बिहार येथे एक प्रमुख मंदिर आहे. हे मंदिर म्हणजे गया येथील विष्णुपाद मंदिर. या मंदिराचे दरवाजे सूर्य किंवा चंद्रग्रहणाच्या वेळी बंद होत नाहीत, तर या मंदिरात ग्रहण काळात पिंडदान करणे खूप शुम मानले जाते. याशिवाय दिल्लीतील कालका जी माता मंदिराचे दरवाजे ग्रहण काळातही बंद करण्यात येता नाहीत. असे मानले जाते की, माता कालकाची दैवी शक्ती एवढी मोठी आहे की, ग्रहण काळातही मंदिरात पूजा आणि दर्शन खंडित होत नाही. ग्रहणकाळात मंदिरांचे दरवाजे बंद करण्यात येतात, मात्र गया येथील विष्णुपाद मंदिर हे याला अपवाद आहे. हे मंदिर विष्णूला समर्पित आहे बिहारमधील गयाजी येथे फाल्गु नदीच्या काठावर असलेले मंदिर विष्णूने गयासुर राक्षसाचा वध केलेल्या जागेवर बांधले गेल्याची माहिती आहे. मंदिरात धर्मशिला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेसाल्टच्या ब्लॉकमध्ये कोरलेले 40 सेमी पायाचे ठसे हे साक्षात भगवान विष्णुचे आहेत. (Vishnupada Temple)

जेव्हा भगवान विष्णुने गयासुरच्या छातीवर पाय ठेवला आणि त्याला जमिनीत लोटून दिले, तेव्हा हे ठसे निर्माण झाल्याची माहिती आहे. त्याच्या सभोवताली चांदीचा मुलामा असलेल्या कुंड आहे. मंदिर 30 मीटर उंच आहे आणि मंदिरातील भव्य मंडपाला आधार देणाऱ्या सुंदर कोरलेल्या खांबांच्या 8 ओळी आहेत. हे अष्टकोनी मंदिर केव्हा बांधले गेले याचा अभ्यास अनेकांनी गेला, मात्र त्याची तारीख मिळू शकली नाही. भगवान राम आणि माता सीता यांनीही या मंदिरात भेट दिल्याची नोंद आहे, त्यावरुन हे मंदिर किती पुरातन आहे, याची कल्पना येते. सध्याचे जे मंदिर आहे, ते 1787 मध्ये इंदौरच्या राणी अहिल्याबाई होळकर यांनी पुन्हा बांधले आहे. या मंदिराच्या नुतनीकरणासाठी अहिल्याबाई होळकर यांनी जयनगरमधील मुंगेर येथील सर्वोत्तम काळा दगड आणला होता. या दगडावर कोरीव काम करण्यासाठी त्यांनी राजस्थानमधून कारागीर आणले. (Social News)

आता बिहार सरकारने हे मंदिर बिहारमधील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक म्हणून घोषित केले आहे. फाल्गु नदिच्या काठावर असलेल्या या मंदिरामध्ये पितृपक्षामध्ये पिंडदान करण्यासाठी हजारो हिंदू धर्मियांची गर्दी असते. त्यातच यावेळी पितृपक्षाची सुरुवात चंद्रग्रहणानं होत असल्यानं या मंदिरातील गर्दी वाढणार आहे. ग्रहणकाळातही ज्या मोजक्या मंदिरांचे दरवाजे भाविकांसाठी खुले रहातात, त्या मंदिरांपैकी एक प्रमुख मंदिर म्हणून या विष्णुपद मंदिराचे नाव घेतले जाते. या मंदिरासोबत दिल्लीमधील कालाका जी माता मंदिराचे दरवाजे ही ग्रहण काळात बंद करण्यात येत नाहीत. असे मानले जाते की, माता कालकाची दैवी शक्ती आणि तिच्यावरील भक्तांची भक्ती यामुळे मंदिरात ग्रहणाच्या वेळीही पूजा आणि दर्शन खंडित करण्यात येत नाही. यामुळे या मंदिरात ग्रहणकाळात फक्त दिल्लीतील नाही, तर अन्य राज्यातून भाविक माता कालिकेचे दर्शन करण्यासाठी येतात. (Vishnupada Temple)
========
Chhattisgarh : या मंदिराला ‘एक दिवसाचे मंदिर’ म्हणतात !
========
कालिका जी माता मंदिर हे दिल्लीतील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक मंदिर आहे. धार्मिक मान्यतेनुसार, माँ कालीची शक्ती अशी आहे की, कोणत्याही ग्रहणाची सावली तिच्यावर परिणाम करू शकत नाही. या मंदिरात, बारा राशी आणि नऊ ग्रह स्वतः आईच्या गर्भात राहतात अशी मान्यता आहे. म्हणजेच, ग्रह आणि नक्षत्र स्वतः आईच्या पुत्रासारखे असतात. अशा परिस्थितीत, ग्रहण असो किंवा सुतक, येथे कधीही माता कालिकेची पूजा थांबवण्यात येत नाही. पौराणिक मान्यतेनुसार माता कालीला काळ आणि विनाशाची देवी म्हटले जाते. तिचे रूप इतके भयंकर आहे की, ग्रहणासारखी अशुभ घटना तिच्या दरबारात टिकू शकत नाही. यामुळेच ग्रहणाच्या वेळीही येथे सामान्य दिवसांसारखीच भक्ती आणि उत्साह राहतो. (Social News)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
