समजा तुम्हाला फक्त थंड पेय प्यायला दिले आणि जेवण बंद केले. कोणतेही अन्नपदार्थ किंवा फळे खायला दिली नाहीत. केवळ तुम्हाला नेहमी कोल्ड्रिंक्स पिऊन पोट भरायचे असेल तर तुम्ही ते करू शकता का? तुम्ही असा विचार करत असाल की सतत कोल्ड्रिंक्स प्यायल्याने माणूस मरतो किंवा त्याची तब्येत बिघडते. हे खरं जरी असले तरीही एका व्यक्तीने या उलट सिद्ध करुन दाखवले आहे. ती अशी एक व्यक्ती आहे जी फक्त कोल्ड्रिंक्स पिऊन आपले जीवन जगत आहे. अनेक वर्षांपासून ती व्यक्ती हेच काम करत आहे. तरीही त्याला कोणतीही समस्या किंवा आजार झालेला नाही. ही हैराण करणारी गोष्टच म्हणावी लागेल. असं कधीच होत नाही असे खुपजण बोलतील पण वास्तवात हे सत्य आहे. (Viral Story)
गेल्या 17 वर्षांपासून जेवला नाही
इराणमध्ये राहणाऱ्या व्यक्तीने दावा केला आहे की, गेल्या 17 वर्षांपासून तो फक्त कोल्ड ड्रिंक्स पिऊन पोट भरत आहे. तरुणाने 2006 मध्येच जेवण सोडले . यानंतर त्याने आजवर अजिबात जेवलेला नाही. याच सोबत त्याने आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे की, दिवसभरातील 24 तासांपैकी तो फक्त 4 तासच झोपतो. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, घोलमरेजा अर्देशीरी असे या तरुणाचे नाव आहे. अर्देशिरी असे सांगतो की, गेल्या 17 वर्षांपासून तो पेप्सी किंवा सेव्हन अप पिऊनच आपले पोट भरत आहे. तसेच त्याचे पोट केवळ थंड पेयच पचवू शकते.
हेही वाचा- मृत्यूवेळी व्यक्तीला दिसतो लख्ख उजेड, वैज्ञानिकांनी सांगितले हैराण करणारे तथ्य
खाल्ल्यानंतर उलट्या होतात
त्याने एकापाठोपाठ एक धक्कादायक काही खुलासे केले आहेत. अर्देशी याने सांगितले की, जर तो जेवला तर त्याला ते पचत नाही. जेव्हा तो जोवतो त्यावेळेस त्याला उलट्या होण्यास सुरुवात होते. तो असे ही म्हणतो की जेव्हा तो जेवतो तेव्हा ते अन्न त्याला केसांसारखे दिसू लागते. म्हणूनच मी जेवू शकत नाही. त्यामुळेच कोल्ड्रिंक पिऊनच पोट भरतो. त्याने सांगितले की पेप्सी आणि सेव्हनअपमधील कार्बोनेटेड पेयांमधून मिळणारी ऊर्जा त्याला जिवंत ठेवते. (Viral Story)
त्याचसोबत जेव्हा कधी जेवतो तेव्हा त्याला ते जेवण आपल्या डोक्यावरच्या केसांसारखे वाटू लागते. यामुळेच तो जेवत नाही. केवळ कोल्ड ड्रिंक पिऊन आपले पोट भरत आहे. या व्यतिरिक्त तो असे म्हणतो की, पेप्सी आणि सेवनअपमध्ये असलेल्या कार्बोनेटेड ड्रिंक मधून मिळणाऱ्या उर्जेमुळेच तो आजवर जीवंत राहला आहे. डॉक्टरांना सुद्धा या बद्दल सांगितले असता ते म्हणाले की, तुझा मेंदू फारच कुशाग्र आहे. त्यामुळे आम्हाला यामध्ये काही समस्या दाखवत नाहीयं.