चेहऱ्याची किंवा त्वचेची काळजी घेण्यासाठी मार्केटमध्ये विविध प्रोडक्ट्स असतात. त्यापैकीच एक म्हणजे व्हिटॅमिन सी. जे त्वचेला चमकदार बनवण्यासह हेल्दी ठेवण्याचे काम करते. व्हिटॅमिन सी पासून तयार करण्यात आलेले विविध प्रोडक्ट्स तुम्हाला मिळतात. मात्र ते लावण्याची योग्य पद्धत नेमकी काय आहे हे फार कमी लोकांना माहिती असते. खरंच ते त्वचेवर दोन वेळा अप्लाय करायचे असते का? याच संदर्भातील अधिक माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. (Vitamin C use)
-सकाळी लावणे
काही लोक असे मानतात की, व्हिटॅमिन सी सकाळी लावल्याचे काही फायदे होतात. यामध्ये असलेले अँन्टीऑक्सिडेंट त्वचेला प्रोटेक्ट करते आणि सुर्याच्या किरणांपासून तुमच्या त्वचेला बचावते. अशातच तुमची त्वचा ग्लो होतो.
-रात्री लावणे
काही लोक असे मानतात की, व्हिटॅमिन सी रात्रीच्या वेळी लावणे उत्तम असते. कारण यामध्ये असलेले तत्व ते त्वचेला रात्री झोपतेवेळी व्यवस्थितीत रिपेअर करु शकते. तसेच कोलेजचा स्तर ही वाढला जातो.
कोणत्या गोष्टींची काळजी घ्याल
-जर तुम्ही ते वापरणार असाल तर पॅच टेस्ट जरुर करा. थेट चेहऱ्यावर लावताना ते कमी प्रमाणात घ्या
-प्रोडक्ट थेट लावण्याऐवजी त्यावर दिलेली माहिती व्यवस्थितीत वाचून घ्या
-व्हिटॅमिन सी च्या प्रोडक्ट्सचा वापर करण्यापूर्वी डर्मेटोलॉजिस्टचा सल्ला घ्या. त्याचसोबत आपला स्किन टाइप नक्की कोणता आहे हे सुद्धा जाणून घ्या
-जर तुम्हाला कोणतीही समस्या जसे की, खाज किंवा रेडनेस आल्यास तर अशा प्रकारच्या गोष्टी अजिबात त्वचेवर लावू नका
व्हिटॅमिन सी सीरमचे फायदे
-उत्तम अँन्टीऑक्सिडेंट
हे एक उत्तम अँन्टीऑक्सिडेंट आहे. म्हणजेच तुमच्या त्वचेवर प्रदुषणामुळे, स्मोकिंग, ऐजिंग आणि स्ट्रेसमुळे जे फ्री रेडिकल्स निर्माण होतात ते व्हिटॅमिन सी कमी करते.
-अँन्टी एजिंग एजेंटच्या रुपात काम करते
व्हिटॅमिन सी, एक उत्तम अँन्टी एजिंग एजेंटच्या रुपात काम करते. खरंतर आपल्या त्वचेत एक अँन्टी एजिंग प्रोटीन असते. ज्याला कोलेजन असे म्हटले जाते. व्हिटॅमिन सी सीरम त्वचेवरील कोलेजेनला बूस्ट करते. कोलेजन आपल्या त्वचेला घट्ट करण्याचे काम करते. तसेच प्रीमेच्योर एजिंगला सुद्धा कमी करण्याचे काम करते. (Vitamin C use)
-पिगमेंटेशन कमी करते
त्याचसोबत यामुळे पिगमेंटेशन कमी होते. कारण व्हिटॅमिन सी आपल्या त्वचेत जे मेलेनिन असतात ते कमी करते. त्यामुळेच आपल्या त्वचेवर असलेले काळे डाग असतात ते पुसट होतात.
मात्र जर तुमचे पिगमेंटेशन अधिक डीप असेल तर तुम्हाला मैलाज्मा आहे. हे केवळ व्हिटॅमिन सी मुळे बरे होत नाही. त्यासाठी तुम्हाला एका उत्तम डर्मेटोलॉजिस्टला भेटावे लागेल.