Virat – Anushka Baby Boy Name Meaning : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली यांच्या घरी पुन्हा गोंडस बाळाचे आगमन झाले आहे. अनुष्का दुसऱ्यांदा आई बनली असून तिने एका मुलाला जन्म दिला आहे. याची गुडन्यूज अनुष्काने सोशल मीडियावर शेअर केली आहे. अनुष्काने तिच्या सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अनुष्काने तिच्या आणि विराटच्या मुलाचे नाव ‘अकाय’ असे ठेवल्याचे जाहीर केले आहे.
अत्यंत खास आहे अकायचा अर्थ
अकाय हा तुर्की शब्द आहे. या शब्दाचा वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळा अर्थ होतो. तुर्की भाषेनुसार, याचा अकायचा अर्थ असा होतो की, ‘चमकता चंद्र’. याशिवाय हिंदीत याचा अर्थ होतो की, ‘शरिर’ किंवा ‘रुपाशिवाय’, ‘विरुपता मुक्त’, ‘शरिरहीन’ असा. फिलिपिनेमध्ये याचा अर्थ होतो की, ‘मार्गदर्शक’. राजस्थानी भाषेत याचा अर्थ ‘काया’ किंवा ‘देहरहित’ किंवा ‘निराकार’ असा होतो. (Virat – Anushka Baby Boy Name Meaning)
View this post on Instagram
मुलीचे नावही अत्यंत खास
विराट आणि अनुष्काच्या दोन्ही मुलांची नावे देवाच्या नावावरून ठेवण्यात आली आहेत. अकाय नावाचा संबंध चंद्र देवाशी आहे. तर वामिका, देवी दुर्गेचे नाव आहे. तिच्या नावाचा अर्थ भगवान शंकर आणि पार्वतीचे यांचे मिळतेजुळते स्वरुप मानले जाते. विराटच्या नावाच्या अर्थाच्या बद्दल बोलायचे झाल्यास तर विशाला असा अर्थ होतो. अनुष्काचे नाव देवी दुर्गेच्या नावांपैकी एक आहे.
चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
चाहत्यांकडून आता अनुष्का आणि विराट कोहलीला नव्या बाळाच्या आगमनामुळे शुभेच्छा दिल्या जात आहेत. अभिनेता रणवीर सिंह, सोनम कपूर, रकुल प्रित सिंह यांच्यासह अन्य कलाकारांनी अनुष्काला शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय या कपलच्या चाहत्यांनीही आनंद व्यक्त करत नव्या बाळाचे स्वागत केले आहे.
विराट आणि अनुष्काचे लग्न
विराट कोहली आणि अनुष्का शर्माने वर्ष 2017 मध्ये 11 डिसेंबर रोजी लग्न केले होते. या दोघांचा विवाह इटलीमधील टस्कनी येथे झाला होता. या विवाहाला घरातील मंडळींसह काही जवळचा मित्रपरिवार उपस्थितीत होता. लग्नाच्या तीन वर्षांनी 2021 मध्ये 11 जानेवारीला कपलच्या घरी मुलीचे आगमन झाले होते. तिचे नाव वामिका ठेवण्यात आले आहे.
आणखी वाचा :