व्हर्जिनिया गिफ्रे यांचे वयाच्या 41 व्या वर्षी निधन झाले आहे. ऑस्ट्रेलियामधून आलेल्या या बातमीकडे फारसे कुणाचे लक्ष गेले नाही. मात्र या बातमीनं लहान मुलींवर होणा-या लैंगिक अत्याचाराविरुद्ध उभ्या राहिलेल्या लढ्याला धक्का दिला आहे. व्हर्जिनिया गिफ्रे यांनी 17 व्या वर्षी आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप केला होता. या आरोपानं जगभर खळबळ उडाली. कारण ब्रिटनचे प्रिन्स अँड्र्यू आणि त्यांचे उद्योगपती असलेले अमेरिकन मित्र जेफ्री एपस्टाईन या दोघांवर व्हर्जिनियानं आरोप केला होता. या संदर्भात खटलाही झाला. प्रिन्स अँड्र्यू असलेली एक क्लिपही न्यायालयात दाखवण्यात आली. (Virginia Giuffre)
या खटल्यातील एक आरोपी जेफ्री एपस्टाईन यांनी नतंर तुरुंगात आत्महत्या केली. प्रिन्स अँड्र्यू यांनी व्हर्जिनियाचे सर्व आरोप सुरुवातीला फेटाळले. शिवाय राजघराण्याकडून यासंदर्भात निवेदनही जाहीर करण्यात आले होते. त्यात प्रिन्स अँड्र्यूवर झालेले आरोप फेटाळून लावण्यात आले. मात्र या सर्वात व्हर्जिनियाकडे एवढे पुरावे होते की, राजघराण्यानं कोर्टाबाहेर हे प्रकरण मिटवल्याची चर्चा आहे. शिवाय व्हर्जिनियाला मोठी रक्कमही देण्यात आली. यानंतर व्हर्जिनिया ही लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या मुलींच्या पाठिशी उभी राहिली. तिने या प्रकरणात अडकलेल्या मुलींची सुटकाही केली. ब्रिटनच्या प्रिन्स अँड्र्यूवर लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या व्हर्जिनिया गिफ्रे यांचे वयाच्या 41 व्या वर्षी निधन झाले. पश्चिम ऑस्ट्रेलियातील एका गावात व्हर्जिनिया या रहात होत्या. त्यांच्या शेतीमधील घरात त्यांचा मृतदेह मिळाला असून व्हर्जिनिया यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे. (International News)
व्हर्जिनिया गिफ्रे यांनी ब्रिटिश राजघराण्यातील प्रिन्स अँड्र्यूवर लैंगिक शोषणाचा आरोप करत जगभरातील हायप्रोफाईल सेक्स स्कँडलचे रहस्य उघड केले होते. प्रिन्स अँड्र्यू हे राणी एलिझाबेथ द्वितीय आणि प्रिन्स फिलिप यांचे तिसरे अपत्य आणि दुसरे ज्येष्ठ पुत्र आहेत. व्हर्जिनिया यांनी 2011 मध्ये एका मुलाखतीमध्ये त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराची माहिती दिली. यामुळे जगभर खळबळ उडाली. कारण त्यातील पहिला आरोपी हा ब्रिटीश घराण्याचा राजकुमार होता. ब्रिटनचे प्रिन्स अँड्र्यू आणि उद्योगपती जेफ्री एपस्टाईन यांच्यावर व्हर्जिनियानं आरोप केले होते. शिवाय एपस्टाईन हे अल्पवयीन मुलींची लैंगिक तस्करी करतात असेही त्यांनी या मुलाखतीमध्ये सांगितले होते. जेफ्री हे प्रिन्स अँड्र्यू यांचे घनिष्ट मित्र म्हणून ओळखले जात होते. त्यामुळे या कामात प्रिन्स अँड्र्यूही सहभागी झाल्याचा आरोप मग होऊ लागला. व्हर्जिनिया यांच्या आरोपानंतर न्यायालयात त्यांनी दाद मागितली. हा खटला संपल्यावर लैंगिक शोषण आणि लैंगिक तस्करीविरुद्ध व्हर्जिनिया या काम करीत होत्या. (Virginia Giuffre)
अमेरिकेत जन्मलेल्या व्हर्जिनिया या ऑस्ट्रलियामध्ये राहत होत्या. 2000 साली, मार-ए-लागो येथे स्पामध्ये त्या काम करत होत्या. त्यावेळी एपस्टाईनची मैत्रीण असलेल्या घिसलेन मॅक्सवेलने त्यांना अन्य स्पामध्ये काम करण्याची संधी देते, म्हणून एपस्टाईनकडे नेले. तिथे व्हर्जिनियावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. नंतर त्यांना जगभर जबरदस्तीनं नेण्यात येऊन लैंगिक शोषण करण्यात आले. या सर्वात प्रिन्स अँड्र्यूचाही समावेश असल्याचा आरोप व्हर्जिनियानं केला. व्हर्जिनियाचे हे लैंगिक शोषण झाले तेव्हा त्या 17-18 वर्षाच्या होती. त्यांनी केलेले सर्व आरोप प्रिन्स अँड्र्यूने फेटाळले. मात्र 2008 मध्ये जेफ्री एपस्टाईनच्या न्यू यॉर्कच्या घरचा एक व्हिडिओ जाहीर झाला. (International News)
========
हे देखील वाचा : Maharashtra: असं मिळालं आपल्या राज्याला महाराष्ट्र हे नाव
Malcha Mahal : बेगम विलायतचा आत्मा असलेल्या हॉन्टेड ‘मालचा महल’
========
त्यात प्रिन्स अँड्र्यू हे एका मुलीसोबत असतांनाचे दाखवण्यात आले. यानंतर एकच खळबळ उडाली. राजघराण्यानं या सर्वात प्रिन्स अँड्र्यूचा समावेश नसल्याचा खुलासा केला. पण व्हर्जिनियानं अनेक खटले दाखल केले. हे आरोप फेटाळणा-या प्रिन्स अँड्र्यूने नंतर त्यातून माघार घेत व्हर्जिनियाला मोठी रक्कम दिली. ही रक्कम किती होती, याचा खुलासा कधीही झाला नाही. या लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या जेफ्री एपस्टाईनने 2019 मध्ये तुरुंगात आत्महत्या केली. त्यानंतर व्हर्जिनिया यांनी ऑस्ट्रेलियामध्ये राहून लैंगिक शोषणाविरुद्ध लढा उभारला होता. मात्र त्यांचे वैयक्तिक आयुष्य संघर्षांनी भरलेले होते. घटस्फोट झाल्यामुळे त्या खूप दिवस तणावात होत्या. त्यात तणावातून व्हर्जिनिया यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे. (Virginia Giuffre)
सई बने