मनी लॉन्ड्रिंग संदर्भात तुरुंगात बंद असलेले दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांचा जो नवा व्हिडिओ समोर आला आहे, त्यामध्ये ते हॉटेलचे जेवण जेवत असल्याचे दिसून येत आहे. तर एक व्यक्ती त्यांचे पाय ही दाबताना दिसत आहे. या व्हिडिओवरुन असा दावा केला आहे की, त्यांना खाण्यासाठी सुद्धा विशेष डब्बा दिला जात आहे. आता हे माहिती नाही की, तुरुंगात असलेले सत्येंद्र जैन यांचे स्टेटस व्हिआयपी कैदी आहेत की नाही. दरम्यान, तुरुंगातील मॅन्युअलनुसर एखादा मंत्री जर आर्थिक गुन्ह्या प्रकरणी तुरुंगात असेल तर त्याला व्हिआयपी कैदी (VIP prisoners) असे मानले जाऊ शकते. तुरुंगाच्या नियमावलीत असे ही म्हटले आहे की, तुरुंगात अंडरट्रायल कैद्यांसाठी नियम कायदे आहेत.
जाणून घेऊयात या काही नियमाबद्दल अधिक. पण तिहार तुरुंगातील सत्येंद्र जैन यांचा जो व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर कोर्टाने प्रशासनाला विचारले की, हा कसा लीक झाला. कोर्टाने हे स्पष्ट केले की, तुरुंग प्रशासन सत्येंद्र जैन यांना ते जेवण दिले जाते जे अंडरट्रायल कैद्यांना दिले जाते. जर त्यांचा उपवास किंवा व्रत आहे तर ते दिल्ली तुरुंगाचे नियम, २०१८ नुसार नियम ३३९, ३४१ आणि ११२४ नुसार व्रतचे जैन जेवण दिले जाईल.

सर्वसामान्यपणे जेव्हा एखादा आमदार, खासदार, मंत्री किंवा बडा उद्योगपती तुरुंगात जातो आणि तो आर्थिक गुन्ह्यातील प्रकरणांमध्ये अंडरट्रायल आहे तर तो स्वत:ला सुपीरियर किंवा व्हिआयपी असल्याचे सांगत त्यांना त्या सुविधांची मागणी करतो जे तुरुंगातील मॅन्युअलमध्ये त्यांना अधिक दिल्या गेल्या आहेत.
सुपीरियर क्लास काय असतो?
सुपीरियर क्लास अंतर्गत येणाऱ्या सुविधांमध्ये कैद्याला रोज एक मेज , एक चौकी, वृत्तपत्र, झोपण्यासाठी लाकडाचा बेड, कॉटनची चादर, मच्छरदाणी, एक जोडी चप्पल, कूलर, बाहेरचे जेवण, तुरुंगाच्या आतमध्ये त्यांच्यासाठीचे वेगळे जेवण अशा सुविधा असतात. तर सामान्य कैद्याला खाण्यासाठी एक प्लेट आणि एक ग्लास दिला जातो. झोपण्यासाठी कंबल दिली जाते.
हे देखील वाचा- उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग यांची बातच वेगळी….
व्हिआयपी कैदी कोण असतात?
कैद्यांना त्यांच्या विश्वासावर आपली सामाजिक स्थिती आणि आर्थिक प्रोफाइलच्या आधारावर व्हिआयपी स्थितीसाठी अर्ज करण्याचा अधिकार आहे. सामान्यपणे व्हिआयपी कैद्यासाठी माजी केंद्रीय कॅबिनेट मंत्री, राज्य मंत्री, संसदेचे सदम्य, राज्य विधायकाचे सदस्य, माजी विधानसभा अध्यक्ष, सध्याचे खासदार, आमदार आणि न्यायिक मजिस्ट्रेट यांना निवडले जाते. खासकरुन दोषी राजकरण्यांना हे विशेष स्थिती प्राप्त करण्यासाठी व्यवस्था केली जाते. (VIP prisoners)
व्हिआयपी तुरुंग कसे असते, काय आहे उद्देश?
भारतातील तुरुंगात व्हिआयपी सेलचा उद्देश नेहमीच अन्य कैद्यांना व्हिआयपी कैद्यांचे संरक्षण करणे आणि तुरुंगातील अन्य हिस्सांपासून वेगळे ठेवणे. सराकर या लोकांना अधिक सुरक्षा आणि उत्तम देखरेखीवर खर्च करतात.
तुरुंग अधिनियम, १८९४ आणि मॉडेल जेल मॅन्युअल
भारतीय संविधानच्या तुरुंग अधिनियमानुसार, कोणत्याही तुरुंग अधिकाऱ्याला कैद्याला काही विक्री किंवा त्याच्या उपयोगासाठी संधी दिल्याने लाभ मिळू नये. अशाच प्रकारे, तुरुंगाच्या आपूर्तिसाठी कोणत्याही अनुबंधात अधिकाराला कोणतीही आवड नसावी. त्याचसोबत तुरुंगाकडून किंवा कोणत्याही कैद्यासंबंधित कोणाला ही गोष्टीची विक्री किंव खरेदीने लाभ मिळणार नाही.
असे कैदी ज्यांना व्हिआयपी ट्रिटमेंट मिळाली?
माजी तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिताच्या अटकेचे एक प्रकरण आहे. असमान संपत्ती प्रकरणातील दोषी, जयललिता यांनी बंगलौर सेंट्रल जेलमध्ये व्हिआयपी सेल मध्ये राहिल्या. तुरुंगात पाच अन्य व्हिआयपी सेल आहेत. या व्हिडिआयपी तुरुंगात एकदा कर्नाटकातील माजी मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा आणि जी जनार्दन रेड्डी आणि एसएन कृष्णिया सेटी सारखे अन्य माजी मंत्री सुद्धा राहिले होते.
त्याचसोबत अमर सिंह यांना तिहार तुरुंगात व्हिआयपी कैद्यांची सर्वाधिक उत्तम ट्रिटमेंट मिळाली होती. असे मानले जाते की, घरात शिजवलेले अन्य आणि युरोपीयन शौचालयाची सुविधा सुद्धा होती. चारा घोटाळ्याप्रकरणातील दोषी आढळले तरीही लालू प्रसाद यादव यांना तिहार तुरुंगात व्हिआयपी कॅटेगरीतील ट्रिंटमेंट दिली होती.