Home » व्हिटॅमिन डी युक्त पदार्थ कोणते? जाणून घ्या आरोग्यासाठी होणारे फायदे

व्हिटॅमिन डी युक्त पदार्थ कोणते? जाणून घ्या आरोग्यासाठी होणारे फायदे

by Team Gajawaja
0 comment
Vitamin D foods
Share

आपण आपल्या हातूनच काही आजारांना आमंत्रण देतो जसी की, अनियमित दिनचर्या आणि असंतुलित आहार. बदलत्या वातावरणानुसार आपल्याला आहारात पोषक तत्ववांचा वापर आपल्या खाण्यापिण्यात केला पाहिजे. असे न केल्यास शरिरात पोषक तत्वांची कमतरता भासते. हिच कमतरता आपल्याला काही घातक आजारांना बळी पाडते. अशातच पोषक तत्वांबद्दल बोलायचे झाल्यास त्यापैकी एक असलेले व्हॅटिमिन डी (Vitamin D foods) हे केवळ शरिरातील हाडं मजबूतच करत नाहीत तर अन्य आजारांची जोखिम सुद्धा कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे आम्ही तुम्हाला व्हिटॅमिन डी युक्त असे कोणते पदार्थ आहेत आणि ते खाल्ल्याने शरिराला कशा प्रकारे फायदा होतो याबद्दल सांगणार आहोत.

व्हिटॅमिन डी चे आरोग्यासाठी होणारे फायदे पाहूयात

-व्हिटॅमिन डी शरिरातील कॅल्शिअम शोषण्यास मदत करु शकता. यामुळे शरिरातील हाडांसंबंधित विकार जसे ऑस्टियोपोरोसिस आणि रिकेट्सची जोखीम कमी होऊ शकते.
-शरिरात कॅल्शिमचा पुरवठा करत व्हिटॅमिन डी हे हाडांसह दातांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
-व्हिटॅमिन डी रक्त वाहिन्या आणि शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते.
-शरिराज पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन डी असल्यास तुम्हाला सूज येण्यासंबंधित समस्या दूर राहतात.
-व्हिटॅमिन डी हे डोक्याच्या आरोग्यासाठी ही फायदेशीर आहे.
-हृदयाच्या आरोग्यासाठी ही व्हिटॅमिन फायदेशीर मानले जाऊ शकते.
-त्वचेसंबंधित समस्या जसे अॅक्ने पासून बचाव करण्यासाठी व्हिटॅमिन डी तुमची मदत करु शकते.

व्हिटॅमिन डी युक्त असे कोणते पदार्थ आहेत?
जर पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन डी असलेले पदार्थ नियमित रुपात खाल्ल्यास शरिरात व्हिटॅमिन डी च्या कमतरतेची लक्षण कमी होऊ शकतात. तसेच व्हिटॅमिन डी च्या स्रोतामुळे व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे होणारे रोगांपासून ही सुरक्षितता देते.

-गाईचे दूध
व्हिटॅमिन डी च्या स्रोतमधअये दूध हे सर्वात प्रथम येते. त्यामुळेच शाकाहारी लोक दूधाचे सेवन व्हिटॅमिन डी ची कमतरता दूर करण्यासाठी करतात. दूधात काही पोषक तत्व असतात. त्यामुळेच यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, फॉस्फरेस, मॅग्नेशियम, मॅग्नीज आणि झिंकसह व्हिटॅंमिन डीसह आणखी काही पोषक तत्व असतात.

-अंडी
व्हिटॅमिन डी फूड्सच्या आधारावर आहारात तुम्ही अंड्यांचा सुद्धा समावेश करु शकता. एनसीबीआयच्या साइटवर प्रकाशित करण्यात आलेल्या एका वैज्ञानिक रिसर्चकडून याची पुष्टी करण्यात आली आहे. त्यात असे म्हटले आहे की, अंड्यात प्रोटीन आणि कॅल्शिअम असतात त्याचसोबत व्हिटॅमिन डी सुद्धा भरपूर प्रमाणात असते. यामुळेच व्हिटॅमिन डी असणाऱ्या आहारात तुम्ही अंडी खाऊ शकता. याच्या सेवनाने शरिरात व्हिटॅमिन डी सह अन्य पोषक तत्वांची कमतरता सुद्धा पूर्ण होऊ शकते.

Vitamin D foods
Vitamin D foods

-मासे
असे काही प्रकारचे मासे आहेत त्यांना व्हिटॅमिन डी चा उत्तम स्रोत असल्याचे मानले जाते. ज्या लोकांना मासे खाणे आवडते त्यांनी व्हिटॅमिन डी फूड्सच्या आधारावर आहारात मासे जरुर सामील करा. व्हिटॅमिन डी(Vitamin D foods) युक्त आहारात तुम्ही सालमन मास, कॅटफिश, कार्प फिश, कॅन्ड ट्युना माशाचा समावेश करु शकता.

हे देखील वाचा- व्यायामाची ही गरज न भासणारे Fist Diet नक्की आहे तरी काय?

-फोर्टिफाइड खाद्य
व्हिटॅमिन डी ची कमतरता पूर्ण करण्यासाठी तुम्ही फोर्टिफाइड खाद्य खाऊ शकता. एनसीबीआयच्या एका रिसर्च नुसार ४ हजार इसवी सनपूर्वी विविध खाद्यांमध्ये फोर्टिफिकेशन होऊ लागले होते. त्याच अंतर्गत असे काही खाद्यपदार्थ आहेत ज्यामध्ये व्हिटॅमिन डी चे सुद्धा फोर्टिफिकेशन केले जाते. व्हिटॅमिन डी युक्त फोर्टिफिकेशन खाद्यात दूध आणि अन्य रेडी टू ईट मील सारख्या खाद्यांचा समावेश केला जाऊ शकतो. तर फोर्टिफाइड खाद्यांमध्ये असलेले व्हिटॅमिन डी चे प्रमाण जाणून घेण्यासाठी प्रोडक्टच्या पॅकेजवर दिली गेलेली माहिती आणि पोषक तत्वे व्यवस्थितीत वाचा.

-मशरुम
व्हिटॅमिन डी युक्त फुड्समध्ये मशरुमचा समावेश केला जातो. अन्य व्हिटॅमि डी असणाऱ्या आहाराप्रमाणे यामध्ये सुद्धा अधिक प्रमामात व्हिटॅमिन डी नसते पण त्याचा उपयोग हा काही आजारांसंबंधित समस्या दूर करण्यास केला जातो. तर जी लोक नॉन-व्हेज खात नाहीत त्यांनी मशरुम खावे. पण व्हिटॅमिन डी ची शरिरातील कमतरता काही प्रमाणात दूर करण्यास मदत करते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.