व्हिनेगर एक नैसर्गिक इंग्रीडिएंट आहे ज्याचा वापर जेवण ते घराच्या स्वच्छतेसाठी केला जातो. अस्वच्छता दूर करण्यासाठी व्हिनेगर फायदेशीर ठरते. बहुतांशजण व्हिनेगरचा वापर करतात. मात्र काही गोष्टी अशा असतात ज्या व्हिनेगरच्या माध्यमातून स्वच्छ कधीच करू नयेत. अन्यथा तुमचेच नुकसान होऊ शकते. (Vinegar Use Tips)
स्टोन आणि मार्बल काउंटरटॉप्स
व्हिनेगरमध्ये एक स्ट्राँन्ग क्लिनिंग प्रॉपर्टी असते. त्यामळे काउंटरटॉप त्याने स्वच्छ करू नये, जर तुमच्याकडे स्टोन किंवा मार्बल काउंटरटॉप असेल तर ते व्हिनेगरने स्वच्छ करण्याऐवजी एका नरम आणि मऊ कापडाने स्वच्छ पुसून घ्या.
लाकडाचे फर्नीचर
लाकडाचे फर्नीचर अजिबात व्हिनेगरने स्वच्छ करू नका. त्यामुळे त्याची चमक आणि रंग खराब होऊ शकतो. त्याऐवजी लाकडाचे फर्नीचर स्वच्छ करण्यासाठी पाण्याचा वापर करा.
पॉलिश्ड ग्लासवेअर
व्हिनेगरचा वापर करून पॉलिश्ड ग्लासवेअर स्वच्छ करू नका. कारण त्याची चमक कमी होऊ शकते. त्याऐवजी तुम्ही ग्लास क्लिनर किंवा माइल्ड डिश वॉशिंग साबणाचा वापर करू शकता.
टार्निश्ड ग्लासवेअर
जर तुमच्याकडे टार्निश्ड ग्लासवेअर आहे जसे की, क्रिस्टल किंवा गोल्ड पंच तर व्हिनेगरचा वापर करू नका. त्याऐवजी अशा गोष्टी तुम्ही नॉर्मल वॉटरने स्वच्छ करा.
अॅल्युमिनिअमच्या वस्तू
व्हिनेगरचा वापर करून तुम्ही अॅल्युमिनिअमचे सामान किवा भांडी स्वच्छ करू नका. त्याऐवजी सॉफ्ट ब्रश आणि माइल्ड डिश वॉशिंग साबणाचा वापर करून स्वच्छ करा.
इलेक्ट्रॉनिक्स
व्हिनेगरचा वापर चुकूनही इलेक्ट्रॉनिक्स डिवाइस स्वच्छ करण्यासाठी करू नका. यामुळे त्याचे नुकसान होऊ शकते. इलेक्ट्रॉनिक्स डिवाइसेस स्वच्छ करण्यासाठी योग्य क्लिनरचा वापर करावा.
कारची ग्लास
कारची ग्लास आणि विंडशील्डवर व्हिनेगरचा वापर करू नये. कारण यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. जर ग्लास स्वच्छ करायची असेल तर ग्लास क्लिनरचा वापर करा. (Vinegar Use Tips)
हाय क्वालिटी लॅमिनेट
व्हिनेगरचा वापर करून हाय क्वालिटी लॅमिनेट स्वच्छ करू नका. असे केल्याने त्याची चमक निघून जाईल आणि ते खराब ही होईल. नॉर्मल वॉटर आणि कापडाचा वापर करून तुम्ही ते स्वच्छ करा.
हेही वाचा- जीन्स दीर्घकाळ टिकून रहावी म्हणून धुण्यासाठी ‘या’ ट्रिक्स वापरुन पहा