Home » Vitamin D : उन्हाळ्यात व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी खा हे पदार्थ, रहाल तंदुरुस्त

Vitamin D : उन्हाळ्यात व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी खा हे पदार्थ, रहाल तंदुरुस्त

by Team Gajawaja
0 comment
Vitamin D Deficiency
Share

Vitamin D Foods : उन्हाळा म्हणजे सूर्यप्रकाशाचा ऋतू, आणि सूर्यकिरणांमुळे शरीरात व्हिटॅमिन डी नैसर्गिकरित्या तयार होते. मात्र, अनेक वेळा पुरेसा वेळ उन्हात न घालवल्याने किंवा सनस्क्रीन वापरल्याने त्वचा पुरेसे व्हिटॅमिन डी तयार करू शकत नाही. त्यामुळे आहारातूनही व्हिटॅमिन डी मिळवणं महत्त्वाचं ठरतं. व्हिटॅमिन डी हाडं बळकट ठेवण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि मूड चांगला राखण्यासाठी आवश्यक आहे. उन्हाळ्यात कोणते अन्नपदार्थ खाल्ले की शरीराला आवश्यक व्हिटॅमिन डी मिळू शकते, हे जाणून घेऊया.

मासे (Fish)
माशांमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन, खनिज आणि हेल्दी वसा असते. याशिवाय ओमेगा-3 फॅटी अॅसिडचाही मासे एक उत्तम स्रोत मानले जातात. यामुळे हृदयासह मेंदूच्या कार्यासाठी मदत होते. तर साल्मन, टूना, सार्डिन आणि मॅक्रेल यांसारख्या तेलकट माशांमध्ये व्हिटॅमिन डी मोठ्या प्रमाणात असतं. यामध्ये ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिडही असतं, जे हृदयासाठी फायदेशीर ठरतं. आठवड्यातून किमान दोन वेळा माशांचा आहारात समावेश केल्यास शरीराला भरपूर व्हिटॅमिन डी मिळू शकतं.

अंडी (Eggs)
अंड्यांमध्ये काही महत्वपूर्ण पोषण तत्त्वे असतात. जसे की, प्रोटीन, व्हिटॅमिन आणि खनिज असतात. हा एक पूर्ण प्रोटीनचा स्रोत आहे. याचे सेवन केल्याने मेंदूच्या विकासासह हाडांना बळकटी देण्यास मदत होते. याशिवाय अंड्याचा पिवळसर बलक म्हणजेच ‘योक’ हे व्हिटॅमिन डीचं उत्तम स्रोत आहे. रोज एक उकडलेलं किंवा अर्धसालं अंडं खाल्ल्यास शरीराला आवश्यक प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळू शकतं. विशेषतः उन्हाळ्यात हलका आणि प्रथिनेयुक्त आहार हवा असल्यास अंडी सर्वोत्तम पर्याय आहे.(Vitamin D Foods)

Vitamin D foods

Vitamin D foods

दुग्धजन्य पदार्थ (Dairy Products)
डेअरी प्रोडक्ट्समध्ये प्रोटीन, कॅल्शियम, फॉस्फोरोस, व्हिटॅमिन डी आणि राइबोफ्लेविन, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन ए सारखी पोषण तत्त्वे असतात. यामुळे हाडं आणि दातांना बळकटी मिळते. एवढेच नव्हे रोगप्रतिकारक शक्ती मजबूतही होचे.  तर दूध, दही, चीज, लोणी यांसारखे पदार्थ नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डीचे स्रोत नसले तरी आता अनेक उत्पादक व्हिटॅमिन डीने फोर्टिफाय केलेले (Vitamin D fortified) दूध विकतात. उन्हाळ्यात थंड दुधाचे शेक्स, दही किंवा लस्सी यांचा समावेश केल्यास शरीराला थंडावा मिळतो आणि व्हिटॅमिन डीची भरही पडते.(Health Care Tips)

================

हे ही वाचा : 

उन्हाळ्यात अन्नपदार्थ लगेच खराब होतात? असे करा स्टोअर

उन्हाळ्यात चुकून पण खाऊ नका ह्या भाज्या, बिघडेल आरोग्य

==================

मशरूम (Mushrooms)
मशरूममध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन, खनिज आणि फायबरसारखी पोषण तत्त्वे असतात. मशरूममध्ये कॅलरीज कमी असतात. यामुळे वजन कमी होणे, पचनक्रिया सुधारणे, रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत होते. तर सूर्यप्रकाशात वाढवलेले मशरूम हे शाकाहारींसाठी व्हिटॅमिन डीचे उत्तम स्त्रोत आहेत. यामध्ये डी-२ प्रकारचं व्हिटॅमिन डी आढळतं. उन्हाळ्यात हलक्या भाज्यांमध्ये मशरूमचा वापर करून आरोग्यदायी आणि पोषक आहार घेतला जाऊ शकतो.(Latest Marathi News)

संपूर्ण धान्ये व बिया (Whole Grains & Seeds)
क्विनोआ, ओट्स, फ्लॅक्ससीड्स (अळशी), चिया बिया यामध्येही काही प्रमाणात व्हिटॅमिन डी आढळते. विशेषतः आरोग्यसंपन्न नाश्त्यासाठी या पदार्थांचा समावेश करता येतो.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.