तुम्ही कधी वर्च्युअल मोबाईल क्रमांकाबद्दल ऐकले आहे किंवा वापरले आहे का? कारण वर्च्युअल मोबाईल क्रमांक (Virtual mobile number) वापरताना तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये कोणत्याही कंपनीचे सिम कार्ड टाकावे लागत नाही. परंतु तरीही अन्य सिम कार्ड प्रमाणे तुम्हाला त्याच्या माध्यमातून फोन करणे, मेसेज पाठवणे किंवा इंटरनेटचा वापर करता येतो. तर जाणून घेऊयात वर्चुअल क्रमांक नक्की काय काम करतो त्याबद्दल अधिक.
वर्च्युअल मोबाईल क्रमांकाला Direct Inward Dialing किंवा VOIP अथवा एक्सेस क्रमांक अशा नावाने ओळखले जाते. वर्च्युअल प्रायव्हेट नंबर एक टेलीफोन क्रमांक असतो. जो तुमच्या मोबाईलवर येणाऱ्या फोनप्रमाणेच काम करतो. त्यांना फॉलो-मी नंबर, एक वर्च्युअल टेलिफोन क्रमांक किंवा पर्सनल क्रमांक (फक्त युके) मध्ये म्हटले जाते.
वर्च्युअल मोबाईल क्रमांक हा एक क्लाउड सिस्टिमचा एक भाग आहे. जो इंटरनेट कनेक्शनच्या माध्यमातून चालते. याचा वापर संपूर्ण जगभरात कम्युनिकेशनसाठी केला जातो. अर्थात कोणताही युजर कोणत्याही देशातून कोणत्याही देशात फोन करु शकतो. मात्र याचा वापरामुळे अधिक बिल येऊ शकते. कारण परदेशात फोन करणे झाले किंवा एखाद्या ठिकाणी गेलात जेथे रोमिंग लागते त्यामुळे सुद्धा तुमच्या मोबाईल फोनच्या बिलात वाढ होऊ शकते. मात्र वर्च्युअल मोबाईल क्रमांक अशा लोकांसाठी उत्तम पर्याय आहे ज्यांचे संबंध विविध देशांमध्ये असतात. आपण कोणत्याही देशातील वर्च्युअल क्रमांक खरेदी करु शकतो.
हे देखील वाचा- वीजेच्या बोर्डामधील तिसरी पिन काय काम करते?

वर्च्युअल क्रमांक कशा पद्धतीने काम करतो?
याच्या वापरासाठी कोणताही हार्डवेअर खरेदी करावे लागत नाही. तुमच्या फोनमध्ये उपलब्ध अससेल्या सॉफ्टवेअरचा वापर करु शकतात. वर्च्यु्ल क्रमांकासाठी एक पद्धतीचा टेलिफोन क्रमांक आहे, जो कोणत्याही टेलिफोन लाइन सोबत जोडलेला नसतो. या क्रमांकावर येणारे फोन एक पूर्व-निर्धारित टेलिफोन क्रमांकावर फॉरवर्ड करण्यासाठी प्रोग्राम केला जातो. जो युजर्सद्वारे प्रथम निवडला जातो. एका पद्धतीने वर्च्युअल क्रमांक पारंपरिक कॉल आणि वीओआयपीच्या दरम्यान एक माध्यमाप्रमाणे काम करु शकतो.(Virtual mobile number)
वर्च्युअल क्रमांक विविध हा वेगवेगळ्या क्रमांकावर फोन करण्यासाठी सेट करु शकतो. जसे की, सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत कोणत्याही ऑफिसच्या क्रमांकावर सेट करु शकतो. किंवा संध्याकाळी ५ वाजता घरातील क्रमांकासाठी सेट करु शकतो. अशा प्रकारे क्रमांक हा वेळेनुसार विविध क्रमांकासाठी सेट केला जाऊ शकतो. तर वर्च्युअल क्रमांक सामान्यत: वर्च्युअल प्रोवाइडर कंपनीकडून उपलब्ध करुन दिला जातो जे त्या देशातील संचार डिपार्टमेंटवर अवलंबून असते. खरंतर सरकार ठरवते की, कोणते वर्च्युअल मोबाईल क्रमांक प्रोवाइडर कंपनीला द्यायचे आहे. त्याचसोबत ते कशाप्रकारे मॅनेज केले पाहिजेत. त्याचसोबत काही अॅप सुद्धा वर्च्युअल मोबाईल क्रमांक सुद्धा दिले जातात.