Vitamin E Capsule Benefits : कोमल आणि चमकदार त्वचा प्रत्येक महिलेला हवी असते. यासाठी वेगवेगळ्या ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर केला जातो. तरीही त्वचेवर ग्लो येत नाही. केमिकलयुक्त प्रोडक्ट्सच्या मदतीने त्वचेवर ग्लो येत असला तरीही कालांतराने त्वचेचे नुकसानच होते. अशातच त्वचेवर नॅच्युरल ग्लो येण्याासाठी व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर करू शकता. या कॅप्सूलमध्ये अँटीऑक्सिडेंट्स असतात जे त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. यामुळे स्किन केअर रुटीनमध्ये व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर केला जातो. जाणून घेऊया व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा नक्की योग्य पद्धतीने कसा वापर करावा याबद्दल सविस्तर…
एलोवेरा जेलसोबत करा वापर
एलोवेरा जेलसोबत व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर करू शकता. यासाठी एक चमचा एलोवेरा जेलमध्ये व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिक्स करुन नॅच्युरल मॉइश्चराइजर तयार करू शकता. हे मिश्रण चेहरा आणि मानेवर लावू शकता. खासकरुन रात्रीच्या वेळेस लावू शकता आणि सकाळी उठल्यावर थंड पाण्याने धुवा. दररोज एलोवेरा जेल आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर केल्याने त्वचेवर नॅच्युरल ग्लो येतो.

Vitamin E capsule
नारळाचे तेल
नारळाचे तेल आणि व्हिटॅमिन ई चे कॉम्बिनेशन त्वचेसाठी फायदेशीर ठरते. यामुळे त्वचा चमकदार होते. यामुळे रात्री एक चमचा तेलात एक चमचा व्हिटॅमिन ई कॅप्सूलचे तेल मिक्स करा. यानंतर मानेसह संपूर्ण चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा. सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा.
दह्यासोबत करा वापर
व्हिटॅमिन ई कॅप्सूल दह्यासोबत वापरू शकता. यासाठी एका वाटीत एक चमचा दही आणि एक व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिक्स करुन घ्या. हे मिश्रण चेहऱ्यावर लागून मसाज करा. 20 मिनिटांपर्यंत मिश्रण चेहऱ्याला लावून ठेवल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे त्वचेवरील पिंपल्स-डाग दूर होण्यास मदत होईल.
=====================================================================================================
हेही वाचा :
Purple Day : जाणून घ्या काय आहे एपिलेप्सी आजार
Waxing : फेशियल वॅक्स करताना कोणती काळजी घ्यावी
======================================================================================================
मधासोबत व्हिटॅमिन ई
व्हिटॅमिन ई कॅप्सूल मधासोबत मिक्स करुनही लावू शकता. यासाठी एक चमचा मधासोबत दोन चमचे व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावून 20 मिनिटे ठेवा. यामुळे त्वचेला ग्लो येतो आणि कोरड्या त्वचेची समस्या दूर होते. (Vitamin E Capsule Benefits)
ऑलिव्ह ऑइल आणि व्हिटॅमिन ई
ऑलिव्ह ऑइलसोबत व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिक्स करुन त्वचेला लावू शकता. यासाठी एक चमचा ऑलिव्ह ऑइल घेऊन त्यामध्ये दोन व्हिटॅमिन ई कॅप्सूल घाला. यानंतर 10 मिनिटे मिश्रण चेहऱ्याला लावून स्वच्छ पाण्याने धुवा. त्वचा अत्याधिक कोरडी असल्यास मिश्रण रात्रभर चेहऱ्याला लावून झोपू शकता.
ग्लिसरिनसोबत करा वापर
व्हिटॅमिन ई ग्लिसरिनसोबत चेहऱ्याला लावू शकता. यामुळे त्वचा मऊसर होण्यास मदत होते. त्वचेमधील कोरडेपणा दूर होते.