Home » Vitamin P आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर

Vitamin P आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर

आपल्या शरिराला हेल्दी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन्स आणि मिनिरल्सची आवश्यकता असते. खाण्यापिण्याच्या गोष्टींमधून आपल्याला ते मिळत राहते.

by Team Gajawaja
0 comment
Vitamin P health benefits
Share

आपल्या शरिराला हेल्दी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन्स आणि मिनिरल्सची आवश्यकता असते. खाण्यापिण्याच्या गोष्टींमधून आपल्याला ते मिळत राहते. विविध व्हिटॅमिन्स शरिरात विविध प्रकारे काम करतात आणि आजारांपासून आपल्याला दूर ठेवण्यास महत्त्वाची भुमिका निभावतात. व्हिटॅमिन ए, बी, सी, डी सह आणखी काही प्रकारचे व्हॅटिमिन्स असतात ज्याची आपल्याला प्रत्येक दिवशी गरज भासते. आता पर्यंत तुम्ही या प्रमुख व्हिटॅमिन्स बद्दल ऐकले असेल. मात्र व्हिटॅमिन P बद्दल कधी ऐकले आहे का? याच बद्दल आपण आज अधिक जाणून घेणार आहोत. (vitamin-p-health benefits)

हेल्थलाइनच्या रिपोर्ट्सनुसार, प्लांट कंपाउंड्सच्या फ्लेवोनोइड्सलाच व्हिटॅमिन पी असे म्हटले जाते. हे वास्तविकरित्या व्हिटॅमिन नाही. तर अँन्टीऑक्सिडेंट आणि अँन्टी इंफ्लेमेटरी प्रॉपर्टी असणारे फाइटोन्युट्रिएंट्सचा एक वर्ग आहे. हे सर्व आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. फळं, भाज्या, चहा, कोको आणि वाइनमध्ये काही प्रकारचे फ्लेवोनोइड असतात.फ्लेवोनोइड्सला बायोफ्लेवोनोइड्सच्या रुपात ही ओळखले जाते.

पहिल्यांदा जेव्हा १९३० मध्ये वैज्ञानिकांनी संत्र्यामधून फ्लेवोनोइड्स काढले तेव्हा त्यांना एका नव्या प्रकारचे व्हिटॅमिन मिळाले. त्यांनी त्याला व्हिटॅमिन पी असे नाव दिले. या नावाचा आता वापर केला जात नाही. कारण फ्लेवोनोइड व्हिटॅमिन नाही. फ्लेवोनोइड्स झाडांमध्ये असते.

आरोग्यदायी फायदे
असे मानले जाते की, फ्लोवोनोइड विविध प्रकारे आरोग्यासाठी फायदेशीर असते. हे हार्ट डिजीज, मधुमेह आणि अन्य आजार रोखण्यास मदत करतात. फ्लोवोनोइड्स अँन्टीऑक्सिडेंट्सच्या रुपात काम करतात. हे शरिरात फ्री रेडिकल्सचा परिणाम कमी करण्यास मदत करतात. हे फ्री रेडिकल्स सेल्स डॅमेज करु शकतात आणि यामुळे काही गंभीर आजार होऊ शकतात.

काही अभ्यासातून असे समोर आले आहे की, फ्लेवोनोइड्स आपल्या ब्रेनच्या कोशिकांचे संरक्षण करते आणि ब्रेन हेल्थची सुद्धा काळजी घेते. फ्लेवोनोइड्स असणाऱ्या डाएटचे सेवन केल्याने टाइप-२ मधुमेहाचा धोका कमी होतो. प्रतिदिन ३०० मिलिग्रॅम फ्लेवोनोइडचे सेवन केल्याने मधुमेहाचा धोका पाच टक्क्यांनी कमी होऊ शकतो.(vitamin-p-health benefits)

हेही वाचा- Fruits for Weight Loss: वजन कमी करायचयं? मग आजपासून ‘ही’ फळे  खाण्यास सुरुवात करा !

शरिरात व्हिटॅमिन पी ची कमतरता भरुन काढण्यासाठी तुम्ही पुढील फुड्स खाऊ शकता.
– तुरट फळं जसे की, संत्र, लिंबू
-डार्क चॉकलेट मध्ये कॅटेचिन आणि प्रोसायनिडिन सारखे फ्लेवोनोइड असतात
-ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी आणि ब्लॅकबेरी मध्ये व्हिटॅमिन पी पुरेशा प्रमाणात असतात
-ग्रीन टी कॅटेचिन युक्त असते, जे एक प्रकारचे फ्लेवोनोइड असून आरोग्याला यामुळे काही फायदे होतात
-केळ, पालक आणि ब्रोकोली मध्ये सुद्धा व्हिटॅमिन पी आढळते


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.