Home » शरीरातील व्हिटॅमिन K च्या कमतरतेमुळे स्मरणशक्ती होईल प्रभावित, करा हे उपाय

शरीरातील व्हिटॅमिन K च्या कमतरतेमुळे स्मरणशक्ती होईल प्रभावित, करा हे उपाय

by Team Gajawaja
0 comment
Vitamin K Deficiency
Share

Vitamin K Deficiency : आपल्या डोक्यात दररोज वेगवेगळे विचार येतात. यावेळी दररोजच्या जीवनात घडणाऱ्या घटनाही स्टोअर होतात. पण आजच्या काळात टेन्शन, चिंता, अनियमित लाइफस्टाइल आणि असंतुलित आहारामुळे लोकांमध्ये पोषण तत्त्वांच्या कमतरतेमुळे आरोग्यासंबंधित काही समस्या उद्भवल्या जातात. पोषण तत्त्वांच्या कमतरतेमुळे मेंदूवर वाईट परिणाम होऊ शकतो. काहींमध्ये स्मरणशक्ती कमी होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. खरंतर, स्मरणशक्ती कमी होण्यामागे बहुतांशजण तणाव असल्याचे बोलतात. पण शरीरात व्हिटॅमिन के च्या कमतरतेमुळेही स्मरणशक्ती प्रभावित होऊ शकते. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.

व्हिटॅमिन के आणि मेंदूशी संबंध
व्हिटॅमिन के एक फॅटमध्ये विरघळणारे व्हिटॅमिन असून जे मुख्य रुपात रक्ताच्या गाठी तयार होण्यास मदत करतात. याशिवाय हाडांना बळकटी मिळणे, हृदयाचे आरोग्य आणि मेंदूच्या कार्यासाठी मदत करते. व्हिटॅमिन के चे दोन मुख्य प्रकार असतात. यामध्ये व्हिटॅमिन के 1 आणि व्हिटॅमिन के 2 चा समावेश आहे. व्हिटॅमिन के 1 हिरव्या पालेभाज्यांमधून तर व्हिटॅमिन के 2 आतड्यांमदील उत्तम बॅक्टेरियाद्वारे तयार होते. याशिवाय काही फर्मेंटेड फूड्समध्येही असते. काही अभ्यासातून असे समोर आले आहे की, व्हिटॅमिन के केवळ रक्त आणि हाडांसाठी नव्हे तर मेंदूच्या कार्यासाठी देखील आवश्यक आहे.

Mental stress

-व्हिटॅमिन के स्फिगोलिपिड्सच्या निर्माणसाठी मदत करते. हे एक प्रकारचे वसा असून जे मेंदूच्या कोशिकांमधील संरचना आणि कार्यासाठी महत्वाचे असते. हे न्यूरॉन्समध्ये संकेत पाठवणे आणि आठवणी निर्माण होण्यास मदत करते.
-व्हिटॅमिन के नैसर्गिक रुपात अँटीऑक्सिडेंट्स आणि अँटी-इंफ्लेमेंटरी गुण असतात, जे मेंदूला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि सूजेच्या समस्येपासून दूर राहण्यास मदत करतात.
-ग्लूटामेट एक प्रमुख न्यूरोट्रांसमीटर असून जे मेंदूत माहिती स्टोअर साठवणे-विसरण्यासाठी महत्वाचे असते. व्हिटॅमिन के याच्या गतीविधी संतुलित राखण्यास मदत करते. (Vitamin K Deficiency)

======================================================================================================

हेही वाचा : 

Urine Therapy : सगळीकडे चर्चेत असलेली युरीन थेरपी म्हणजे काय?

Leukorrhea : व्हाईट डिस्चार्ज होतो…? आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

=======================================================================================================

व्हिटॅमिन के आणि स्मरणशक्तीमधील संबंध
व्हिटॅमिन के च्या कमतरतेमुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यास अडथळा येऊ शकतो. पण याचा आता स्मरणशक्तीवरही प्रभाव पडू शकतो. यामुळे लक्ष केंद्रित करण्यास समस्या, अल्पकालीन आणि दीर्घकालीन स्मरणशक्तीमध्ये घट, शिकण्याची क्षमता कमी, भ्रम किंवा विचार करण्याची प्रक्रिया मंदावली जाणे.

व्हिटॅमिन के कमतरता कोणामध्ये असू शकते?
-हिरव्या भाज्यांचे सेवन न करणाऱ्या व्यक्ती
-पचनक्रिया कमजोर असणाऱ्या
-दीर्घकाळापर्यंत अँटीबायोटिक्स करणाऱ्या व्यक्ती
-नवजात बालक, ज्यांच्यामध्ये जन्मापासून व्हिटॅमिन के ची कमतरता आहे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.