Home » Uttar Pradesh : चला देशातल्या पहिल्या विस्टाडोम ट्रेनच्या प्रवासाला

Uttar Pradesh : चला देशातल्या पहिल्या विस्टाडोम ट्रेनच्या प्रवासाला

by Team Gajawaja
0 comment
Uttar Pradesh
Share

काचेची आगीनगाडी म्हणजेच, विस्टाडोम ट्रेन. परदेशात मोठ्या प्रमाणात असणा-या या विस्टाडोम ट्रेनचे भारतीयांनाही आकर्षण आहे. भारतातील काही प्रमुख रेल्वेगाड्यांना विस्टाडोम डबे जोडण्यात आले आहेत. मात्र उत्तरप्रदेश राज्यानं यात एक पाऊल पुढे टाकले आहे. उत्तरप्रदेशमध्ये आता देशातील पहिली विस्टाडोम ट्रेन सुरु होत आहे. कतरनियाघाट ते दुधवा व्याघ्र प्रकल्पाची सफर या विस्टाडोम ट्रेनमार्फत करता येणार आहे. यातून जंगल सफारीचा रोमांचक अनुभव पर्यटकांना मिळणार आहे. (Uttar Pradesh)

ही विस्टाडोम ट्रेन 12 महिने पर्यटकांच्या सेवेत उपलब्ध रहाणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या ऋतुमधील या जंगलांचे सौंदर्यही ट्रेनमध्ये बसून पर्यटकांना बघता येणार आहे. सध्या फक्त शनिवार आणि रविवार या दोन दिवसात पर्यटकांना या विस्टाडोम सफारीचा फायदा पर्यटकांना घेता येणार आहे. मात्र लवकरच उत्तर प्रदेश पर्यटन विभाग ही ट्रेन आठवड्यातले सातही दिवस चालवण्याचा विचार करत आहे. भारतातील पहिली विस्टाडोम ट्रेन चालू करण्याचा मान उत्तरप्रदेश सरकारला मिळाला आहे. उत्तरप्रदेशमधील प्रसिद्ध दुधवा व्याघ्र प्रकल्पाला यातून पर्यटक भेट देऊ शकणार आहेत. दुधवा व्याघ्र प्रकल्प हा उत्तर प्रदेश राज्यातील लखीमपूर खेरी आणि बहराइच जिल्ह्यांमध्ये जवळपास 495 चौरस मैल क्षेत्रफळला व्यापणारा प्रकल्प आहे. (Latest Marathi News)

त्यात किशनपूर वन्यजीव अभयारण्य, दुधवा राष्ट्रीय उद्यान आणि कतरनियाघाट वन्यजीव अभयारण्य यांचाही समावेश आहे. दुधवा राष्ट्रीय उद्यानात विविध प्रकारचे वन्यजीव आढळतात. यात वाघ, हत्ती, गेंडा, बिबट्या, अस्वल, विविध प्रकारचे हरण, हजारो पक्षी, सरपटणारे प्राणी आणि अन्यही प्राण्यांचा समावेश आहे. शिवाय विविध प्रकारची वनसंपदा यात आहे. विस्टाडोमच्या माध्यमातून या सर्व प्राण्यांना पर्यटकांना जवळून बघता येणार आहे. आता या प्रकल्पामध्ये विस्टाडोम ट्रेन फिरणार आहे. उत्तरप्रदेशमधील पर्यटनाला यामुळे अधिक चालना मिळणार आहे. कतरनियाघाट वन्यजीव अभयारण्यापासून दुधवा व्याघ्र प्रकल्पापर्यंत चालणा-या पर्यटन ट्रेनमध्ये विस्टाडोम कोचचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. ही संपूर्ण विस्टाडोम ट्रेन 12 महिने पर्यटकांसाठी उपलब्ध असणार आहे. (Uttar Pradesh)

विस्टाडोम हा एक खास प्रकारचा एसी कोच आहे. भारतीय रेल्वेने पर्यटनाला चालना देण्यासाठी त्याचे डिझाइन केले आहे. या कोचमध्ये मोठ्या खिडक्या, काचेचे छत आणि अन्य वैशिष्ट्ये आहेत. यातून प्रवाशांना प्रवासादरम्यान निसर्गातून फिरल्याचा आनंद घेता येतो. शिवाय या कोचचे छतही काचेचे असते. या कोचमधील सीट्स 360 अंश फिरवू शकतात, त्यामुळे प्रवाशांना त्यांच्या पसंतीच्या दिशेने पाहता येते. सोबतच या डब्यांमध्ये एलईडी लाईट्स, प्रवासी माहिती प्रणाली, स्वयंचलित स्लाइडिंग दरवाजे आणि इनबिल्ट जीपीएस-आधारित माहिती प्रणाली, यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश असतो. आता दुधवा राष्ट्रीय प्रकल्पासाठी सुरु होणा-या या विशेष विस्टाडोम ट्रेनमध्ये या प्रकल्पातील वन्यजीवांची आणि वनसंपदेची माहितीही देण्यात येणार आहे. येथे येणा-या पर्यटकांना वर्षभर निसर्ग मार्ग आणि जंगल सफारीचा अनोखा अनुभव यातून घेता येणार आहे. (Latest Marathi News)

विस्टाडोम कोचद्वारे, पर्यटकांना 107 किमी लांबीच्या जंगलात प्रवास करता येईल. या प्रवासात निसर्गाची अनेक रुपे पहाता येतील. जैवविविधता आणि वन्यजीव जवळून पहाता येणार आहे. 4 तास 25 मिनिटांच्या या प्रवासासाठी प्रति पर्यटक 275 रुपयांचे तिकीट असणार आहे. हे शुल्क कर्तानियाघाट ते दुधवा राष्ट्रीय उद्यानापर्यंत असणार आहे. यासाठी उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊहून कर्तनियाघाटला पर्यटकांना घेऊन जाण्यासाठी एक पॅकेज तयार केले जाणार आहे. ही विस्टाडोम ट्रेन बिछिया, मांझरा पूर्वा, खैरातिया डॅम रोड, टिकुनिया, बेलराईन, दुधवा, पलिया कलान, भीरा खेरी या नऊ स्थानकांवरून जात मैलानी स्टेशनला पोहचणार आहे. (Uttar Pradesh)

=======

हे देखील वाचा : Train : रेल्वेच्या बोगी वेगवेगळ्या रंगाच्या का असतात?

Indian Spy : शत्रूने कापले होते ज्यांचे स्तन अशा भारताच्या पहिल्या महिला गुप्तहेर नीरा आर्य

=======

भारतात सध्या 124 व्हिस्टाडोम कोच उपलब्ध आहेत. हे विस्टाडोम कोच पुणे-मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेसमध्ये आहे. सोबतच पुणे – सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेस, मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस, भोपाळ-जबलपूर जनशताब्दी एक्सप्रेस, अहमदाबाद-केवडिया एक्सप्रेस, बंगळुरू-मंगलोर, बंगळुरू-कारवार, कालका-शिमला, विशाखापट्टणम-अराकू, दादर-मडगाव या लांब मार्गाच्या ट्रेनमध्येही असेच विस्टाडोम कोच बसवण्यात आले आहेत. मात्र त्यांची संख्या मर्यादित आहे. एक किंवा दोन असे हे कोच या गाड्यांमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळेच संपूर्ण विस्टाडोम ट्रेन कशी असेल याची उत्सुकता आहे. (Latest Marathi News)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.