणि ब्लॅक या दोन्ही चहामध्ये कॅटेचिन भरपूर प्रमाणात असते. जो फ्लेवोनोड्सचा एक मोठा सक्रिय ग्रुप आहे. या दोन्ही प्रकारच्या चहा बायोफ्लेवोनोइड्सची गरज पूर्ण करू शकतात.
===============================================================================================
हेही वाचा :
वजन कमी करण्यासाठी डब्रो डाएट म्हणजे काय?
Tea : चहा प्यायल्यामुळे आरोग्याला होतात ‘हे’ लाभ
===============================================================================================
बेरिजचे सेवन करा
ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, रास्पबेरी आणि ब्लॅकबेरी सारख्या बेरीजमध्ये एंथोसायनिन आणि क्वेरसेटिन भरूभर प्रमाणात असतात. जे बायोफ्लेवोनाइड्सचे एक रुप आहे. दररोज बेरीजचे सेवन केल्याने व्हिटॅमिन पी ची कमतरता पूर्ण होते. याशिवाय बेरीजमधील अँटीऑक्सिडेंट्स सुद्ध भरपूर प्रमाणात असतात जे शरीराला मिळतात.(Vitamin P)
आंबट फळांचे सेवन
संत्री, लिंबू आणि द्राक्षे याचे सेवन करू शकता. यामध्ये बायोफलेवोनोइड्स खासकरुन हेस्पेरिडिन आणि रुटीनचे उत्तम सोर्स मानले जातात. आंबट फळांच्या गरामध्ये बायोफ्लोवोनाइड्स खूप असतात. यामुळे आंबट फळ डाएटमध्ये खाऊ शकता.