रोजच्या कंटाळवाण्या दैनंदिन जीवनातून वेळ काढत प्रत्येक जणं बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतो. आता फिरायला जाण्यासाठी भारत हा अतिशय उत्तम पर्याय आहे. नानाविविध राज्य, त्यांच्या वेगवेगळ्या संस्कृती, निसर्गाने मुक्तहस्ताने दिलेले सौंदर्य भारतात मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. फिरून तुम्हाला कंटाळा येईल मात्र भारत देश फिरून संपणार नाही. असे असले तरी भारतासोबतच परदेशात जाऊन बाहेरील देशांचे सौंदर्य देखील पाहण्याची इच्छा अनेकांची असते. पण या आंतरराष्ट्रीय सहली वाटता तितक्या सोप्या नाही. खर्च तर असतोच सोबतच अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. पासपोर्ट, व्हिसा देखील आवश्यक असतो. यातली व्हिसाची प्रक्रिया खूपच किचकट, वेळखाऊ आणि खर्चिक प्रक्रिया आहे. मात्र भारतीयांसाठी जगातील असे काही देश आहेत, जे व्हिसा फ्री आहेत. अर्थात त्या देशांमध्ये जाण्यासाठी व्हिसाची आवश्यकता नाही. या देशांमध्ये भारतीयांना व्हिसाशिवाय प्रवास करता येतो. मग असे देश कोणते चला पाहूया. (Tourism)
भूतान
भारताच्या अगदी जवळचा आणि भारतीय संस्कृतीशी बऱ्यापैकी साधर्म्य असलेला देश म्हणजे भूतान. हिमालयाच्या पर्वतांमध्ये वसलेल्या भूतानला स्वर्ग देखील म्हटले जाते. भूतान हा अतिशय सुंदर देश आहे. या देशाला निसर्गाने भरभरून सौंदर्याचे वरदान दिले आहे. भारतीय पर्यटक म्हणून या देशात आपल्याला व्हिसाशिवाय १४ दिवस राहता येते. (Todays Marathi Headline)

नेपाळ
भारताचा शेजारी म्हणून नेपाळ या देशाला ओळखले जाते. चारही बाजूनी हिमालय पर्वताने वेढलेला हा देश म्हणजे भारतीय संस्कृतीची प्रतिकृतीच आहे. माऊंट एव्हरेस्ट आणि कांचनजंघा सारखे प्रसिद्ध आणि मोठे पर्वत या देशात आहे. प्राचीन इतिहासाशी संबंधित अनेक मंदिरे पाहायला मिळतील. नेपाळला जाण्यासाठी भारतीयांना व्हिसाची गरज लागत नाही. (Latest Marathi News)

मॉरिशियस
अतिशय सुंदर समुद्र किनारे, तलाव आणि विविध प्रकारे शैवाल हे मॉरीशचे वैशिट्य आहे. भारतीय पर्यटक या देशामध्ये व्हिसाशिवाय ९० दिवस राहून निसर्गाचा आनंद घेऊ शकता. या देशात अनेक लोकं हिंदी भाषेत देखील बोलतात. (Travl)

मलेशिया
इस्लामी देश असलेल्या मलेशियाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील सुंदर समुद्रकिनारे आणि मोठमोठी सुंदर शहरं. भारतीयांना या देशात व्हिसाशिवाय ३० दिवसांपर्यंत राहण्याची परवानगी आहे. (Marathi)

केनिया
“हजार टेकड्यांचा देश” म्हणून केनिया हा देश ओळखला जातो. हा देश वन्यजीव आणि ५० पेक्षा जास्त राष्ट्रीय उद्यानांसाठी प्रसिद्ध आहे. या देशात भारतीय लोकं व्हिसाशिवाय ९० दिवसांपर्यंत राहू शकतात. (Top Marathi News)

श्रीलंका
भारतीयांसाठी श्रीलंका देखील व्हिसा फ्री देश आहे. या देशात तुम्ही लायन रॉक सिगिरियाला भेट देऊ शकता, जे त्यांच्या प्राचीन किल्ल्यांसाठी आणि अद्भुत दृश्यांसाठी ओळखले जाते. हे स्थळ युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ आहे. तुम्ही कॅंडी, डंबुला गुहा मंदिर (भगवान बुद्धांचे दर्शन आणि रंगीत भित्तीचित्रे असलेली गुहा) आणि कोलंबोमधील गंगा रामाय मंदिर (सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक, बौद्ध आणि हिंदू कलांचे मिश्रण) यांना देखील भेट देऊ शकता. नैसर्गिक सौंदर्याच्या ठिकाणांसाठी, तुम्ही बेंटोटा बीच, नुवारा एलीया (“लिटील इंग्लंड” म्हणूनही ओळखले जाते), याला आणि उडावालावे राष्ट्रीय उद्याने, लायन किंग फॉरेस्ट सँक्चुअरी, अॅडम्स पीक, पिन्नावाला एलिफंट ऑर्फनेज आणि नाइन आर्च ब्रिज यासारख्या ठिकाणांना भेट देऊ शकता. (Todays Marathi Headline)

मालदीव
हिंदी महासागरात, भारताच्या दक्षिण-पश्चिमेस असलेले हे राष्ट्र अनेक बेटांनी बनलेले आहे. या देशाची राजधानी माले असून, पर्यटन हा येथील मुख्य व्यवसाय आहे. येथे असणारे सुंदर, स्वच्छ, शांत, आकर्षक समुद्रकिनारे कायमच पर्यटकांचे आकर्षण ठरणारे आहे. हे स्नॉर्कलिंग आणि डायव्हिंगसाठी हे ठिकाण खूप लोकप्रिय आहे. (Top Stories)

==========
Iran-USA: इराणमध्ये झालेला अपमान आजही अमेरिकेला दुखावतोय….
==========
थायलंड
थायलंड भारतीय नागरिकांसाठी व्हिसा-ऑन-अराइवल सुविधा देतो. तुम्हाला फक्त पासपोर्ट, फोटो, आणि योग्य प्रवास दस्तऐवज आवश्यक असतात. थायलंडमध्ये तुमच्या प्रवासाचा कालावधी १५ दिवस असू शकतो. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
