संसाराचे पालनहार म्हणून ओळखले जाणारे भगवान विष्णूंनी धरतीवरील दुष्टांचा विनाश करण्यासाठी कधी मर्यादा पुरुषोत्त्म राम तर कधी भगवान कृष्णाच्या रुपात अवतार घेतला होता. त्यांनी धरतीवरील असंख्य दुष्टांचा विनाश केला होता. हिंदू पुराणांनुसार आणि शास्रांमध्ये ही भगवान विष्णूंचा महिला अपरंपार आहे असे म्हटले आहे. आज कलियुगात सुद्धा विष्णू बद्दल भक्तांमध्ये आस्था असलेली पहायला मिळते. भक्त गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करण्यासाठी मंदिरात जरुर जातात. अशातच भारतातील अशी काही प्रसिद्ध विष्णू मंदिरे आहेत त्या बद्दल आपण आज अधिक जाणून घेणार आहोत.(Vishnu temples in India)
रंगनाथ स्वामी मंदिर (तमिळनाडू)
तमिळनाडू मधील तिरुचिरापल्लीच्या कावेरी नदीच्या तटावर भगवान श्री हरि रंगनाथ स्वामी मंदिर आहे.देश आणि जगभरातील लाखो पर्यटक या मंदिरात प्रत्येक वर्षी दर्शनासाठी येतात. या मंदिराची खास गोष्ट अशी की, हे गोदावरी आणि कावेरी नदीच्या मधोमध आहे. येथे विष्णूच्या पवित्र दिवस एकादशीनिमित्त मोठी पूजा-अर्चना केली जाते. या मंदिराबद्दल असे म्हटले जाते भगवान विष्णूचा अवतार श्री राम लंकेतून परतल्यानंतर येथे पूजा केली होती. या व्यतिरिक्त भक्तांमध्ये या मंदिराबद्दल अशी मान्यता आहे वैंकुठ नावाने प्रसिद्ध असलेल्या या पवित्र स्थळावर कृष्ण दशमीच्या दिवशी जो भक्त कावेरी नदीत स्नान करेल त्याला ८ तीर्थांमध्ये स्नान केल्यासमान पुण्य मिळते.
बद्रीनाथ धाम (उत्तराखंड)
आपल्या हिंदू धर्मातील चार धामांपैकीच एक असलेले बद्रीनाथ धाम उत्तराखंडातील चमोली जिल्ह्यातील अलकनंदा नदीजवळ आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात भगवान विष्णू यांच्यासह नर नारायण यांची मुर्ती सुद्धा स्थापन करण्यात आलेली आहे. सकाळी जेव्हा बद्रीनाथचे दरवाजे खुलण्याची सुचना मिळते तेव्हा भक्तांची खुप मोठी गर्दी येथे होते. या मंदिराच्या बांधकामाबद्दल असे बोलले जाते की, हे आठव्या शतकात आदि शंकराचार्य यांनी तयार केले होते. मंदिराबद्दल अशी मान्यता आहे की, मंदिराचे दरवाजे बंद करताना दिवे लावले जातात. ते दिवे दरवाजे खुलेपर्यंत तेवत असतात.
गयाचे मंदिर (बिहार)
बिहार मधील गया जिल्ह्यातील फल्गु नदीच्या तटावर भगवान विष्णूचे पदचिन्ह असलेले मंदिर आहे. येथे भक्तांना विष्णूच्या चरणाच्या चिन्हामुळे त्यांचे दर्शन होते. मान्यता अशी आहे की, या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार इंदौरची महाराणी अहिल्या बाई यांच्याद्वारे करण्यात आली होता. खरंतर या मंदिरात नॉन- हिंदूंना परवानगी नाही. येथे प्रत्येक वर्षी लोक आपल्या पितरांच्या आत्म्याला मुक्ती मिळावी म्हणून पूजा ही करतात.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर (महाराष्ट्र)
महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर आहे. या मंदिराबद्दल असे म्हटले जाते की, हे मंदिर भगवान विष्णूचे एक रुप असलेल्या विठ्ठल आणि रुक्मिणीला समर्पित आहे. या मंदिराजवळून भीमा नदी वाहते. लाखो भक्त प्रत्येक वर्षी या मंदिरात दर्शनासाठी येतात. (Vishnu temples in India)
हेही वाचा- दोन्ही धर्मियांना बांधून ठेवणारे ‘हे’ मंदिर
तिरुपती वेंकटेश्वर मंदिर (तिरुपती)
देशातील सर्वाधिक प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी एक तिरुपती वेंकटेश्वर मंदिर तिरुपतीच्या जवळील तिरुमाला डोंगरावर आहे. प्रत्येक वर्षी लाखो पर्यटक भगवान वेंकटेशाच्या दर्शनासाठी येतात. या मंदिराची वास्तूकला, शिल्पकला तुम्हाला भारावून टाकते. या मंदिराबद्दल काही मान्यता सुद्धा आहेत. असे म्हटले जाते की, या मंदिरात दर्शन केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.